Maharashtra News Live Update : ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दिला एकला चलो रे चा नारा

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दिला एकला चलो रे चा नारा
सांकेतिक फोटो

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 16, 2022 | 11:12 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठवरले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 16 Jan 2022 10:21 PM (IST)

  डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या पाईपलाईन रोडवर विचित्र अपघात

  अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या पाईपलाईन रोडवर विचित्र अपघात

  कार, कंटेनरची लॉरी आणि बाईक यांचा झाला अपघात

  मिरची व्हिलेज ढाब्यासमोरच झाला विचित्र अपघात

  अपघातात कारच्या मागील भागाचा चक्काचूर, तर बाईकचंही मोठं नुकसान

  दोन वाहनांना धडक देत कंटेनर लॉरी डिव्हायडर वर चढली

  सुदैवानं या अपघातात कुणालाही इजा नाही

  पोलिसांनी लॉरी चालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती

 • 16 Jan 2022 06:15 PM (IST)

  अमरावती

  अमरावती आमदार रवी राणा यांच्या घरासमोर त्यांच्या समर्थक महिलांची पुन्हा नारेबाजी

  पुन्हा एकवटल्या राणा समर्थक महिला

  जवळ पास 14 तासंपासून राणा दाम्पत्य नजर कैदेत

 • 16 Jan 2022 06:14 PM (IST)

  बीड

  भरधाव कार झाडावर आदळली

  भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर

  माजलगाव तालुक्यातील तेलगाव जवळील घटना

  मयत नांदेड जिल्ह्यातील भोकरचे रहिवासी

  अपघातात कार चकणाचुर

  जेसीबीच्या साहाय्याने मृतांना बाहेर काढले

 • 16 Jan 2022 06:13 PM (IST)

  पंजाब 

  पंजाब मधील विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार ?

  पंजाबचे मुख्यमंत्री चरनजित channi यांच्यानंतर भाजपकडूनही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

  16 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास यांचा गुरू पर्व कार्यक्रम असल्याने निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

  निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण पंजाब राज्याच लक्ष

 • 16 Jan 2022 06:13 PM (IST)

  पुणे

  आसामला भरतीसाठी गेलेल्या मुलांची अखेळ सुटका

  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष घातल्यानंतर झाली सुटका,

  एकुण 80 जणांना आसाममधून सोडलं,

  उद्या परवा मुलं महाराष्ट्रात दाखल होणार,

  सगळ्या मुलांची चाचणी करून मुलांना सोडलं,

  1 तारखेला महाराष्ट्रातून मुलं ही आसाम रायफल्स भरतीसाठी गेली होती...

  रेल्वेने मुलं महाराष्ट्रात येणार,

 • 16 Jan 2022 05:49 PM (IST)

  कोल्हापूर

  चंद्रकांत पाटील बाईट

  On एसटी कर्मचारी संप

  हे अमानवी सरकार,हे खुनी सरकार आहे

  यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  अनिल परब तुम्हाला देवेन्द्रजींनी हा प्रश्न कसा सुटेल हे समजावून सांगितलं

  पण मुख्यमंत्री तुम्हाला उपलब्ध होत नाहीत का

  हा संप मोडून काढायचा आहे

  यांना जमिनी लाटायच्या आहेत, उद्धवजी तुम्हाला याची कल्पना नाही .......................

  On अमरावती

  महापौरांना सरकार चा दबाव असेल

  राणा दाम्पत्याला सर्व ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होतोय, जनता यांना माफ करणार नाही ............

  On राजेश क्षीरसागर

  पडल्यावर आमच्यामुळे निवडून आलात तेव्हा भाजप सोबत नव्हती का

  कोथरूड ला माझी सीट धोक्यात असताना ही मी तुमच्या प्रचाराला आलो ............... On नवनीत राणा आरोप

  उद्धवजीना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी आणखी काय काय करावं लागणार आहे..

  अजाण स्पर्धा घ्यावी लागते ...............

  On ठाणे

  यावर बोललो तर यांना सत्तेत येण्याच्या घाई आहे असा आरोप आमच्या वर होईल

  त्यांची भांडण त्यांना लखलाभ

  आपासतल्या भांडणामुळे सरकार पडेल असे मी म्हणालो आहे ......... On संजय राऊत

  चिंता करायला सरकार समर्थ आहेत तर बघा लोक कसे बसले आहेत

  तुमच्या दंडात ताकद किती आणि छातीत टाकत किती हे पहा

  हे सरकार पैसे लुटायला समर्थ आहे

  संजय राऊत तुमची लायकी काय

  लायकी शब्द चुकीचा तो मागे घेतो पण तुमचं कर्तृत्व काय

  चायना आणि भारत प्रश्नासाठी मोदी समर्थ आहेत

  पडल्यावर आमच्यामुळे निवडून आलात तेव्हा भाजप सोबत नव्हती का

  कोथरूड ला माझी सीट धोक्यात असताना ही मी तुमच्या प्रचाराला आलो ............... On नवनीत राणा आरोप

  उद्धवजीना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी आणखी काय काय करावं लागणार आहे..

  अजाण स्पर्धा घ्यावी लागते ...............

  On ठाणे

  यावर बोललो तर यांना सत्तेत येण्याच्या घाई आहे असा आरोप आमच्या वर होईल

  त्यांची भांडण त्यांना लखलाभ

  आपासतल्या भांडणामुळे सरकार पडेल असे मी म्हणालो आहे ......... On संजय राऊत

  चिंता करायला सरकार समर्थ आहेत तर बघा लोक कसे बसले आहेत

  तुमच्या दंडात ताकद किती आणि छातीत टाकत किती हे पहा

  हे सरकार पैसे लुटायला समर्थ आहे

  संजय राऊत तुमची लायकी काय

  लायकी शब्द चुकीचा तो मागे घेतो पण तुमचं कर्तृत्व काय

  चायना आणि भारत प्रश्नासाठी मोदी समर्थ आहेत

 • 16 Jan 2022 04:49 PM (IST)

  ठाणे

  ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दिला एकला चलो रे चा नारा

  ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत

  ठाणे महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहूमत आणि एकहाती सत्ता यासाठी कामाला लागल्याचे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले

  युतीबाबत निर्णय वरीष्ठ नेते घेणार असले तरी महापौर आणि ठाण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझे मत युतीच्या बाजूने नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

  शिवसेनेच्या नगरसेवकांचे देखील हेच मत असल्याची नरेश म्हस्के यांची माहिती

 • 16 Jan 2022 04:49 PM (IST)

  चंद्रपूर

  घाबरलेल्या चितळाची उडी झाली वायरल,

  जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण तृणभक्षी असलेल्या चितळाची थक्क करणारी उडी,

  या उडीचे नेमके ठिकाण आणि कुणी शूट केली याबाबत निश्चिती नाही,

  मात्र पाळीव कुत्री मागे लागल्याने चितळाने तलावावर पाणी पिण्यासाठी आल्यावर चितळाने ठोकली धूम,

  आ वासून बघत रहावी अशी चितळाची उडी बघून तुम्ही देखील व्हाल आनंदी,

  एरवी केवळ आपल्या हजेरीने पर्यटकांना आनंदी करणारे चितळ आपल्या उडीने समाजमाध्यमांवर झाले भलतेच प्रसिद्ध

 • 16 Jan 2022 04:48 PM (IST)

  मनीषा कायंदे ऑन विरेन शहा

  मराठीत ठळक अक्षरात दुकानावर पाट्या लावल्या पाहिजेत असा निर्णय राज्य सरकारने घेतलाय मात्र या निर्णयाला वीरेन शहा सारखे लोक विरोध करत आहेत आणि धार्मिक रंग देऊन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल

 • 16 Jan 2022 04:48 PM (IST)

  विरार

  विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या दोन माजी नगरसेवकांवर्ती गुन्हा दाखल झाला आहे.

  अक्रम शेख,जिनत शेख,असे गुन्हा दाखल झालेल्या दोन माजी नगरसेवकांची नावे आहेत.

  कोविड नियमांचे उल्लंघन करून क्रिकेटचे सामने भरवले होते.या ठिकाणी क्रिकेटर,प्रेक्षक,आणि संयोजक यांनी गर्दीकरून विना मास्क,कोविड नियमांचे उल्लंघन केलं आहे.

  बहुजन विकास आघाडी पुरस्कृत,विरार पूर्वेच्या गोपचर पाडा मकवाना कॉम्प्लेक्स येथे एका मोकळ्या जागेवर जे.डी.एस.क्रिकेट क्लब आयोजित अंडर-20 प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  250 ते 300 लोकांनी मास्क न घालाता ,सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला आहे. या मध्ये बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक सुद्धा यात विना मास्क आढळून आले आहेत.

  या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात संयोजक दोन माजी नगरसेवकांवर कलम 269,270,IPC सह 135, प्रमाणे महाराष्ट्र पोलीस उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • 16 Jan 2022 04:48 PM (IST)

  गोवा

  उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून पेडणेतून निवडणूक न लढवण्याचे संकेत

  अपरिहार्यतेमुळे वेगळा निर्णय घेत असल्याचे सांगत 22 वर्षे साथ दिल्याबद्दल पेडणेवासीयांचे मानले आभार

  आजगावकर भाजपच्या उमेदवारीवर मडगावातून लढण्याची शक्यता

 • 16 Jan 2022 03:31 PM (IST)

  पुणे

  - काँग्रेसच्या महिला आघाडीचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन,

  - केंद्र सरकारची उज्वला गॅस योजने फसवी असल्याचा काँग्रेसचा आरोप,

  - महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन,

  - पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन

 • 16 Jan 2022 03:07 PM (IST)

  अमरावती

  खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  नवनीत राणा नजरकैदेतुन आल्या घराबाहेर

  नवनीत राणा करत आहे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

 • 16 Jan 2022 02:29 PM (IST)

  नवी दिल्ली

  नवी दिल्ली भाजप मुख्यालयात महत्त्वाची बैठक सुरू

  गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक सुरू

  उत्तराखंड आणि गोवा निवडणुकीसंदर्भात होणार महत्त्वपूर्ण चर्चा

  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बैठकीला उपस्थित

  नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात बैठकीला सुरुवात

  गोवा उमेदवारांची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

 • 16 Jan 2022 02:09 PM (IST)

  अमरावतीच्या दर्यापुरातही तणाव वाढला, शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नका, लोकांंची मागणी

  अमरावती : अमरावतीच्या दर्यापुरातही तणाव वाढला

  दर्यापुरात पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेचे विरुगिरी

  दर्यापुरात शेकडो कार्यकर्ते चढले पाण्याच्या टाकीवर

  शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नका -दर्यापुरात आक्रोश

  रात्री दर्यापुरात शिवसेनेच्यावतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता

  दर्यापूर येथे बसविलेला पुतळा प्रशासनाकडून हटवण्याच्या हालचाली सुरू

  दर्यापुरात काँग्रेस वगळता सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते रस्त्यावर

 • 16 Jan 2022 02:07 PM (IST)

  पुण्यातील सय्यदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे प्रशासनाविरुद्ध रेल रोको आंदोलन

  पुण्यातील सय्यदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे प्रशासनाविरुद्ध रेल रोको आंदोलन
   
  - दुरुस्तीचे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हा कायमचा बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव, राष्ट्रवादीचा आरोप
   
  - दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
   
  - पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी .
 • 16 Jan 2022 12:22 PM (IST)

  विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भाजपचे आंदोलन

  नांदेड: विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

  आंदोलनकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट

  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर रांगोळी काढण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

  आंदोलकांना थांबवताना झाली मोठी झटापट

  काही आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

 • 16 Jan 2022 11:59 AM (IST)

  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन

  मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह संवाद साधत आहेत. त्यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं. फुटबॉल हा पायाने खेळायचा खेळ असला तरी त्याला बुद्धी लागते. हा खेळ खूप वेगात चालतो. फुटबॉल वर्ल्डकमध्ये भारताच्या टीमने दमदार कामगिरी केली पाहिजे. आपली टीम वर्ल्डकप जिंकू शकते. सरकार मदतच नाही तर प्रोत्साहनदेखील देईल.

 • 16 Jan 2022 11:49 AM (IST)

  कल्याण व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण, केडीएमसीचे माजी नगरसेवक सचिन खेम यांना अटक

  कल्याण : व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण

  केडीएमसीच्या माजी नगरसेवक सचिन खेम यांना अटक

  कल्याणचे महात्मा फुले चौक पोलिसांनी केली अटक

  आज दुपारी पोलीस करणार कोर्टात हजर

  या प्रकरणात अजून चार आरोपींच्या शोधात पोलीस

 • 16 Jan 2022 11:09 AM (IST)

  सोलापुरात विजयपूर रोडवरील तेरामैल येथे भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

  सोलापूर -विजयपूर रोडवरील तेरामैल येथे भीषण अपघात

  - झाडाला स्कॉर्पिओ गाडी आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू

  - किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावे

  - तिघेही सोलापूरचे रहिवासी

  - तर राकेश हच्चे हा इसम या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला

  - त्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरूय

 • 16 Jan 2022 10:02 AM (IST)

  तामिळनाडूमध्ये आज कडकडीत लॉकडाऊन

  चेन्नई : तामिळनाडूमध्ये आज कडकडीत लॉकडाऊन

  पहिल्या वेळच्या लाटेप्रमाणे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन

  तामिळनाडू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारचा निर्णय

  केरळ आणि कर्नाटक राज्यातील अनेक शहरांमध्ये आज विकेंड कर्फ्यू

 • 16 Jan 2022 09:41 AM (IST)

  उस्मानाबादेत एसटी संप सुरु असल्याने अद्याप 310 बसेस बंद, केवळ 90 बस फेऱ्या सुरु

  उस्मानाबाद -एसटी संप सुरु असल्याने अद्याप 310 बसेस बंद, केवळ 90 बस फेऱ्या सुरु

  एसटी महामंडळाला दररोज अंदाजे 50 लाख रुपयांचा तोटा

  उस्मानाबाद विभागातील 2700 पैकी 700 कर्मचारी कामावर रुजू

  238 कर्मचाऱ्यांचे निलंबन तर 51 कर्मचारी बडतर्फ

  विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांची माहिती

 • 16 Jan 2022 08:08 AM (IST)

  वैद्यकीय एमबीबीएस, बीडीएस प्रवेश प्रक्रियेची अर्ज भरण्याची मुदत वाढवली

  राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

  वैद्यकीय एमबीबीएस, बीडीएस प्रवेश प्रक्रियेची अर्ज भरण्याची मुदत वाढवली

  उद्यापर्यंत करता येणार विद्यार्थ्यांना अर्ज

  प्रवेश अर्ज भरायचं राहिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे सीईटी सेलचे आवाहन

  आतापर्यंत राज्यात 57 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये

  13 तारखेलाचं यादी जाहीर करण्यात येणार होती, मात्र आता अर्ज भरण्याची मुदत 17 तारखेपर्यंत करण्यात आलीय ..

 • 16 Jan 2022 07:37 AM (IST)

  नवा भरती घोटाळा, मृदा आणि जलसंधारण विभागात अपात्र आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकऱ्यांची खैरात

  औरंगाबाद : मृदा आणि जलसंधारण खात्यातील घोटाळा उघड

  अर्ज न देता, मुलाखती न देता, अपात्र आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकऱ्यांची खैरात

  आरोग्य खात्यातून नियुक्तीवर आलेल्या एका उपयुक्तांवर ठपका

  उपविभागीय अभियंता, जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता असे 85 पदांसाठी नियम बसवले धाब्यावर

  नवा भरती घोटाळा, चौकशी समितीच्या अहवालात अनेकांचे पितळ उघडे

 • 16 Jan 2022 07:00 AM (IST)

  दिल्लीमध्ये भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक, उत्तराखंडमधील निवडणुकीबाबत होणार विचार मंथन

  नवी दिल्ली : भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

  अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी पाच वाजता बैठक

  उत्तराखंडमधील निवडणुकीबाबत होणार विचार मंथन

  उत्तराखंडमधील भाजप नेते बैठकीत सहभागी होणार

 • 16 Jan 2022 06:59 AM (IST)

  नागपूरमध्ये सासू-सुनेचे भांडण, चिमुकल्याला विष पाजून सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न

  नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे सासू-सुनेच्या भांडणात दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

  सकाळी सासू आणि सुनेचा वाद झाला, त्या रागाच्या भरात महिलेने आपल्या दीड वर्षीय बाळाला विष देऊन स्वतः सुद्धा विष घेतले

  विष पोटात गेल्याने बाळाचा मृत्यू तर महिला बचावली, उपचार सुरू, प्रकृती धोक्याच्या बाहेर

  रामटेक पोलिसांनी महिलेवर खुनाचा आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे

Published On - Jan 16,2022 6:14 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें