LIVE : नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री

LIVE : नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री
Picture

नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री

01/11/2019,1:58PM
Picture

इचलकरंजीत चार आरोपींकडून मुलीवर अत्याचार

इचलकरंजीत चार आरोपींकडून मुलीवर अत्याचार केला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग.

01/11/2019,11:20AM
Picture

सदाभाऊ खोत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नाशिक येथे सदाभाऊ खोत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना सदाभाऊ खोत यांच्या समोर शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येत्या आठ दिवसात पंचनामा करुन मदत दिली जाईल, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

01/11/2019,9:38AM
Picture

औरंगाबादेत 15 हजार बनावट नोटा जप्त

औरंगाबादमध्ये 15 हजार बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा छापून कमी दरात विकणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. पुंडलिक नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बनावट नोटांचे मोठे आंतरराज्यीय रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

01/11/2019,9:30AM
Picture

मुरबाड येथे भीषण अपघात, अपघातात भाजपचे माजी आमदार जखमी

माळशेज रस्त्यावर मुरबाड जवळ दोन बस आणि एक स्विफ्ट कार असा तीन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात एकूण 20 ते 25 प्रवाशी जखमी झाले. तर स्विफ्ट कारमध्ये असलेले भाजपचे माजी आमदार दिगंबर विशेही जखमी झाले. ओव्हरटेकच्या नादात दोन बसची समोरा समोर ठोकर झाली. अडकलेल्या प्रवाशांना बसचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले.

01/11/2019,8:55AM
Picture

राज्यात केवळ दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडूनही सरकारने फक्त दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात गंभीर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने लेखी आदेश काढत दुष्काळी उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

01/11/2019,8:48AM

Picture

चाळीसगाव महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील फाट्यावर अपघात झाला आहे. भरधाव इंडिका कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र राठोड आणि प्रल्हाद राठोड असं मृत मुलांची नावं आहेत.

01/11/2019,8:45AM

Picture

दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस नेते सोनिया गांधींची भेट घेणार

दिल्लीत आज महाराष्ट्र काँग्रेस नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच सोनिया गांधी आणि महारष्ट्र काँग्रेस नेत्यांशी बैठकही होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित राहण्याची शक्यता.

01/11/2019,8:36AM
Picture

अवकाळी पावसाचा नागपुरी संत्र्यांना मोठा फटका

अवकाळी पावसामुळे प्रसिद्ध अशा नागपुरी संत्र्यांना फटका बसला आहे. नागपूर, अमरावती आणि वर्धा परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झाडावरील 25 टक्क्यांपेक्षा अधिक संत्री गळायला लागल्या आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

01/11/2019,8:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *