LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरचा अपघात, 30 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरची प्रवासी बसेसना धडक, 30 प्रवासी जखमी, 7 जणांना मुंबईला हलवले, माणगाव नजीक ढालघर फाटा येथे झाला अपघात, मुबंईहून दापोलीकडे दोन ट्रॅव्हल बसेसला समोरुन येणाऱ्या कंटेनरकडून धडक, जखमीनां बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

06/10/2019,12:20PM
Picture

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर ऑईल सांडल्यामुळे वाहतूक कोंडी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ऑईल सांडल्यामुळे पहाटेपर्यंत होती वाहतुक कोडीं झाली होती. बोरघाटात पुणेकडे जाणाऱ्या मार्गावरील टँकरमधील गळती मुळे आँईल सांडले होते. देवदूत यंत्रणेने तात्काळ हालचाल केल्याने ऑईलवर माती टाकून रस्ता सुकर बनविण्यात आला.

06/10/2019,11:59AM
Picture

नंदुरबार येथे लाखोंचा मद्यसाठा जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलीसांची मोठी कारवाई, तीन लाखांचा मद्य साठा जप्त, तवेरा गाडीतून केली जात होती वाहतूक, एकाला अटक

06/10/2019,11:53AM
Picture

सांगलीत पुराच्या पाण्यात दोनजण वाहून गेले

सांगली येथील कवठेमहाकाळ तालुक्यातील अग्रण नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले आहेत. मोरगाव पुलावर योगेश पवार आणि त्यांची लहान मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. देशिंगकडून कवठेमंकाळकडे येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वडील आणि मुलगी वाहून गेले.

06/10/2019,11:51AM
Picture

आरे कॉलनीत 2600 पैकी 1800 झाडं कापली

आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी आतापर्यंत 2600 पैकी 1800 झाडे कापण्यात आली आहेत. या वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्या 29 पर्यावरण प्रेमींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच 100 हून अधिक जण ताब्यात होते त्यांना सोडण्यात आले आहे. आरे कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ अद्यापही पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

06/10/2019,11:46AM
Picture

वीजपडून नाशिकमध्ये 3 जणांचा मृत्यू

परतीच्या पावसाने जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू, इगतपुरी तालुक्यातील भरत भले, हिराबाई सदगीर यांच्या अंगावर वीज पडली, तर दिंडोरी तालुक्यातील यमुनाबाई गांगोडे यांचा मृत्यू झाला आहे.

06/10/2019,11:42AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *