Maharashtra News Omicron LIVE Update | नाशिक मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरला सुरु होणार, औरंगाबादेतील शाळांबाबतचा निर्णय उद्या

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

Maharashtra News Omicron LIVE Update | नाशिक मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरला सुरु होणार, औरंगाबादेतील शाळांबाबतचा निर्णय उद्या
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला आणलं जाणार आहे. महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरिएंटचे  10 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला. तर, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात आणि मुंबईत  2 असे महाराष्ट्रात एकूण 10 रुग्ण आढळलेत. तर, राजस्थानमध्ये  9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 09 Dec 2021 22:20 PM (IST)

  जळगाव

  जळगावात ‘नो वॅक्सिन, नो पेट्रोल’

  महापालिकेचे आदेश, उद्यापासून अंमलबजावणी

  कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र पेट्रोल पंपावर दाखवावे लागणार

  हॉटेल्स, मार्केटमध्येही असतील निर्बंध

 • 09 Dec 2021 21:18 PM (IST)

  अकोला

  मुर्तिजापूर आगाराचे वाहतूक नियंत्रकाने केले विष प्राशन….

  रमेश सोळंके यांनी आर्थिक विवंचनेतून केले विष प्राशन….

  अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात केले दाखल….

  गेल्या एक महिना पासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे टेन्शन मध्ये सोळंके….

  एक महिन्यात 1500 रुपये पगार निघाल्याने घेतले टोकाचे पाउल….

  गेल्या एक महिन्यापासून संपात होते सहभागी….

 • 09 Dec 2021 21:04 PM (IST)

  नितीन राऊत 

  प्रांताध्यक्षांचा निर्णय आहे, आम्ही पक्षाचे सामान्य कार्यकर्ते..

  पत्रावर बोलू शकत नाही

 • 09 Dec 2021 21:04 PM (IST)

  नागपूर

  छोटू भोयर बाईट

  मी असमर्थता दर्शवली नाही …पत्रात मात्र काँग्रेस ने असमर्थता दर्शवली असे म्हटले आहे.

  पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर ह्यांच्या नावावर जिंकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो,

  मंगेश देशमुखला जिंकण्यासाठी मी जे जे करू शकतो ते ह्या 12 तासात करिन

  मात्र मी काही अजून असे का केले हे प्रदेश अध्यक्षांशी बोलल्यावरच सांगू शकेन

 • 09 Dec 2021 20:16 PM (IST)

  बुलडाणा

  संपकरी एसटीच्या 15 कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत कामावर होण्याची नोटीस,

  तर कामावर हजर न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे विभाग नियंत्रक यांची माहिती,

  15 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार,

  यापूर्वीच 350 च्या वर कर्मचाऱ्यांचे झालेय निलंबन,

  कामावर हजर होण्यासाठी अधिकाऱ्यांचे विविध हातखंडे

 • 09 Dec 2021 20:16 PM (IST)

  पुणे 

  – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा – अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला स्थगिती – 13 डिसेंबरपर्यंत गुन्हा दाखल न करण्याचे पोलिसांना आदेश – न्यायालयाने स्वतःच्याच निर्णयाला दिली स्थगिती – प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे होते आदेश

 • 09 Dec 2021 19:26 PM (IST)

  शिर्डी

  साईभक्तांसाठी खुषखबर …. लाडू प्रसाद विक्रीस सुरूवात … श्री साईबाबा संस्थानकडून भाविकांसाठी लाडू विक्री ‌सुरू… द्वारकामाई समोर एक काउंटर सुरू … साजूक तुपातील ‌लाडुची‌ विक्री… 25 रुपयांना ‌मिळणार 03 बुंदीचे लाडू …. भाविक आणि ग्रामस्थांच्या‌ मागणीनंतर संस्थानचा निर्णय…. इतर ठिकाणीही लवकरच सुरू होणार काउंटर…

 • 09 Dec 2021 19:26 PM (IST)

  नागपूर 

  – नागपूर विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड

  – कॉंग्रेसनं बदलविला आपला उमेदवार

  – मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेस नं बदलविला उमेदवार

  – छोटू भोयर ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना कॉंग्रेस चा पाठिंबा

  – कॉंग्रेस वर उमेदवार पदलविण्याची नामुष्की

  – उमेदवार बदलविण्याबाबत पक्ष श्रेष्ठीनं पत्र देऊन दिली संमती

  – उद्या मतदान

 • 09 Dec 2021 19:11 PM (IST)

  बाळासाहेब थोरात

  आज लोकशाही बचाव म्हणण्याची वेळ का येते

  याचा विचार करण्याची गरज आहे

  सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आज जगात 51 व्या क्रमांका वर आला आहे

  वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरु झालं आहे

  आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा लोकशाहीला होईल अस वाटलं होते

  पण 2012 पासून या तंत्रज्ञानावापर हा राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी केला गेला

  नवी झुंडशाही निर्माण झाली, त्याचा परिणाम हा मतांवर झाला

  भाजपने लोकशाही मूल्यांना तिलांजली देण्याचं काम केलं

 • 09 Dec 2021 18:51 PM (IST)

  सत्यजित तांबे

  लोकशाही दिल्लीतुन नाही तर गल्लीतून बळकट करावी लागेल

  फक्त लोकसभा आणि विधानसभेत लोकशाही बळकट करून चालत नाही

  त्यासाठी महापालिका निवडणूक महत्वाची असते

  महापालिकेत काँग्रेस बळकट व्हायला हवी

  या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी डाव्या विचारांचा तरुण हा काँग्रेस मध्ये येतो हे लक्षात घ्यायला हवं

  लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही

 • 09 Dec 2021 18:51 PM (IST)

  पुणे

  दिवसभरात 68 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात 51 रुग्णांना डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01, एकूण 02 मृत्यू. -85 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 507416 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 792 – एकूण मृत्यू -9106 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 497518 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6239

 • 09 Dec 2021 18:31 PM (IST)

  औरंगाबाद

  औरंगाबाद शहरातील शाळा सुरू करण्याबाबत उद्या होणार निर्णय

  औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे घेणार निर्णय

  उद्या सकाळी 11 वाजता शाळा सुरू करण्यासंदर्भात होणार बैठक

  दहा तारखेला शाळा सुरू करण्यासंदर्भात घेतला जाणार होता निर्णय

  कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे दिले होते सुतोवाच

  औरंगाबाद शहरातील परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे शाळा सुरू होण्याच्या शक्यता

 • 09 Dec 2021 18:30 PM (IST)

  नाशिक

  नाशिक मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबर पासून होणार सुरु

  इयत्ता पहिली ते सातवी सुरु करण्याचा निर्णय

  नाशिक मनपा शिक्षण विभागाचा निर्णय

  कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने घेण्यात आला हा निर्णय

  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा यापूर्वी घेण्यात आला होता निर्णय

 • 09 Dec 2021 18:19 PM (IST)

  भिवंडीत खड्डे बुजवण्याचे काम जोरात

  भिवंडीत खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू आहे.

 • 09 Dec 2021 16:30 PM (IST)

  परळी

  आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा पोलीस स्टेशन समोर ठिया

  आज सकाळी परळी आगारातील एसटी कर्मचारी घेऊन आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न

  जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा ठिया. सुरूच राहणार एसटी कर्मचारी

  सकाळी नऊ वाजल्यापासून पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन सुरू आहे

 • 09 Dec 2021 16:29 PM (IST)

  औरंगाबाद

  वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

  वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी खडाजंगी

  गंगापूरचे तहसीलदार आणि महावितरण अभियंत्यांना शेतकऱ्यांनी सुनावले खडे बोल

  सिध्दनाथ वडगाव उपकेंद्रावर शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन सुरूच

  गेल्या आठ तासापासून सुरू आहे शेतकऱ्यांचे आंदोलन

  वीज पुरवठा सुरळीत केल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा पावित्रा

  आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

 • 09 Dec 2021 16:29 PM (IST)

  सांगली

  एसटी कर्मचाऱ्यांचे भिकमांगो आंदोलन,,, सरकार विरोधात केली घोषणाबाजी,,, एसटी कर्मचाऱ्यानी मागितली स्वतःसाठी भीक,,, संपामुळे अनेक कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

 • 09 Dec 2021 15:19 PM (IST)

  नवी दिल्ली

  महाराष्ट्र सदनातील अव्यस्थापांचा छगन भुजबळ यांना फटका

  गेल्या तासापासून रूम बाहेर आहेत छगन भुजबळ

  महाराष्ट्र सदनसाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांना अडचणी.

  दरवाजा बाहेरून लॉक झाल्याने सूट बंद

 • 09 Dec 2021 15:18 PM (IST)

  सोलापूर

  सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी केली बदलीच्या आदेशाची होळी,

  सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

  संपावर असल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे एसटी प्रशासनाने केले आहे निलंबन

  काही जणांचे केले आहेत बदल्या

  बदली आदेश, निलंबनाच्या कागदपत्रांची केली होळी

  विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम

 • 09 Dec 2021 15:18 PM (IST)

  नाशिक

  मुंबई नाका परिसरात ‘बर्निंग बुलेट’ चा थरार

  चालत्या बुलेटने अचानक घेतला पेट

  सुदैवाने बुलेट चालकाने उडी घेतल्याने वाचला जीव

  स्थानिकानी बुलेट विझवण्याचा केला प्रयत्न

 • 09 Dec 2021 15:17 PM (IST)

  नवी दिल्ली

  दिल्लीच्या सीमेवरच आंदोलन स्थगित

  378 दिवसांपासून सुरू होत शेतकऱ्यांच आंदोलन

  15 जानेवारीला पुन्हा महत्त्वाची बैठक होणार

  केंद्र सरकारच्या लेखी आश्‍वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

  सिंघू, गाजीपुर बॉर्डर वरून शेतकरी परतायला सुरुवात

  एम एस पी बाबतचा लढा मात्र या पुढेही सुरूच राहणार

 • 09 Dec 2021 14:48 PM (IST)

  संजय राऊत

  मी वापरलेला शब्द असंसदीय नाही मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ मूर्ख अशा होतो ते हिंदी भाषेचा फार आग्रह धरतात भाजप सुशिक्षित लोकांचा पक्ष असं वाटलं होतं मी इथे दिल्लीत तो शब्द वापरला

 • 09 Dec 2021 13:11 PM (IST)

  बीडमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना पोलिसांकडून मारहाण

  बीड: माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना पोलिसांकडून मारहाण

  सय्यद अब्दुल्ला यांना पोलीस ठाण्यात मारहाण

  संतप्त नागरिकांचा पाटोदा पोलीस ठाण्याला घेराव

  हजारो नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिया

  विनाकारण मारहाण केल्याचा अब्दुल्ला यांचा आरोप

  ठाणेप्रमुखांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी

  पाटोदा शहरात तणावाचे वातावरण

  आमदार सुरेश धस पोलीस ठाण्यात पोहचले

 • 09 Dec 2021 12:40 PM (IST)

  आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत नाहीत: देवेंद्र फडणवीस

  भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांबद्दल तर बिल्कुल नाही. काल  आशिष शेलार यांच्या प्रेसचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळं त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किंवा आशिष शेलार महिलांबद्दल कोणतेही गैरशब्द वापरणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  नागपूरमध्ये भाजपचे उमदेवार चंद्रशेखर मोठ्या फरकानं विजयी होतील,  देवेंद्र फडणवीस म्हणाले. सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाताचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, असं फडणवीस म्हणाले.

 • 09 Dec 2021 11:34 AM (IST)

  खोटे गुन्हे दाखल करण्यास पळापळ सुरु, बोलविता धनी कोण आहे हे बाहेर काढणार: आशिष शेलार

  पोलीस दळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. भाजप या गोष्टींना दबणार नाही.आशिष शेलार तर झुकणार नाही. नायर रुग्णालयात चार महिन्याच्या बाळाला उपचार का मिळाला नाही. त्या बाळाच्या वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू का झाला? हे प्रश्न विचारत आहे. सत्य बाहेर येईलच, जी चौकशी करायची आहे ती करा सत्य बाहेर येईल, असं आशिष शेलार म्हणाले. यावर जी पावलं उचलली पाहिजेत ती मी उचलणार आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

  राज्यात मुस्कटदाबी सुरु आहे. किरीट सोमय्या, करुणा शर्मा, तिवारी, नेव्हीचा माजी अधिकारी, एखादा पत्रकार सरकार विरोधात बोलला तर त्याला अटक करा, केंद्रीय मंत्री असला तरी बोलला तरी मुस्कटदाबी करु असं काम सुरु आहे.याला भाजप जनसमर्थनाद्वारे उत्तर देईल.

  आज मी कोणतही राजकीय भाष्य करणार नाही. खोटे गुन्हे दाखल करण्यास पळापळ सुरु आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे बाहेर काढणार असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

 • 09 Dec 2021 10:06 AM (IST)

  शरद पवारांच्या जागी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असते तरी त्यांना खुर्ची आणून दिली असती: संजय राऊत

  राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यातील भेटी या वेगळ्या आहेत. राहुल गांधी आजही काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचं काम राहुल गांधी पाहतात. प्रियांका गांधी यांच्याशी काल भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचना घेऊन त्यांच्याशी बोललो, असं संजय राऊत म्हणाले.

  महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. महाराष्ट्राबाहेर सोबत काम करु शकतो. मात्र, मी मुंबईत गेल्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना भेटून माहिती देईन, असं संजय राऊत म्हणाले.

  लालकृष्ण आडवणी असते तिथं तर त्यांना खुर्ची दिली असती. शरद पवार यांचं वय, पवार साहेबांना होणार त्रास, आम्ही जसं मांडी घालून बसतो तसं त्यांना बसता येत नाही. महाराष्ट्रातल्या पितृतुल्य वडिलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली ते जर कुणाला आवडलं नसेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृती नसून विकृती असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्या ठिकाणी लालकृष्ण आडवणी, अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंग, लालूप्रसाद यादव यांना त्रास असता आणि ते तिथं आले असते तरी त्यांना खुर्ची आणून दिली असती. राजकीय विरोधक असले ती हे सर्व पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. मला माहिती आहे कुणाच्या काय वेदना आहेत. कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही.

  ज्यांनी आडवाणी साहेबांना उभं राहू दिलं नाही, खुर्चीचा विषय सोडाच त्यांनी यासदंर्भात विचारु नाही, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे माझे गुरु आहेत. त्यांनीच मला संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण माझे आदर्श आहेत.  हा संस्कार आणि संस्कृती मोठ्यांचा आदर करणे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं बंद करा. ही विकृती आहे, असं जर वागत राहिलात तर महाराष्ट्रात तुमचं सरकार कधी येणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं आहे.

  शरद पवार असतील किंवा त्यांच्या वयाचे, कुवतीचे नेते देशात आहेत. त्यांना बसायला खुर्ची , पाठ देणं तुम्हाला आवडत नसेल तर फुले शाहु आंबेडकर, संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

  महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची प्रकृती बिघडली आहे. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. एनसीबीनं त्यांची चाचणी करावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

 • 09 Dec 2021 08:55 AM (IST)

  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता येत्या गुरुवारी राज्य बँकेचे अधिकारी ताब्यात घेणार

  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता येत्या गुरुवारी राज्य बँकेचे अधिकारी ताब्यात घेणार

  पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना

  राज्य सहकारी बँकेचे असलेल्या 400 कोटी थकीत कर्जापोटी तारण मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

  बँकेचे अधिकारी 14 डिसेंबरला कारखान्यावर येणार

 • 09 Dec 2021 08:15 AM (IST)

  नाशिक पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  – नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी 7 पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या

  – सातपूरला महेंद्र चव्हाण,सरकारवाडा मध्ये साजन सोनवणे,भद्रकालीमध्य दत्तात्रय पवार तर मुंबई नाका मध्ये सुनील रोहकलेंची नियुक्ती

  – शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी आयुक्तांनी केल्याची जोरदार चर्चा

 • 09 Dec 2021 07:53 AM (IST)

  थंडी सुरू होताचं पुण्यात मद्याची विक्री वाढली,

  थंडी सुरू होताचं पुण्यात मद्याची विक्री वाढली,

  गेल्यावर्षीच्या तुलनेत देशी दारू, वाईन्स, बिअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ,

  देशी दारूच्या विक्रीत 3.7 टक्के, विदेशी दारू 4.1 टक्के तर बिअरच्या विक्रीत 16 टक्क्यांनी वाढ झालीये,

  उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती देण्यात आलीये…

 • 09 Dec 2021 07:36 AM (IST)

  नागपूर विभागातून काल सुटल्या सात बसेस, दिवसभरात 24 फेऱ्या

  – नागपूर विभागातून काल सुटल्या सात बसेस, दिवसभरात 24 फेऱ्या

  – बुधवारी सात बसेसमध्ये 718 प्रवाशांनी केला प्रवास

  – नागपूर विभागात काल एसटीचं 25 हजार रुपये उत्पन्न

  – नागपूर विभागात 55 एसटी कर्मचारी झाले कामावर रुजू

  – 28 दिवस लालपली होती ठप्प, सोमवारपासून एसटी काही प्रमाणात सुरु

 • 09 Dec 2021 06:28 AM (IST)

  शिवसेना मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाची तक्रारदाराला मारहाण

  शिवसेना मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाची तक्रारदाराला मारहाण

  रस्त्याची तक्रार केल्याच्या कारणावरून केली बेदम मारहाण

  संदीपान भुमरे यांचे बंधू राजू नाना भुमरे यांनी केली बेदम मारहाण

  मारहाण प्रकरणी संदीपान भुमरे यांच्या भावासह 8 जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 09 Dec 2021 06:14 AM (IST)

  भाजप आमदार प्रशांत बंब यांचं महावितरणला खरमरीत पत्र

  भाजप आमदार प्रशांत बंब यांचं महावितरणला खरमरीत पत्र

  शेतकऱ्यांची वीज बंद केल्यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणला लिहिले पत्र

  महावितरण कडून शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचा प्रशांत बंब यांचा आरोप

  महावितरणवर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करु नये असा प्रशांत बंब यांचा सवाल

  महावितरण निर्लज्जपणे शेतकऱ्यांना लुटत असल्याचा प्रशांत बंब यांचा पुनरुच्चार

  विद्युत रोहित्र सुरू न केल्यास आमदार प्रशांत बंब आंदोलनाच्या पवित्र्यात

  औरंगाबाद जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांची महावितरणने खंडित केलीय वीज

  वीज खंडित केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं सुरू आहे नुकसान

  पत्रातून प्रशांत बंब यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Published On - 6:13 am, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI