Maharashtra News LIVE Update | राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा धमकी प्रकरण, उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा

| Updated on: Jul 05, 2021 | 12:26 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा धमकी प्रकरण, उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 04 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jul 2021 10:30 PM (IST)

    राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा धमकी प्रकरण, उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा

    उस्मानाबाद : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकावल्याचे प्रकरण

    उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा, धमकवणाऱ्यास अटक

    आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असल्याची आरोपीने केली होती बतावणी

    उस्मानाबाद पोलिसांचा तपास सुरू

  • 04 Jul 2021 08:56 PM (IST)

    एमपीएससी परीक्षेसंदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार

    मुंबई : स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

    एमपीएससी परीक्षेसंदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार

    ही समिती एमपीएससी परीक्षेसंदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार

  • 04 Jul 2021 08:19 PM (IST)

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या फार्म हाऊसमध्ये सापडली अजगराची 3 पिल्ले 

    कल्याण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या फार्म हाऊसमध्ये सापडली अजगराची 3 पिल्ले

    कल्याण जवळच्या चौरे गावात आमदारांचा फार्म हाऊस

    सर्पमित्र दत्ता बॉम्बे आणि चंद्रकांत जोशी यांनी पिल्लांना सोडले जंगलात

    याआधीही या फार्म हाउसमध्ये सापडले होते चार अजगर

  • 04 Jul 2021 07:36 PM (IST)

    आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबाला सरकारे आर्थिक मदत करावी, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी 

    डोंबिवली : एमपीएससी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण

    सुशिक्षित तरुण जर आत्महत्या करत असतील तर हे आपल्या राज्यासाठी भुशावह नाही आहे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे

    मनसे आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर टीका

    सरकारने लसीकरण मोहीम जोरात सुरू करून कोरोना संपूवून जो काही खेळ चालू आहे तो बंद करावा

    उपाय असताना सरकारचे भलते  खेळ सुरू आहेत

    एमपीएससीचा घोळ संपवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहीजे

    आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबाला सरकारे आर्थिक मदत करावी

    मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

  • 04 Jul 2021 06:54 PM (IST)

    औरंगाबादमध्ये दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल

    औरंगाबाद : औरंगाबाद येथे  प्लायवूडच्या दुकानाला भीषण आग

    एन 6 मधील आझाद चौकातील दुकानात मोठी आग

    अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल

    अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

    दुकानाला लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट

    सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी नाही

  • 04 Jul 2021 06:16 PM (IST)

    आम्ही सरकारचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

    मुंबई : देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत आहेत. एकूणच राज्यातले वेगवेगळे घटक आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेत. वारकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे मांडायचे कुठे. त्यामुळे आम्ही सरकाचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही.

    माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर मांडू, जनतेमध्ये जाऊन मांडू

    सभागृहात जे मांडता येईल ते मांडण्याचा प्रयत्न करु. पण लोकशाहीला जर कुलूप लावता येत नाही. लोकशाही थांबतही नाही. त्यामुळे सभागृहात जे मांडता येईल ते तिथे मांडू. जे तिथे मांडता येणार नाही ते बाहेर मांडू. माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर मांडू, जनतेमध्ये जाऊन मांडू. पण अशा प्रकारे लोकशाहीची थट्टा तत्काळ बंद केली पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन संपवलं जातं.

    राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे

    राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. दुधाच्या दराचा प्रश्न आहे. दूध दर 15 रुपयांवर गेलेला आहे. सोयाबीन, आंबा कापूस या पिकांचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्यावर चर्चा थांबलेली आहे. धानाचा प्रश्न गंभीर आहे.

    आम्हाला टेक्निकली बोलू दिलं जाणार नाही

    आम्हाला टेक्निकली बोलू दिलं जाणार नाही, असं दिसतंय, राज्यातील अनेक प्रश्न आहेत. ते माडांयचं कुठं हा प्रश्न आहे. लोकशाहीला कुलुप लावल्यानं लोकशाही थांबेल असं जर कुणाला वाटेल तर तसं होणार नाही. प्रश्न रस्त्यावर मांडू, माध्यमांसमोर मांडू, सभागृहात मांडू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले

    हे सरकार अधिवेशनाला सामोरे जाऊ शकत नाही. ज्या प्रकारे वसुलीचे प्रकरणं समोर येत आहे. त्यामुळे सरकार अधिवेशनापासून पळ काढतं आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला .

    मराठा आरक्षणाचा हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाला रेफर दिला नाही

    इम्पेरिकल डेटा हा राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे. राज्य सरकारला उशिराने सुचलेलं शहाणपण आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही तेच आहे. जोपर्यंत राज्य मगासवर्ग आयोग मराठा समजाला मागास ठरवत नाही. आणि तो रिपोर्ट पाठवत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. अजूनही मराठा आरक्षणाचा हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाला रेफर दिला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    मगास ठवरण्याची पहिली स्टेप ही राज्यालाच करायची

    याआधी कोणत्याही समजाला मागास ठरवायचे असेल तर राज्याने त्यासंदर्भात कारवाई करावी. त्यानंतर राज्याने कारवाई करुन ती केंद्राकडे पाटवावी. एक स्टेप वाढली आहे. त्यानंतर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली की आरक्षणाचा कायदा पुन्हा राज्यालाच करायचा आहे. मगास ठवरण्याची पहिली स्टेप ही राज्यालाच करायची आहे. अजून त्याची कारवाईच सुरु केलेली नाही. कारवाईच सुरु केली नसेल तर आगामी दहा वर्षे मराठा आरक्षण कसे मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    एमपीएससी आयोगावर सदस्यच नसतील तर मुलाखती कशा होतील 

    आज एमपीएससीच्या विद्यार्थाने आत्महत्या केली आहे. हा गंभीर प्रश्न आहे. एमपीएससीवर सदस्य नेमलेले नाहीत. एमपीएससीच्या संदर्भात परीक्षा होत नाहीत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती होत नाहीत. सदस्यच नसतील तर मुलाखती कशा होतील. अशा प्रकार पास झालेले विद्यार्थी निराशेने आत्महत्या करत असतील तर राज्य सरकारला जाग आली पाहीजे. तात्काळ एमपीएससीवर सदस्य नेमले पाहीजेत. आजची घटना गंभीर अशी घटना आहे.

    सगळ्या करावाया उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई, एरंडेश्वर सहकारी सारख कारखान्यावरील कारवाई असेल, या सर्व कारवाया या न्यायालयाच्या आदेशानुसार आहेत.

    कोणाच्या भेटगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही

    कोणाच्या भेटगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजप सेना किंवा कुठल्याही पक्षाशी आमची भेटगाठ नाही. कोणाशीही आमची चर्चा नाही. भरतीय जनता पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. जनतेचा आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून लढाई करण्याची आमची तयारी आहे.

    आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्णाण झाले कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. हा धुऱ्याचा वाद नाही. आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही.

    राजकारणाला जर तरला अर्थ नसतो. परिस्थिती जी येते त्या परिस्थितीवर निर्णय होत असतात. जर तरवर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहतात.

  • 04 Jul 2021 05:07 PM (IST)

    नियुक्त्या द्या अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या, एमपीएससी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    मुंबई : एमपीएससी  करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

    2019 ला एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्या अन्यथा सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या

    19 जूनला ही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं

    413 पदांच्या नियुक्त्या या गेल्या वर्षभरापासून रखडल्या आहेत

    आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही, विद्यार्थ्यांनी पत्रातून मांडली भावना

    लवकर नियुक्त्या द्या अन्यथा आत्महत्या तरी करण्याची परवानगी द्या

    413 उमेदवारापैकी 48 उमेदवार एसईबीसीतून पात्र झालेत, त्यांच्या आरक्षणासाठी 365 विद्यार्थ्यांचा बळी का ?

    विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

    एमपीएससी नियुक्तीवरून विद्यार्थी आक्रमक

  • 04 Jul 2021 03:52 PM (IST)

    संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला जळगावमध्ये अंडे मारो आंदोलन

    जळगाव - बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला अंडे मारून केले आंदोलन

    संविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन सोनवणे यांचा नेतृत्वाखाली केले अनोखे आंदोलन

    आमदार गायकवाड यांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य

  • 04 Jul 2021 03:45 PM (IST)

    MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये : वर्षा गायकवाड

    मुंबई : MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी असे खचून जाऊ नये

    सरकार या विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक विचार करत आहे

    आजच्या अधिवेशनात हा विषय जरूर चर्चेला येईल

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन

  • 04 Jul 2021 02:55 PM (IST)

    बीडमध्ये ओबीसीच्या आरक्षणासाठी रासपचे रास्तारोको आंदोलन

    बीड: ओबीसीच्या आरक्षणासाठी रासपचे रास्तारोको आंदोलन

    ओबीसी च्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरुन बीडमध्ये रासप आक्रमक

    धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आडवला

    अर्धा तासापासून वाहतूक खोळंबली

    राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    रासपाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    पोलिसांनी घेतलं आंदोलनकर्त्यांना ताब्यात

  • 04 Jul 2021 02:55 PM (IST)

    नाशिकमध्ये छात्र भारती संघटनेचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

    नाशिक

    - नाशिकच्या हुतात्मा स्मारक मध्ये छात्र भारती संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात आंदोलन - राज्य सेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून पुण्यातील विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थी संघटना आक्रमक - राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही अनेकांना अद्याप नियुक्ती न दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये येतंय नैराश्य - ही आत्महत्या नसून या व्यवस्थेने केलेला खून आहे.छात्र भारती संघटनेचा गंभीर आरोप

  • 04 Jul 2021 02:54 PM (IST)

    हातकणंगले येथील आरोग्य सेवकाची आत्महत्या, सुसाईड नोटमुळे खळबळ

    इचलकरंजी

    हातकणंगले येथील आरोग्य सेवकांची आत्महत्या

    रमेश धोंडीराम कोरवीयाची आत्महत्या

    आरोग्य सेवकांची आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ

    वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली

    आत्महत्या करताना चिट्टी लिहिली होती चिट्टी नातेवाईकांना दाखवण्यात पोलिसांनी केली टाळाटाळ

    आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जिल्ह्यातील घटनेमुळे राज्यात माजली खळबळ

  • 04 Jul 2021 12:32 PM (IST)

    कल्याण मारहाण प्रकरण, रिक्षाचालकासह 11 जणांना अटक

    कल्याण : कोळशे वाडी मारहाण प्रकरण...

    रिक्षाचालकासह 11 जणांना अटक...

    कोळशे वाडी पोलीस थोड्याच वेळात 11 आरोपींना करणार कल्याण कोर्टात हजर...

    आरोपींना घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना..

  • 04 Jul 2021 12:31 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा- आलापल्ली मार्गावर चक्काजाम आंदोलन

    गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येत असुन आजही कमलापूर क्षेत्रातील जवळपास 60 गावे मूलभूत मूलभूत सुविधांपासून वंचित आहे , दुर्गम भागात जायला पक्के रस्ते नाही- अनेक भागात विद्युत सेवा पण पोहोचली नाही जसा विकास हवा तसा विकास कोणत्याही या भागात झालेला नाही लोकप्रतिनिधी व शासनाच्या लक्ष केंद्रित करण्यासाठी भ्रष्टाचार निवारण समिती व गावकऱ्यांकडून अल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आला दोन तास वाहतूक पूर्णपणे या राष्ट्रीय महामार्गावर बंद होती

    या आंदोलनात काही प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच पण उपस्थित असुन विकासाकडे शासन लक्ष केंद्रित करण्याचे काम हे आंदोलन मार्फत करण्यात आले

  • 04 Jul 2021 10:15 AM (IST)

    डोंबिवलीतील मेडिकलमध्ये चोरी, औषध आणि रोख रक्कम लंपास

    डोंबिवली

    डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरातील घटना

    एस के मेडिकल मध्ये चोरी

    काही औषधे आणि रोख रक्कम चोरांनी केली लंपास

    मानपाडा पोलिसांनी सुरू केला तपास

    एका आठवड्यात दोन मेडिकलमध्ये चोरी

  • 04 Jul 2021 10:05 AM (IST)

    पोलिसांकडून दडपशाही, पुढचा मोर्चा न सांगता काढू, नरेंद्र पाटलांचा इशारा

    सोलापूर - पुढचा मोर्चा न सांगता काढू, नरेंद्र पाटील यांची माहिती

    पोलिसांकडून दडपशाही होत आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी करून मोर्चेकरयांना अडवण्यात येत आहे

    आजच्या मराठा मोर्चा ला जाणून बुजून सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली

    पुढील मोर्चा न सांगता काढू असा इशारा

    बाईट-नरेंद्र पाटील , माजी आमदार तथा आयोजक मराठा आक्रोश मोर्चा.

  • 04 Jul 2021 10:04 AM (IST)

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचं निधन

    नाशिक

    - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचं निधन

    - प्रख्यात कापड व्यापारी म्हणूनही ओळख

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कपाडिया यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन.

    ते 76 वर्षांचे होते.

    नाशिकच नव्हे तर राज्यातील व्यापारी वर्गाचे प्रमुख नेते,रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन अध्यक्ष,ऑल इंडिया रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन अध्यक्ष या पदांवरही ते होते

    - राज्यातील महापालिकांमधील जकात हटविण्यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला आलं होतं यश

  • 04 Jul 2021 07:48 AM (IST)

    बार्शीत रिकाम्या बाटल्या गोळा करणाऱ्या व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू

    बार्शी - रिकाम्या बाटल्या गोळा करणाऱ्या व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू ;

    काल दुपारी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

    आज पहाटे त्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीवर तरंगत असल्याचा दिसून आले .

    हा व्यक्ती रोज या परिसरातील रिकाम्या बाटल्या गोळा करत असल्याचे बोलले जात आहे

  • 04 Jul 2021 07:47 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक आघाडीचा पेच अद्याप कायम

    नागपूर -

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणूक आघाडीचा पेच अजूनही कायम

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार की नाही या कडे लक्ष

    प्रदेश कार्यकारिणीच्या निर्णया कडे लागलं आहे कार्यकर्त्यांचा लक्ष

    भाजप ची लिस्ट तयार असल्याची माहिती

    तर या निवडणुकी करीता आता पर्यंत 17 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले

  • 04 Jul 2021 07:26 AM (IST)

    सोलापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आक्रोश मोर्चा

    सोलापूर- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आक्रोश मोर्चा

    अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

    सकाळी 11 वाजता निघणार मोर्चा

    छत्रपती संभाजी महाराज चौक ते चार पुतळा परिसरापर्यंत निघणार मोर्चा

  • 04 Jul 2021 07:07 AM (IST)

    मुंबई-गुजरात हायवेवर चालत्या कारला आग, वाहनांची कोंडी

    विरार गुजरात - मुंबई हायवे वर कारने घेतला पेट नायगाव येथे कारने घेतला पेट चालत्या कारने घेतला पेट मुंबईकडे येत होती कार आगीमुळे ट्राफिक जाम
    1 ते 2 किलोमीटरची लांब रांग
  • 04 Jul 2021 07:04 AM (IST)

    MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, पुण्यातील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    पुणे

    MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही; स्वप्नील लोणकरची आत्महत्या सुमारे दीडवर्षापूर्वी  लोकसेवा आयोग  परिक्षा उत्तीर्ण  होऊनही नोकरी  मिळत नसल्यामुळे  केली आत्महत्या गळफास घेऊन केली आत्महत्या पुण्यातील  फुरसंगी येथे घडली घटना 29 जूनला केली आत्महत्या

  • 04 Jul 2021 07:03 AM (IST)

    तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच, पाच कामगार जखमी

    पालघर

    बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच

    भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट

    स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती

    जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

    अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

    शर्थीचे प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

Published On - Jul 04,2021 6:53 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.