मुहूर्त ठरला! अजित पवारांची यादी आजच होणार जाहीर; कधी, किती वाजता? जाणून घ्या A टू Z माहिती…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाची उमेदवार यादी आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत 32 ते 35 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. यादी जाहीर होण्यापूर्वीच काही आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

मुहूर्त ठरला! अजित पवारांची यादी आजच होणार जाहीर; कधी, किती वाजता? जाणून घ्या A टू Z माहिती...
अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 4:12 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी कधी जाहीर होणार याची माहिती समोर आली आहे.

काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी झाली. या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर आता विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर केल्या जात आहेत. आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याचा मुहुर्त ठरला आहे.

कोणकोणत्या उमेदवारांचा पत्ता कट होणार?

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. या यादीत विद्यमान आमदारांची नावे असण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार गटाची पहिली यादी ही फक्त 32 ते 35 उमेदवारांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या यादीत कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणकोणत्या उमेदवारांचा पत्ता कट होणार हे लवकरच समोर येणार आहे.

एबी फॉर्म वाटप 

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारी निश्चित झालेल्यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. आज सकाळीच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना बोलवण्यात आले होते. यात संजय बनोसेडे, राजेश विटेकर, चेतन तुपे यांसह उमेदवारी निश्चित झालेले आमदार हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. अजित पवारांच्या हस्ते यादी जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले.

अजित पवार गटाची पहिली यादी आज

यावेळी वडगाव-शेरी चे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे देखील देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. या सर्वांना एबी फॉर्मचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष त्या यादीकडे लागले आहे.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.