अमित शाह महाराष्ट्रात तंबू ठोकणार, तब्बल इतक्या सभा घेणार, नेमका प्लॅन काय?

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे महायुतीकडून जोरदार नियोजन करण्यात आले आहे.

अमित शाह महाराष्ट्रात तंबू ठोकणार, तब्बल इतक्या सभा घेणार, नेमका प्लॅन काय?
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 3:19 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे महायुतीकडून जोरदार नियोजन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसारखे अनेक मोठे चेहरे जाहीर सभा घेणार आहेत. भाजपकडून 100 हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभा पार पडणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींवर मोठी जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 दिवस सभा होणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत. या सर्व सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही महाराष्ट्रात 15 सभा होणार आहेत. तसेच गोवा, मध्यप्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री हे देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शाहांच्या होणार आहेत. अमित शाह हे महाराष्ट्रात 20 सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत. या सभांची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र दिवाळीनंतर भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे बोललं जात आहे.

कोणत्या नेत्यांच्या किती सभा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी – 8 अमित शाह – 20 नितीन गडकरी – 40 देवेंद्र फडणवीस – 50 चंद्रशेखर बावनकुळे – 40 योगी आदित्यनाथ – 15

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....