Maharashtra News LIVE Update | किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन

| Updated on: Oct 15, 2021 | 9:49 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 15 Oct 2021 05:11 PM (IST)

  किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन

  किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन

  यावेळी किरीट सोमय्या यांची ठाकरे सरकारवर टीका

  सर्व भ्रष्टाचारी मंत्री जेलमध्ये जातील, असा सोमय्यांचा दावा

  भ्रष्टाचाराचा रावण जाळतोय, किरीट सोमय्यांचं वक्तव्य

  सोमय्यांची प्रतिक्रिया :

  हे एक प्रतिकात्मक आहे

  महाराष्ट्रातील जनता या घोटाळेबाज सरकारचा एकवेळी दहन करणार

  उद्धव ठाकरे सरकारचा मंत्री जेलमध्ये जाणार

  अनिल देशमुख, भावना गवळी व इतर जण जेलमध्ये जाणार, जितेंद्र आव्हाड जाऊन आले

  पवार कुटुंबीय कुठे आहेत?

  अजित पवार यांच्या बेनामी प्रॉपर्टी बाहेर काढली

  चला भ्रष्टाचारी रावणचे दहन करुया

 • 15 Oct 2021 04:18 PM (IST)

  पंकजा मुंडे यांनी केंद्राच्या कामावरही बोलावं, त्यांची स्थिती गोंधळलेली : धनंजय मुंडे

  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  कोरोना सारखी संकटे भविष्यात आम्हा कोणावर ही येऊ नये

  मधल्या काळात मराठवाड्यात अतिवृष्टी आणि ढग फुटीचं संकट शेतकऱ्यांनी पाहिलं, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी 10 हजार कोटींचे पॅकेज दिले, त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानतो

  आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे

  500 लोकसंख्या असणाऱ्या वस्तीमध्ये ग्रामपंचायतमध्ये अद्यावत संविधान भवन बांधण्यात येईल

  सामाजिक न्याय विभागाची नवीन योजना जाहीर

  या वर्षांपासून संविधान भवन बांधण्याचा कार्यक्रम करतोय

  महाराष्ट्रतल्या बाधित तमाम शेतकऱ्यांना लवकरच मावेजा आणि पीक विमा जमा होईल

  पक्षाचे राज्याचे प्रमुख आपल्या घरी आल्यावर आपण स्वागत करतो , कार्यकर्ता म्हणून मला सवय आहे,

  पंकजा मुंडेही गेल्या 5 वर्ष मंत्री होत्या, त्यांनी भाषणात एक गोष्ट कबुल केली. मी मंत्री असताना ऊसतोड मजुरांना न्याय देता आले नाही, अशी कबुली दिली. मग त्यांनीही मंत्रिपद किरायाने दिले का?

  त्यांचाच पक्ष सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे

  ईडी लावली, सीआयडी लावली

  पंकजा मुंडे यांनी केंद्राच्या कामावरही बोलावं

  पंकजा मुंडेंची स्थिती गोंधळलेली

 • 15 Oct 2021 02:28 PM (IST)

  भ्रष्टाचाराचा रावण तयार केल्याने मनपा देणार किरीट सोमय्या यांना नोटीस

  भ्रष्टाचाराचा रावण तयार केल्याने मनपा देणार किरीट सोमय्या यांना नोटीस, किरीट सोमय्या राहत असलेल्या सोसायटीलाही नवघर पोलिसांची नोटीस

  - सिनियर पीआय सुहास कांबळे यांनी दिली निलम नगर सोसायटीला नोटीस

  - रावणावर असलेला मजकूर हा आक्षेपार्ह्य असल्याने तो काढा, असा पोलिसांचा नील सोमय्या यांना सल्ला

 • 15 Oct 2021 12:29 PM (IST)

  वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल

  हिंगोली -

  वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल

  खासदार ,आमदार,शिवसेनेचे माजी मंत्री यांच्या सह 400/500जणांवर गुन्हा दाखल

  सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

  वसमत शहर  पोलिसात गुन्हा दाखल

 • 15 Oct 2021 12:13 PM (IST)

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढल्याप्रकरणी वसमतमध्ये गुन्हा दाखल

  हिंगोली- वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  खासदार, आमदार, शिवसेनेचे माजी मंत्री यांच्या सह 400/500जणांवर गुन्हा दाखल

  सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

  वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल

 • 15 Oct 2021 11:46 AM (IST)

  ठाण्यातील अभियंता अनंत कसमुसे मारहाण प्रकरणात किरीट सोमय्यांनी घेतली अनंत करमुसेंची भेट

  ठाण्यातील अभियंता अनंत कसमुसे मारहाण प्रकरणात किरीट सोमय्यांनी घेतली अनंत करमुसेंची भेट

  - अनंत करमुसे आणि वकिल अनिरुद्ध गानू यांना घेऊन काही वेळात वर्तक नगर पोलीस ठाण्यात जाणार…

  - पोलिस ठाण्यात प्रकरणाचा फाॅलोअप घेणार…

  - घरातील लोकांची सोमय्यांनी केली विचारपूस…

 • 15 Oct 2021 11:36 AM (IST)

  किरीट सोमय्यांनी घेतली अनंत करमुसेंची भेट, पोलीस ठाण्यातील प्रकरणाचा फाॅलोअप घेणार 

  ठाणे : ठाण्यातील अभियंता अनंत कसमुसे मारहाण प्रकरणात किरीट सोमय्यांनी घेतली अनंत करमुसेंची भेट

  - अनंत करमुसे आणि वकिल अनिरुद्ध गानू यांना घेऊन काही वेळात वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाणार

  - पोलीस ठाण्यात प्रकरणाचा फाॅलोअप घेणार

  - घरातील लोकांची सोमय्यांनी केली विचारपूस

 • 15 Oct 2021 11:05 AM (IST)

  खर्डा येथील शिवापट्टण भुईकोट किल्यावर सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना

  अहमदनगर - जामखेड येथील खर्डा येथील ऐतिहासिक शिवापट्टण भुईकोट किल्यावर सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना

  भगव्या जेंड्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

  तर पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात ध्वज फडकविणार

 • 15 Oct 2021 10:39 AM (IST)

  ठाण्यात काय सुरू आहे, प्रताप सरनाईक लुटतो, जितेंद्र आव्हाड किडनॅपिंग करतो - किरीट सोमय्या

  किरीट सोमय्या

  - जितेंद्र आव्हाड या रावणामधील एक राक्षस

  - वर्षांपूर्वी पोलीस अंगरक्षकाचा ऊपयोग अनंत करमुसेला मारण्यासाठी केला, ऊद्धव ठाकरे वाचवत होते, न्यायालयाने निकाल दिला, बातमी दाबण्याचा प्रयत्न केला,

  - राज्यपालांना विनंती करणार की जितेंद्र आव्हाड यांची हाकालपट्टी झाली पाहीजे

  - ठाण्यात काय सुरू आहे, प्रताप सरनाईक लुटतो, जितेंद्र आव्हाड किडनॅपिंग करतो

  - सोलापुरात रविवारी जाणार, दोन चार जणांच्या संपत्तीसमोर सेल्फी काढणार, मग कुठला सेल्फी फिट बसतो ते पाहतो

  - ऊद्धव ठाकरेंचे १९ बंगल्याचे घेटाळे मी बाहेर काढले, ते काय भाजपमध्ये येणार का? मी हे या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी नाही तर यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी करतोय

  - हे लुटारूंचे सरकार, हे काय धडाडणार, ३१ डिसेंबरपर्यंत अर्धे मंत्री आणि नेते हे तुरूंगात असणार

 • 15 Oct 2021 10:36 AM (IST)

  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपा लागली कामाला

  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपा लागली कामाला

  उद्या भाजपा नगरसेवकांसाठी आयोजित केली कार्यशाळा,

  कार्यशाळेत नगरसेवकांचे घेतले जाणार पाठ,

  चंद्रकांत पाटील उद्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्याची शक्यता,

  भाजपानं सुरू केली मोर्चेबांधणी,

  तीन सत्रात उद्या भाजपा नगरसेवकांची कार्यशाळा ...

 • 15 Oct 2021 10:35 AM (IST)

  व्यसनाधीन तरुणांनी जाळली ट्रॅव्हलर गाडी, चंद्रपूर शहरातील पंचशील चौक येथील घटना

  चंद्रपूर :

  व्यसनाधीन तरुणांनी जाळली ट्रॅव्हलर गाडी...

  चंद्रपूर शहरातील पंचशील चौक येथे मध्यरात्रीच्या दरम्यान ची घटना,

  नशेच्या धुंदीत झालेल्या वादातून झाला प्रकार,

  पंचशील चौक परिसरातील नागरिकांचा या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा रोज त्रास होत असल्याचा आरोप आणि त्यांना तात्काळ तडीपार करण्याची नागरिकांची मागणी

 • 15 Oct 2021 10:33 AM (IST)

  कोल्हापुरात पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  कोल्हापूर

  कोल्हापुरात पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील घटना

  राजेंद्र गणपती पाटील अस अत्याचार करणाऱ्या पोलिसाचं नाव

  राजेंद्र पाटील पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावचा

  संबंधित पोलिस मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती

  मुलगी गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस

  आरोपी पाटील विरोधात पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  घटनेमुळे खळबळ

 • 15 Oct 2021 09:15 AM (IST)

  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज सीमोल्लंघन सोहळा पार पडला

  तुळजाभवानी मातेची आज पूजा करून देवीला 108 साड्यात गुंडाळून देवीची माहेरहून आलेल्या पलंग पालखीमधून प्रदक्षिणा घालण्यात आली

  त्यानंतर देवीची मंचकी निद्रा सुरू झाली

  तुळजाभवानी देवी पौर्णिमेपर्यंत मंचकी निद्रेसाठी शेजघरात ठेवली जाणार आहे,

 • 15 Oct 2021 08:08 AM (IST)

  दसऱ्याच्या निमित्ताने सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला सोन्याची साडी

  पुणे -

  दसऱ्याच्या निमित्ताने सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला सोन्याची साडी

  सुमारे १६ किलो सोन्याची साडी परिधान केलेले देवीचे सुवर्णवस्त्रास्तील रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

 • 15 Oct 2021 08:06 AM (IST)

  नाशिक गरबा नृत्याच्या कार्यक्रमावर पोलिसांची कारवाई

  नाशिक - गरबा नृत्याच्या कार्यक्रमावर पोलिसांची कारवाई

  अशोका मेडीकोअर हॉस्पिटलच्या आवारातच काल रात्री सुरू होता धांगडधिंगाणा

  हॉस्पिटल प्रशासनाकडून कोरोनाचे सर्व नियम पायदळी

  कार्यक्रमात शंभर दिडशे महिला पुरुष सहभागी

  मुंबई नाका पोलिस स्टेशनला हॉस्पिटलचे एच आर, मॅनेजर आणि म्युझिक सिस्टीम ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल

 • 15 Oct 2021 08:05 AM (IST)

  विजयादशमी निमित्ताने आज संत तुकाराम महाराज मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय

  पुणे

  -विजयादशमी निमित्ताने आज संत तुकाराम महाराज मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय

  -विविध देशी-विदेशी फुलांनी तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट

 • 15 Oct 2021 08:05 AM (IST)

  नागपुरातील महाविद्यालय होणार 20 ऑक्टोबरपासून सुरू

  नागपूर -

  नागपुरातील महाविद्यालय होणार 20 ऑक्टोबरपासून सुरू

  महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश

  लसीचे दोन्ही डोज घेतलेल्या विध्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

  महाविद्यालय 50 टक्के च्या उपस्थित सुरू होणार

  विध्यार्थ्यांना मिळणार दिलासा

  ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नाही त्यांनी ऑनलाइन वर्ग करावा लागणार

 • 15 Oct 2021 08:02 AM (IST)

  नाशिक शहरात दसऱ्याच्या निमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

  नाशिक शहरात दसऱ्याच्या निमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

  सकाळपासून देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांग..

  ऐतिहासिक सांडव्या वरच्या देवी मंदिरात महाआरतीला सुरुवात..

  मास्क,सोशल डिस्टनसिंग पाळत भाविक देवी चरणी

 • 15 Oct 2021 08:02 AM (IST)

  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महसूल प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला 60 कोटी 18 लाख रुपयांचा प्रस्ताव

  सोलापूर -

  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महसूल प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला 60 कोटी 18 लाख रुपयांचा प्रस्ताव

  जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील 79 हजार 440 शेतकऱ्यांचे झाले नुकसान

  67 हजार 194 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्रस्तावात माहिती

  जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पाठविला राज्यसरकारकडे प्रस्ताव

 • 15 Oct 2021 08:01 AM (IST)

  दसरा सण असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

  पंढरपूर -

  साडेतीन मुहुर्तापैकि एक असा दसरा सण असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

  जवळपास पन्नास हजार भाविक पंढरीत दाखल

  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी

  मंदिर प्रशासनाकडून कोरोनाचे नियम पाळून दिवसाला दहा हजार भाविकाना दिले जाते मुख दर्शन

 • 15 Oct 2021 08:00 AM (IST)

  सोलापूर जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम केली अदा

  सोलापूर जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम केली अदा

  एफआरपीची रक्कम अदा केलेल्या 18 साखर कारखान्यांना 15 ऑक्टोंबर पासून गाळप हंगाम चालू करण्यास परवानगी

  ज्या कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी दिली नाही अशा 21 कारखान्याना अद्यापही गाळप परवाना नाही

  जिल्ह्यातील 39 साखर कारखान्यापैकी 34 साखर कारखान्यांनी गाळप  करण्यासाठी साखर आयुक्तांकडे केला होता अर्ज

 • 15 Oct 2021 08:00 AM (IST)

  आईचा खून करून फरार  झालेला मुलगा गजाआड

  सोलापूर - आईचा खून करून फरार  झालेला मुलगा गजाआड

  श्रीराम नागनाथ फावडे  याला बार्शी पोलिसांनी रत्नागिरी येथून घेतले ताब्यात

  बार्शी शहरातल्या वाणी प्लॉट येथे चार दिवसापूर्वी श्रीराम फावड्याने केला होता जन्मदात्या आईचा खून

  रात्री झोपेत असताना आईच्या डोक्यात दगड घालून श्रीराम फावडेने केला होता आईचा खून

  मृतदेह बाहेर ओढत आणून झुडपात टाकून झाला होता फरार

 • 15 Oct 2021 07:59 AM (IST)

  क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला कुटुंबीयांकडून 4500 रुपयांची मनीऑर्डर

  क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला कुटुंबीयांकडून 4500 रुपयांची मनीऑर्डर

  - कारागृह प्राधिकरणाला पाठवावी लागली मनी आमर्डर

  - हे पैसे आर्यन खानच्या कॅन्टीनच्या खर्चाच्या रूपात कूपनच्या स्वरूपात दिले जातात

  - जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपींना महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते जे 4500 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही

 • 15 Oct 2021 07:58 AM (IST)

  म्युकर मायक्रोसिस नंतर पोस्ट कोविड रुग्णांसमोर मोठे आव्हान

  पुणे

  म्युकर मायक्रोसिस नंतर पोस्ट कोविड रुग्णांसमोर मोठे आव्हान

  म्युकरमायकोसिसनंतर आता मणक्‍यात बुरशी होण्याचा धोका

  असा संसर्ग झालेले चार रुग्ण पुण्यात आढळले

  हा प्रकार दुर्मिळ असून ही बुरशी मणक्‍याच्या पोकळीत वाढत असल्याने, शस्त्रक्रिया आणि उपचार करणे अवघड

  संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग यांची माहिती

 • 15 Oct 2021 07:57 AM (IST)

  दिवाळीपर्यंत 100 टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न करा, अजित पवारांच्या सूचना

  अजित पवार -

  - दिवाळीपर्यंत 100 टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न करा,

  - आपल्याकडे लस उपलब्ध आहे,

  - राज्यात 9 कोटी लसीकरण झाले आहे

  - काल दिवसभरात राज्यात 6 लाख 41 हजार लोकांचे लसीकरण झाले आहे,

  - याचा वेग आपल्याला वाढवायचा आहे

  -इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची गती चांगली आहे

  - जगात बऱ्याच ठिकाणी तिसरी लाट आली आहे,

  - लहान मुलांना लसीकरण करण्याचं आमचं नियोजन आहे,

  - बंधनं , नियम पाळून सण साजरा करूया

 • 15 Oct 2021 07:56 AM (IST)

  'क्या हुवा तेरा वादा' राष्ट्रवादी विचारणार भाजपला सवाल

  पुणे

  'क्या हुवा तेरा वादा' राष्ट्रवादी विचारणार भाजपला सवाल

  सत्ताधारी भाजपने दिलेली आश्‍वासने पुर्ण झालेली नसल्याचा राष्ट्रवादीचा दावा

  राष्ट्रवादी सोशल मिडीयावर भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून देण्यात येणार

  त्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ' क्‍या हुआ तेरा वाद..' ही प्रश्‍न मालिका राबवणार

 • 15 Oct 2021 07:53 AM (IST)

  पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी पाच हजारांच्या आत

  पुणे :

  पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी पाच हजारांच्या आत

  सक्रिय रुग्णांचा हा आकडा तब्बल साडेआठ महिन्यांच्या खंडानंतर गुरुवारी पुन्हा पाच हजारांहून कमी

  याआधी १ फेब्रुवारी २०२१ ला हा आकडा पाच हजारांच्या आत गेला होता, असे आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या कोरोना रुग्णांच्या अहवालाद्वारे स्पष्ट

 • 15 Oct 2021 07:47 AM (IST)

  नाशिक शहरात दसऱ्याच्या निमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

  नाशिक शहरात दसऱ्याच्या निमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

  सकाळपासून देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांग..

  ऐतिहासिक सांडव्या वरच्या देवी मंदिरात महाआरतीला सुरुवात..

  मास्क,सोशल डिस्टनसिंग पाळत भाविक देवी चरणी

Published On - Oct 15,2021 6:09 AM

Follow us
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप.
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर.
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?.
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप.
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून...
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून....
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'.
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?.