
महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. काल दुसऱ्यादिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी पहायला मिळाल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचवेळी छगन भुजबळ यांची नाराजी कायम आहे. त्यांना मंत्रिपद दिलं नाही, म्हणून राज्यतील ओबीसी संघटना आंदोलन करत आहेत. त्याचवेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नव्या वर्षात पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याच जाहीर केलं आहे. 25 जानेवारी 2025 पासून अंतरवाली-सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरु होणार आहे. आजही राज्य, देश-विदेशात महत्त्वाच्या घडामोडी घडतील, त्या तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा. अन्यथा देशात उद्रेक होईल. लोक आंदोलन करतील. बाबासाहेबांसाठी आपले प्राण देण्यास अनेक जण तयार आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर मोठा आरोप केला. त्यांनी भाजपने तिरंगा नाकारल्याचे म्हटले आहे. भाजपच्या मनात बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल श्रद्धा नाही, असा आरोप त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांच्या 293 च्या प्रस्तावावर 86 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र प्रत्यक्षात 86 पैकी 17 आमदार अद्याप अधिवेशनाला आले नसल्याची गंभीर बाब भास्कर जाधव यांनी उघड केली. हिवाळी अधिवेशनाला न फिरकलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्या कशा? याचे उत्तर विधानसभा अध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
भाजप नेते अमित शाह ५.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेत संसदेतील सोमवारी केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे.
मंत्रीपद नसले तरी नाराज होऊ नका, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालिदला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलीमागे मोठा कट रचल्याच्या आरोपाशी संबंधित खटल्यातील आरोपी उमर खालिदला करकरडूमा न्यायालयाने 7 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान त्याच्या चुलत बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
धाराशिवमध्ये गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सदावर्ते तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जात असताना हा गोंधळ घालण्यात आला.
एक देश एक निवडणूक विधेयक जेपीसीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधेयकासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. जेपीसीमध्ये काँग्रेसने नेते मनिष तिवारी, प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. जेडीयूकडून संजय झा, सपाकडून धर्मेंद्र यादव, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे जेपीसीमध्ये असणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दुपारी चार वाजता आंबेडकर मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत. अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी, असे खरगे म्हणाले. त्यांनी अत्यंत लाजिरवाणे वक्तव्य केले आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मनातलं सर्व बोलून दाखवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी मंत्रिमंडळात पाहिजे होतो. सुनील तटकरे आणि आणि प्रफुल्ल पटेल यांनीही मला मंत्रिपद देण्याचा आग्रह धरला होता. मात्र पक्षातला निर्णय हा पक्षाध्यक्षाचा, दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा? अस म्हणत भुजबळ यांनी अजित पवारांबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.
आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले, 60-70 मतं कमी झाली, असं छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत वक्तव्य केलं.
भाजप पक्ष आणि नेते महापुरुषांचा उर्मटपणे उल्लेख करतात. अमित शाहांनी उर्मटपणे बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला, असं उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. अमित शाह यांनी संसेदत विरोधकांना सुनावत “आंबेडकर आंबेडकर म्हणणं फॅशन झाली आहे” , असं शाह म्हणाले. यावरुन उद्धव ठाकरे यांनी हा निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेबांवरील केलेल्या वक्तव्याने नागपूर अधिवेशनात विरोधांनी गदारोळ घातला आहे.
छगन भुजबळ यांनी भाजपात प्रवेश करावा अशी मागणी नाशिक मेळाव्याला आलेल्या ओबीसी नेत्यांनी केली आहे.
मला मंत्रिपद न मिळाल्याने माझी आई आजारी पडली, कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते, मी त्यांना भेटायला आलो असल्याचे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.
परभणी, बीडच्या घटनेवरून केजमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर अनुयायी झाले आक्रमक. संतोष देशमुख यांच्या हत्येला दहा दिवस उलटून गेले, आत्तापर्यंत 4 जणांना अटक झाली, मात्र इतरांना अद्याप अटक नाही. तर परभणीमध्ये आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.
या दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी केजमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.
अमित शहांच्या पोटातलं ओठांवर आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काल अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आज भास्कर जाधव यांनी ही टीका केली आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं गंभीर आहे, असंही जाधव म्हणाले.
मविआ आता राहिलेली नाही, शरद पवार कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. शरद पवार शांत आहे, सुप्रिया सुळे बोलत नाही, पक्षाचे प्रवक्तेही मौन राखून आहेत. ते सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं की आता वादळ निर्माण होणार आहे , असं संजय शिरसाट म्हणाले.
नाशिक – खंजीर खुपसल्याचे बॅनर भुजबळ समर्थकांनी झळकावले
-अजित पवार, सुनील तटकरे प्रफुल पटेल यांनी छगन भुजबळ यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. खंजीर खुपसत असल्याचे बॅनर घेऊन कार्यकर्ते समता परिषदेच्या मेळाव्याला उपस्थित आहेत.
नाशिकच्या जेजुरकर लॉन्स परिसरात ओबीसी महामेळाव्याचे आयोजन, छगन भुजबळ मेळाव्यासाठी दाखल. भुजबळ आज काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मस्साजोग, बीड: संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या चारवर आली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
दिल्ली-संसद भवन परिसरात विरोधक आंदोलन करत आहेत. अमित शाहांच्या वक्तव्याचा विरोधी खासदारांकडून निषेध व्यक्त केला जातोय. खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधींकडून निषेध व्यक्त करण्यात आला. अमित शाहांनी काल राज्यसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. लोकसभा, राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.
आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे. आंबेकरांऐवजी देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल, असं वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलं होतं. अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली.
पुणे- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर थोड्याच वेळात हजर राहणार आहेत. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आला भिमा कोरेगाव चौकशी आयोग. भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते.
सरकारने आयोगाला २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आपलं काम पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्यास सांगून मुदतवाढ दिली आहे. आयोगाला दिलेली ही १६वी मुदतवाढ आहे.
नाशिक- छगन भुजबळांचा उपस्थितीत आज नाशिकमध्ये मेळावा पार पडणार आहे. संघर्ष सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ आज भूमिका मांडणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे OBC सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली. छगन भुजबळ आज प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
“भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात अडचण काय? भाजपला बाबासाहेबांच्या नावाचा द्वेष का?,” अशी टीका नितीन राऊतांनी भाजपवर केली.
दोन दिवसांच्या अनुपस्थितीनंतर अजित पवार विधानसभेत दाखल झाले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार अनुपस्थित होते.
उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तीगत अधिकार आहे. त्यावर मला टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. एकमेकांना शुभेच्छा देणं यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.
सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवालदार मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर हिला 50 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. रात्रीच्या सुमारास सांगलवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
योग्य वेळ आल्यावर छगन भुजबळांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. येत्या 1-2 दिवसात यावर पडदा पडेल, सुनील तटकरेंची माहिती
अजित पवार हे आज विधीमंडळ कामकाजात सहभागी होतील. विरोधी बाकावर जीव रमत नाही, असं शशिकांत शिंदे मला म्हणाले, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
नॉट रिचेबल असलेले अजित पवार अखेर विधिमंडळात दाखल झाले आहेत. अजित पवारांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. नागपुरातील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार हे घशाच्या संसर्गामुळे दोन दिवस अनुपस्थितीत होते.
भविष्यात शिंदे – दादांचे पक्ष राहतील की नाहीत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात यांचे पक्ष राहतील का ही शंका… शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला संघाने बैद्धिकसाठी बोलावलंय… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
बीड आणि परभणीच्या घटनांवर फडणवीस सभागृहात निवेदन देणार असल्याची माहिती समोर येत आहे…
शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी घेतली अजित पवार यांची भेट… शरद पवार यांची कधी साथ सोडणार नाही… उपमुख्यमंत्री झाल्यानं अजित पवारांना शुभेच्छा… अजित पवार यांची तब्येत ठिक नव्हती… असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं आहे…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरही निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम… उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुका गारठला…. ओझर HAL येथे 6.3 अंश सेल्सिअस… तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमान… या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा घेतला जातो आधार…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरही निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुका गारठला. ओझर HAL येथे 6.3 अंश सेल्सिअस तापमान. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमान.या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटल्या.
प्रकाश आंबेडकर राहणार सुनावणीला हजर. भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीची चौकशी भीमा कोरेगाव आयोगासमोर होत आहे. या प्रकरणात साक्षही नोंदवण्यात आल्यात. आज प्रकाश आंबेडकर 11 वाजता आयोगात हजर राहणार. त्या नंतर माध्यमांशी साधणार संवाद.
जयगड येथील जिंदाल पोर्टमधील वायू गळती प्रकरण. जिल्हा शासकीय रुग्णालय मधून डिस्चार्ज मिळालेली मुलं पुन्हा रुग्णालयात. 31 जणांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. 29 विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात, तर 2 प्रौढांवरही उपचार सुरू. पोट दुखणे, जळजळ, डोळ्यांची आग होणे, चक्कर येणे, चालल्यानंतर अशक्तपणा वाटणे असा त्रास होतोय.
राज्य सरकारच्या वयोश्री योजनेचा ज्येष्ठांना लाभ. राज्यात 13 लाख अर्ज ठरले पात्र. सर्वाधिक अर्ज नागपूर आणि पुणे विभागात. वयोवृद्ध व्यक्तींना वयोश्री योजनेअंतर्गत 3 हजार रुपये प्रतिमहिना दिले जातात. राज्यात सर्वाधिक 69 हजार अर्ज हे पुणे जिल्ह्यातील आहेत
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर डोंबिवलीत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी. शहरभरात पदाधिकाऱ्यांनी ही बॅनरबाजी करत मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष. प्रताप सरनाईक यांचा प्रवास डोंबिवलीतून सुरू झाला असून आता ते मंत्री झाल्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे सांगत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.