AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात गुंतवणुकीचा ओघ, दोन लाख जणांना मिळणार रोजगार, वाचा कोणकोणते मोठे उद्योग येणार

Maharashtra Investments : राज्यात ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या गुंतवणुकीमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्यात गुंतवणुकीचा ओघ, दोन लाख जणांना मिळणार रोजगार, वाचा कोणकोणते मोठे उद्योग येणार
| Updated on: Jan 18, 2024 | 9:02 AM
Share

मुंबई, दि.18 जानेवारी 2024 | महाराष्ट्रातील गुंतवणूकवरुन गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक आल्याचा दावा सत्ताधारी करत होते. त्यातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदे सुरु झाली. या परिषदेतील दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार झाले आहेत. तसेच ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार आहेत. यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक वाढ

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. १८ जानेवारी रोजी ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले आहे. यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे :

  • १६ जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट २५ हजार कोटी ( ५ हजार रोजगार )
  • बी सी जिंदाल ४१ हजार कोटी ( ५ हजार रोजगार)
  • जेएसडब्ल्यू स्टील २५ हजार कोटी ( १५ हजार रोजगार)
  • एबी इन बेव्ह ६०० कोटी ( १५० रोजगार)
  • गोदरेज एग्रोव्हेट १००० कोटी ( ६५० रोजगार)
  • अमेरिका स्थित डेटा कंपनी १० हजार कोटी ( २०० रोजगार)
  • १७ जानेवारी – अदानी ग्रुप ५० हजार कोटी ( ५०० रोजगार)
  • स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ११५८ कोटी ( ५०० रोजगार)
  • इंडियन ज्वेलरी पार्क ५० हजार कोटी ( १ लाख रोजगार)
  • वेब वर्क्स ५ह्जार कोटी ( १०० रोजगार)
  • लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३५०० कोटी ( १५ हजार रोजगार), नैसर्गिक
  • संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी ( ४ हजार रोजगार)

१८ जानेवारीस पुढील सामंजस्य करार होणार आहेत

  • सुरजागड इस्पात १० हजार कोटी ( ५ हजार रोजगार
  • कालिका स्टील ९०० कोटी ( ८०० रोजगार)
  • मिलियन स्टील २५० कोटी ( ३०० रोजगार)
  • ह्युंदाई मोटर्स ७ हजार कोटी ( ४ हजार रोजगार )
  • कतारची एएलयु टेक समवेत २०७५ कोटी ( ४०० रोजगार)
  • सीटीआरएल एस ( ctrs) ८६०० कोटी ( २५०० रोजगार)

विविध उद्योग समूहांशी चर्चा

दावोस येथील महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी भेट घेतली. यावेळी राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत गुंतवणकीबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर लिंकस्टाईनचे युवराज यांच्याशीही गुंतवणुकीबाबत संवाद साधण्यात आला. फ्रेंच वाणिज्य कंपनीचे थॉमस कौटॉडियर आणि मुख्य वित्त अधिकारी पॅट्रीक ट्रुअर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. दक्षिण कोरीयाच्या ग्योग्नी प्रांताचे गव्हर्नर किम डाँग यिओन यांच्याशी आज भेट होणार आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.