Maharashtra News Live Update : राज्यात काही ठिकाणी पुन्हा पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांची चिंता वाढली

| Updated on: May 13, 2022 | 11:05 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राज्यात काही ठिकाणी पुन्हा पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांची चिंता वाढली
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज शुक्रवार 13 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 1 जून पासून सुरू होत आहेत. सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यावर विद्यापीठाचं शिक्कामोर्तब झालं आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील कोणतेही प्रश्न सोडवून गुण मिळण्याची मुभा आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणी नंतर परीक्षेचे स्वरूप देखील बदलले आहे. विद्यापीठात ऑफलाइन परीक्षा पावणे दोन लाख विद्यार्थी देणार परीक्षा आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रतितासाला १५ मिनिट वेळ जास्त मिळणार. प्रश्न पत्रिका या बहुपर्यायी राहतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 May 2022 07:54 PM (IST)

    अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी बदली

    दिल्लीमध्ये ऊर्जा सहसचिव पदावर झाली नियुक्ती झाल्याची माहिती..

    मागील जवळपास पाच वर्षांपासून अमरावती विभागीय आयुक्त म्हणून होते कार्यरत..

    दीर्घकाळ अमरावती विभागीय आयुक्त म्हणून केले काम…

  • 13 May 2022 07:45 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    औरंगजेबाच्या महिमा मंडळाला आम्ही सहन करणार नाही

    शिवसेना या प्रकरणावर का गप्प आहे

    आम्ही यावर गप्प बसणार नाही आम्ही त्यांना जागा दाखवून देऊ

    उद्धव ठाकरे ज्याच्यासोबत बसले आहेत त्यांचीच निती ते चालवत आहेत

  • 13 May 2022 07:14 PM (IST)

    नाशिक - आदित्य ठाकरे त्रंबकेश्वर चरणी

    त्रंबकेश्वर महादेव मंदिरात घेतलं दर्शन

    बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर मंदिरात पोहोचले आदित्य ठाकरे

    अवघ्या काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी देखील घेतलं होत त्रंबकेश्वर दर्शन.

  • 13 May 2022 06:41 PM (IST)

    काँग्रेस नेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, यात निश्चितच सत्यता असेल काँग्रेस नेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

    मंत्री राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान जामनेर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेल्या भावनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

    नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, असं ते बोलले असतील तर त्यात सत्यता निश्चितच असेल, त्यामुळेच त्यांनी त्यावर भाष्य केलंय, त्यांनी केलेले भाष्य खरं असू शकतं,

    राजकारणात एक जण बोलतो आणि दुसरा त्याच्यावर कॉमेंट करतो, याच्यात गुंतून राहण्यापेक्षा बेरोजगारी आणि महागाईवर का बोलत नाही, माध्यमे पण त्यावर प्रश्न विचारत नाहीत,

    कुठेतरी काँग्रेस पक्षाची जी नाराजी आहे, ती व्यक्त करण्याची भावना प्रांताध्यक्ष यांनी त्याठिकाणी व्यक्त केली आहे, काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचा सन्मानच करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • 13 May 2022 06:41 PM (IST)

    औरंगाबाद एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली

    लाखो लिटर पाण्याची झाली नासाडी

    पाईपलाईन फुटल्यामुळे तब्बल दोन तास वाळूज एमआयडीसी रस्ता पडला

    तुफान वेगाने सुरू होता पाण्याचा फवारा

    अथक प्रयत्नानंतर पाणी रोखण्यात प्रशासनाला यश

    मात्र भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी

  • 13 May 2022 06:04 PM (IST)

    हिंगोली-पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात

    कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसारत धुवाधार अवकाळी पावसाला सुरुवात

    अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत ,उकड्या पासून नागरिकांना काहींसा दिलासा..

  • 13 May 2022 05:50 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता

    शिवसेना नेते-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता

    येत्या 10 जूनला आहे आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

    राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता

    10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान

    आमदार बजावणार मतदानाचा हक्क

    त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल होण्याची दाट शक्यता

    राज्यसभा निवडणुकीनंतर पुढच्या काही दिवसांत होऊ शकतो आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

  • 13 May 2022 05:50 PM (IST)

    मोहोळजवळ टेम्पो आणि जीपच्या भीषण अपघात

    - अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी

    - रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिक अप जीपने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला

    - मोहोळ तालुक्यातील देवडी गावाजवळील श्रीकृष्ण हॉटेल जवळ झाला अपघात

    - या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख (वय २२, रा. वैजापूर औरंगाबाद ) आणि रिहान फैजल कयेशअल्ली (वय ३५, राहणार झारखंड) हे दोघे जागीच ठार झाले.

  • 13 May 2022 05:24 PM (IST)

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची महिती

    - कोरोनाच्या नियमाच्या बांधनातून मुक्त होणार यंदाची वारी, दरवेळेस पेक्षा जास्त वारकरी येणार या दृष्टीने नियोजन

    - वारी संदर्भात झालेल्या नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

    - दरवेळी 10 ते 12 लाख वारकरी पंढरपूरात येतं असतात यंदा 15 लाख वारकरी येऊ शकतील या अंदाजाने नियोजन

    - आषाढी वारीच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु, वारकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना केल्य जात आहेत

  • 13 May 2022 05:23 PM (IST)

    शिवसेना मुस्लिम क्षेत्रच्या वतीने रवी राणा यांचा जाहीर निषेध

    अमरावतीत छत्रपती श्री शिवाजी महाराज मुस्लिम बिग्रेड आणि शिवसेना मुस्लिम क्षेत्रच्या वतीने रवी राणा यांचा जाहीर निषेध....

    शिवसेना ही सुलेमान सेना झाली राणांच्या या वक्तव्याचा करत आहे निषेध.

    राणांच्या वक्तव्याने आमच्या भावना दुखवल्याचा आरोप.....

    अमरावतीच्या नागपूरीगेट परिसरात कार्यकर्ते आले एकत्र

    यापूर्वी युवा स्वाभिमानच्या मुस्लिम पदाधिकऱ्यांनी दिले होते पक्षाचे राजीनामे...

  • 13 May 2022 05:23 PM (IST)

    नाशिक - आदित्य ठाकरे यांनी साधला मेटघरच्या महिलांशी संवाद

    आदित्य ठाकरे यांनी दिले पाणी,रस्ता देण्याचे प्रशासनाला आदेश

  • 13 May 2022 04:43 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

    सुरक्षेचा दर्जा पूर्वीचच ( Y +), मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ.

    एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला.

    भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना आले होते जीवे मारण्याचा धमकीचे पत्र

    मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतीच घेतली होती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट

    राज ठाकरेंची पोतीस सुरक्षा वाढवण्याची केली मागणी

    सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात आली आहे वाढ.

  • 13 May 2022 04:42 PM (IST)

    औरंगाबाद महापालिकेतील प्रकार

    पाणी प्रश्नावरून महापालिका आयुक्त आणि कार्यकर्त्यात बाचाबाची

    पाणी प्रश्नावरून सतत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर महापालिका आयुक्त भडकले

    महापालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे स्टंटबाज तरुणावर भडकले

    पाणी प्रश्नावरून महापालिका आयुक्तांना महापालिकेत अडवण्याचा तरुणाने केला होता प्रयत्न

    रस्ता अडवणाऱ्या तरुणावर महापालिका आयुक्त भडकले

    काही काळ आयुक्त आणि तरूणामध्ये झाली बाचाबाची

  • 13 May 2022 03:53 PM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान प्रकरण

    मंदिर तहसीलदार योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस

    प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटीसीत नमूद

    अवमान प्रकरणी कारवाई साठी तुळजापूरकरांनी काल ठेवले होते शहर बंद

    छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त

    तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे त्यामुळे महाराज यांना अडविले

    महाराज यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्ध गाभाऱ्यात सोडले नाही

    छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात

    शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज व संतप्त

    तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी, तहसीलदार, व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम

  • 13 May 2022 03:52 PM (IST)

    नाशिक - आदित्य ठाकरेंचा थोड्याच वेळात करणार त्रंबकेश्वर तालुक्याचा दौरा

    दुष्काळग्रस्त भागाची करणार आदित्य ठाकरे पाहणी

    TV9 ने भीषण परिस्थिती दाखवलेल्या मेटघर गावाला देखील देणार आदित्य ठाकरे भेट

  • 13 May 2022 03:51 PM (IST)

    हिंगोली-शरद पवार साहेब यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर

    राष्ट्रवादी चे आमदार राजू नवघरे यांनी ठेवलेल्या 111 सामूहिक लग्न सोहळ्या साठी लावणार उपस्थिती

    उद्या सकाळी 11 वाजता वसमत तालुक्यातील वाई येथे शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री राहणार उपस्थित

  • 13 May 2022 02:45 PM (IST)

    शिवसेनेचां जन्मच हिंदुत्व जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवन यामधे गेला आहे

    - शिवसेनेचां जन्मच हिंदुत्व जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवन यामधे गेला आहे

    -गेल्या पन्नास वर्षापासून हिंदुत्वाची पाठराखण करणारा पक्ष हा शिवसेना

    - शिवसेनेचे सर्व नेते आणि शिवसैनिक हे हिंदुत्वाला मानणारे

    - उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मूळ विचार केव्हा सोडलेला नाही

    - कोणाच्या धमक्यांना किती महत्व द्यायचे याला मी मानत नाही

    - उध्दव ठाकरे तीन वेळा अयोध्येला जाऊन आले ,हिदुंत्वाचा हुंकार त्यांच्यात आहे

    - राज ठाकरे यांना कोणी पदवी दिली आणि ती पदवी काय कॉपीराइट नाहीय त्याच्यावर कोणाची मोनोपोलो नाही

    - उध्दव ठाकरे यांना हिंदूजननायक म्हांटल तर कोणाच्या पोटात दुखायच कारण नाही

    - आणि अशा धमक्या आम्हाला कोणी दिवू नये

  • 13 May 2022 01:58 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्याच्या सभेची सुरवात हनुमान चालीसेने करनार आहे की औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहायला जाणार

    मुख्यमंत्री उद्याच्या सभेची सुरवात हनुमान चालीसेने करनार आहे की औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहायला जाणार...

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या सभेपूर्वी रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांवर टिका...

    हनुमान चालिसा पठन केल्याने आम्हाला तुरुंगात टाकले जाते.

    पण अकबरुद्दीन ओवेसी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहतात...

    आता देशातील प्रत्येक हिंदूचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, ‘

    उद्धव ठाकरे हनुमान चालिसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार ?

  • 13 May 2022 01:49 PM (IST)

    धुळ्यात पाण्यासाठी नगरसेविकेच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

    धुळ्यात पाण्यासाठी नगरसेविकेच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

    वारंवार तक्रार निवेदन देऊन देखील निगरगट्ट प्रशासनाला जागे करण्यासाठी महिलांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन.

    मनपा प्रशासन नगरसेविकांचे देखील ऐकत नसल्याचा एम आय एम नगरसेविका नाजिया पठाण यांचा मनपा प्रशासन वर गंभीर आरोप

    देवपूरातील नवरंग पाण्याच्या टाकीवर चडून आंदोलन

    धुळ्यात दिवसेंदिवस पाणीप्रश्न गंभीर होत चाललाय..

  • 13 May 2022 01:48 PM (IST)

    पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू नाही, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती

    - पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू नाहीय,

    - पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती,

    - नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही पुणे पोलिसांचे आवाहन,

    - रेल्वे स्थानाकावर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत,

    - नेमकी काय वस्तू आहे यासंदर्भात पुणे पोलिसांकडून शोध सुरुय,

  • 13 May 2022 12:16 PM (IST)

    पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली

    - पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलीय,

    - रेल्वे प्रशासनाने फ्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 खाली करण्यात आलं,

    - काही काळासाठी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय

    पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब. तीन जिलेटीनच्या कांड्या पोलिसांनी घेऊन निकामी करण्याची कारवाई सुरू केली. घटनेने खळबळ

  • 13 May 2022 12:06 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'सद्बुद्धी'मिळो यासाठी नवनीत राणा ह्यांनी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा चंग बांधलाय…

    ब्रेक - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणासह ऊद्या दिल्लीतील ५ हजार वर्ष जूनं, पांडव कालीन हनुमान मंदीरात हनुमान चालिसा वाचणार आहेत…

    त्यांच्या येण्याची कोणतीच सुचना अद्याप मंदीर प्रशासनास नाही, ते आले की इतर भक्तांप्रमाणेच त्यांचं स्वागत करू असं मत मंदीराचे महंत दुर्गेश यांनी व्यक्त केलंय…

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'सद्बुद्धी'मिळो यासाठी नवनीत राणा ह्यांनी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा चंग बांधलाय…

    ऊद्या मुंबईतही ऊद्धव ठाकरे यांची बीकेसीत जाहीर सभा आहे… त्यामुळे ऊद्याचा दिवस महत्वाचा ठरणारेय… त्यामुळे ऊद्या नवनीत राणा काय संकल्प घेणार आहेत पाहणं महत्वाचं ठरेल…

  • 13 May 2022 12:06 PM (IST)

    सगळे एक होऊ, तेव्हाच भारत धर्माचे रक्षण होईल - कालीचरण महाराज

    सगळे एक होऊ, तेव्हाच भारत धर्माचे रक्षण होऊ

    आपल्या नेत्यांनी हे जाणलं पाहिजे

    पहिले विरोध मग हासणं, मग विचार करणं, मग अनुसरण करणं ही परंपरा आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण अधिक करू नये.

  • 13 May 2022 11:57 AM (IST)

    सरकार हिशोबावर चालतं, वसूली सरकार आहे - किरीट सोमय्या

    अडीच लाख लोकांचं भवितव्य अडकून पडलंय, वसूलीची भूक आहे, रात्री हिशेब घेऊन ये, नोटा मोजायची मशीन साफ करून ठेवतो

    पालक आणि बालकाचं काय? त्यांचं झालं की मातोश्रीचं काय?

    सरकार हिशोबावर चालतं, वसूली सरकार आहे

    वसूली विरोधात आवाज उठवला की काय होतं?

    इथला कमिशनर माफिया संजय पांडे नसल्यामुळे इथे पोलीस बंदोबस्त चांगला आहे

    त्यामुळे इथल्या पोलिसांचे मी आभार मानतो

    खार पोलीस स्टेशनचं उदाहरण आपण पाहिलं

    संजय पांडेला लाज वाटत नाही, ज्या कमांडो मुळे किरीट सोमैय्या वाचला त्या कमांडो च्या ड्रायव्हर वर केस घेतली

    सोडणार नाही संजय पांडेला

  • 13 May 2022 11:50 AM (IST)

    राज्यात भारनियमनाची केवळ वावड्या उठवल्या जातात

    राज्यात भारनियमनाची केवळ वावड्या उठवल्या जातात

    राज्यात गेल्या बावीस तेवीस दिवसापासून भारनियमन नाही, व यापुढेही भारनियमन होणार नाही. - ऊर्जा मंत्री नितीन राऊत

    वादळ आलं तर ट्रीपिंग होतं व उष्णता खूप वाढली तर डिफॉल्ट होतो याला भारनियमन म्हणता येणार नाही

  • 13 May 2022 11:49 AM (IST)

    राणांच्या वक्तव्याने आमच्या भावना दुखवल्याचा आरोप

    अमरावतीत छत्रपती श्री शिवाजी महाराज मुस्लिम बिग्रेड आणि शिवसेना मुस्लिम क्षेत्र करणार आज राणा दाम्पत्याचा जाहीर निषेध....

    शिवसेना ही सुलेमान सेना झाली राणांच्या या वक्तव्याचा करनार निषेध.

    राणांच्या वक्तव्याने आमच्या भावना दुखवल्याचा आरोप.....

    अमरावतीच्या नागपूरीगेट परिसरात कार्यकर्ते एकत्र येऊन खासदार नवनीत राणा व रवी राणांचा करनार निषेध....

    यापूर्वी युवा स्वाभिमानच्या मुस्लिम पदाधिकऱ्यांनी दिले होते पक्षाचे राजीनामे...

  • 13 May 2022 11:47 AM (IST)

    पोलिसांनी फक्त दहा मिनिटासाठी आमच्या हवाला करा -नितेश राणे

    मी मराठा आहे,

    पोलिसांनी फक्त दहा मिनिटासाठी आमच्या हवाला करा

    ज्याच्या नसामध्ये शिवाजी महाराज आहेत, त्याला रात्री झोप लागली नसेल

    खरा मर्द असेल, तर त्याला ओवेसीला

    कोणी तोंडावर थुंकून जात असेल, तर त्याला आम्ही इंगा दाखवू

    गेल्या काही महिन्यातलं राजकारण पाहा

    आमच्या तोंडावर थूंकून जातो.

    गृह खात्याने चौकशी करावी

    भाजपची सोशल मीडियाची चौकशी सुरू आहे

    तो राज्यात शांतता आहे

    सरकारचा जावाई आहे

    उद्या कुणी त्याच्या कबर समोर कोणी लंघुशंका केल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही.

  • 13 May 2022 11:36 AM (IST)

    राणी मुखर्जीने साईबाबांचे घेतले दर्शन

    ब्रेक - राणी मुखर्जीने साईबाबांचे घेतले दर्शन

    - बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने शिर्डी साईबाबांच्या दरबारात जाऊन बाबांचे दर्शन घेतले.

    बाबांच्या मध्यान आरतीमध्ये राणीने साईसमाधीला नमस्कार करून, मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे या नवीन चित्रपटाच्या यशासाठी बाबांना प्रार्थना केली.

    राणीची शिर्डीत जमीन आहे, तिथे तिला घर बांधायचे आहे. राणीचे घर बांधण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते.

    - जेव्हा बाबांची इच्छा असेल तेव्हा दरबारात घर बांधू. सर्व काही त्याच्या आदेशानुसार होतं असं म्हणत राणीने फॅंन्सचे आभार मानले , तीला पाहण्यासाठी आवारात गर्दी झाली होती..

  • 13 May 2022 11:35 AM (IST)

    स्वातंत्र्याच्या लढाईत ज्या पक्षाने कधी भाग घेतला नाही, ज्यांचे नेते कधी तुरुंगात गेले नाही, ते आम्हाला शिकवतायत - मल्लीकार्जुन खरगे

    - स्वातंत्र्याच्या लढाईत ज्या पक्षाने कधी भाग घेतला नाही, ज्यांचे नेते कधी तुरुंगात गेले नाही, ते आम्हाला शिकवतायत

    - भाजपवाले देशभक्त असेल तर ते दांडी यात्रेत कुठे होते? चलेजाओ चळवळीत कुठे होते?

    - आम्ही काम केलंय पण प्रचारात मागे पडलोय

    - देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास तरुणांना सांगणं गरजेचं आहे

    - भाजप, मेदीची टीम फक्त सोशल मिडियावर चाललीय. ते जनतेत जात नाही. फक्त सोशल मिडियावर आहे मोदीजी ने कधी प्रेस घेतली नाही

    - लोक जुमल्यांना मतं देतात, आम्ही आमच्या त्यागाला मत देत नाही. हा मोठा अन्याय आहे

    - लोकशाही वाचवण्याची सर्वात मोठी लढाई आहे

  • 13 May 2022 11:05 AM (IST)

    शिवाजी महाराज यांच्या भूमीत अस करणं बरोबर नाही

    छत्रपती संभाजी महाराज बाईट - शिवाजी महाराज यांच्या भूमीत अस करणं बरोबर नाही - महागाई, दुष्काच्या परिस्थितीवर लॉंग टर्म प्लॅनिंग होणं गरजेचं आहे - महाराष्ट्र दौऱ्यात याबाबत आढावा घेणार

  • 13 May 2022 10:59 AM (IST)

    उल्हासनगर महापालिका परिसराला छावणीचं स्वरूप

    उल्हासनगर महापालिका परिसराला छावणीचं स्वरूप

    किरीट सोमैय्या येणार म्हणून कडेकोट बंदोबस्त

    धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर भाजपचं धरणं आंदोलन

    Anchor : उल्हासनगरात आज भाजपच्या वतीनं धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर धरणं आंदोलन केलं जातंय. या आंदोलनाला भाजप नेते किरीट सोमैय्या उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पोलिसांनी उल्हासनगर महापालिका परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिका परिसराला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलंय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी...

  • 13 May 2022 10:59 AM (IST)

    नागपूरच्या डॉक्टर वैभवीने वाचविले चार महिन्याच्या चिमुकलीचे प्राण

    नागपूरच्या डॉक्टर वैभवीने वाचविले चार महिन्याच्या चिमुकलीचे प्राण

    पालकांसोबत विमानात प्रवास करणाऱ्या चिमुकलीचा स्वाश बंद झाला होता बंद

    चैनई विमानतळावरून सिंगापूर ला निघाले होते विमान

    चार महिन्याच्या चिमुकलीचा स्वाश अचानक झाला होता बंद

    हार्टबीट झाले होते बंद

    क्रू मेंबर ने पायलट ला माहिती दिल्यावर पायलट ने मदतीची घोषणा

    नागपूरच्या डॉ. वैभवी खोडके हिने तात्काळ चिमुकलीला मांडीवर घेत केले उपचार

    सात आठ मिनिटांत चिमुकलीचा स्वाश परतला

    विमानातील सर्व प्रवाश्यांनी उभं राहुल केलं डॉक्टर वैभवीचं कौतुक

  • 13 May 2022 09:36 AM (IST)

    कश्मिरी पंडितांची समस्या अजूनही संपलेली नाही - संजय राऊत

    कश्मिरी पंडितांची घऱवापसी, त्यांची सुरक्षा, त्यांच्या सोयीसुविधा हा मोदी शहांचा मुख्य अजेंडा होता. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता. तरिही कश्मिरी पंडितांची समस्या अजूनही संपलेली नाही. कश्मिरी पंडितच नव्हे तिथल्या सामान्य माणसंही सुरक्षित नाहीत, असं वातावरण तयार केलं जातंय. शिवसेना काश्मीर पंडितांच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहतेय. सरकार काय करतंय..? एका बाजुला चीन घुसलाय, दुसरीकडे काश्मीरात अशांतता आहे...

  • 13 May 2022 09:34 AM (IST)

    बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुण्यात निधन,

    - बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुण्यात निधन,

    - संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांची सख्खी लहान बहीण होती,

    - वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,

    - वृद्धापकाळाने निधन झाल्याची नातेवाईकांची माहिती

  • 13 May 2022 09:34 AM (IST)

    कश्मिरी पंडितांच्या बाबतीत मोदी शहा इमोशनल आहेत - संजय राऊत

    कश्मिरी पंडितांच्या बाबतीत मोदी शहा इमोशनल आहेत. सहा सात वर्षांत काय केलं माहीत नाही पण अजूनही काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे.. काल एका तरुण सरकारी कर्मचारी असलेल्या कश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे.... ज्याप्रकारे ही हत्या झाली, ते चिंताजनक, शहांनी याची गंभीर दखल घ्यावी नेहमी पाकिस्तानकडे बोट दाखवण्याची गरज नाही.. आपण काश्मिरी पंडितांसाठी काय करणार आहोत.. ३७० नंतरही जर काश्मिरी पंडित आणि सामान्य जनता सुरक्षित नाहीये..काश्मिरात अस्थिर आणि अशांतेचा माहौर आहे. हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर पेक्षा प्रक्टिकल पाहावं लागेल...

  • 13 May 2022 09:18 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा खोळंबा, भीषण अपघातानंतर लांबच लांब वाहनांच्या रांगा

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा खोळंबा

    ट्रेलरची टेम्पोला धडक

    भीषण अपघातानंतर एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

    वाहतूक कोंडीचा अनेकांना फटका

    भीषण अपघातानंतर लांबच लांब वाहनांच्या रांगा

  • 13 May 2022 09:10 AM (IST)

    बहुप्रतिक्षित धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मु. पो. ठाणे' चित्रपट आज प्रदर्शित होणार

    बहुप्रतिक्षित धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मु. पो. ठाणे' चित्रपट आज प्रदर्शित होणार

    शिवसेनेकडून नगर शहरातील आशा स्क्वेअर चित्रपट गृहात सकाळी 11.30 वाजता दाखवला जाणारा मोफत चित्रपट

    नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक आणि नागरिकांसाठी मोफत प्रिमियर शो चे आयोजन

    मंत्री शंकरराव गडाख यांच्या यावेळी उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार

  • 13 May 2022 09:09 AM (IST)

    राजस्थानमधील उदयपुरमध्ये काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय चिंतन शिबीर

    - राजस्थानमधील उदयपुरमध्ये काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय चिंतन शिबीर

    - काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी, खा. राहूल गांधीसह देशभरातील ४०० पेक्षा जास्त नेत्यांची उपस्थिती

    - ‘एक परिवार एक तिकीट’ धोरणावर निर्णय होण्याची शक्यता

    - काँग्रेसच्या चिंतन शिबीरात संघटन मजबूती आणि आगामी निवडणूकीबाब होणार मंथन

    - पुढील वर्षी होणाऱ्या तीन राज्यातील निवडणूका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणूकीवरंही मंथन

    - महाराष्ट्रातून नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अविनाश पांडे, सुशीलकुमार शिंदे राहणार उपस्थित

    - आज दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणाने होणार चिंतन शिबीराची सुरुवात

    - चिंतन शिबिरात काँग्रेसची पुढची रणनिती ठरणार

  • 13 May 2022 09:03 AM (IST)

    बारामती तालुक्यात अदानीच्या खाजगी विमानतळावर अखेर शिक्कामोर्तब,

    - बारामती तालुक्यात अदानीच्या खाजगी विमानतळावर अखेर शिक्कामोर्तब,

    - पुण्यातील पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा गाशा गुंडाळला...

    - औद्योगिक महामंडळाचा केंद्र शासनाला प्रस्ताव...

    - तीन तालुक्यातील साडेतीन हजार एकर जमीन भूसंपादन करणार...

    - बारामती, दौड आणि पुरंदरच्या सीमेवर खाजगी विमानतळ उभारण्यात येणार....

    - साडे तीन एकर जमिनीवर अदानी ग्रुपच्या वतीने मल्टिमेडल लॉजीस्टिक पार्क उभारण्यात येणार

    - औद्योगिक महामंडळाच्या प्रस्तावाला नुकतीच दिल्ली हाय पॉवर कमिटीकडून मंजुरी....

  • 13 May 2022 08:16 AM (IST)

    वसईत महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल झाला आहे

    :वसईत महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल झाला आहे..

    पापडी तलावाचे नादुरुस्त लोखंडी गेट एका चार वर्षीय मुलीच्या अंगावर पडून ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला होता..

    भूमिका मेहेर असे गेट पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे..

    चिमुरडीच्या मृत्यूला कनिष्ठ अभियंत्याला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून, त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 337, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    कुणाल सतीश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या कनिष्ठ अभियंता चे नाव असून तो वार्ड क्रमांक 109 चा कनिष्ठ अभियंता आहे.

    सध्या अभियंता हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • 13 May 2022 07:51 AM (IST)

    म्हाडा घोटाळ्याप्रकरणी 23 बिल्डरांना अंतिम नोटीस

    नाशिक - म्हाडा घोटाळ्याप्रकरणी 23 बिल्डरांना अंतिम नोटीस

    कारवाईच्या इशाऱ्यानंतर 7 जणांकडून माहिती सादर

    माहिती सादर न करणाऱ्या बिल्डरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा

    म्हाडा घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

  • 13 May 2022 07:50 AM (IST)

    बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

    - बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की.

    - शेतातील उकीरडा आणि हातपंप हटविण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशावरून बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांनी धक्काबुक्की करण्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार) घडली असून याप्रकरणी पाचजणांविरुद्ध लाखांदूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 13 May 2022 07:50 AM (IST)

    शिरोली औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीतून तब्बल 123 बालमजुरांची सुटका

    शिरोली औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीतून तब्बल 123 बालमजुरांची सुटका

    प्रियदर्शनी पॉलिसॅक कंपनीवर बाल कामगार विरोधी पथक आणि अवनी संस्थेनं टाकला छापा

    सुटका केलेले बालमजूर बंगाल आणि मिझोरम भागातील

    कमी वेतनावर काम करून घेतले जात असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड

    सुटका केलेल्या मुलांना चाईल्ड वेलफेअर कमिटीकडे सोपवले जाणार

  • 13 May 2022 07:37 AM (IST)

    मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा करण्याची काँग्रेसची मागणी

    - मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा करण्याची काँग्रेसची मागणी,

    - पुण्यात करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी आणि संपूर्ण योजनेचा पंचनामा करून पुणेकरांपुढे मांडावा,

    - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी,

    - योजनेसाठी खर्च झालेल्या जनतेच्या पैशाचा अनाठायी खर्च रोखला जायला हवा, पत्रकाद्वारे मागणी.

  • 13 May 2022 07:37 AM (IST)

    शहरालगत दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात,

    चंद्रपूर :-शहरालगत दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात,

    दुर्गापूर- ऊर्जानगर परिसरात सातत्याने वाघ-बिबट हल्ल्यांमध्ये झाली होती वाढ,

    या भागात वनविभागाच्या वतीने अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत वन्यजीव कैद करण्यासाठी पिंजरे,

    दोन दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात झाली होती गंभीर जखमी ,

    यानंतर स्थानिक जमावाने वनविभागाच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्रभर होते कोंडले,

    यानंतर हल्लेखोर बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश झाले होते जारी,

    यादरम्यान विविध पथकांनी द्वारे वाघ बिबट्यचा शोध होता सुरू,

    आज पहाटे सिनाळा- भटाळा गावालगत लावलेल्या एका पिंजर्‍यात अडकली मादी बिबट,

    पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर मादी बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात करण्यात आले दाखल,

    दुर्गापूर- ऊर्जानगर परिसरातील वाघ बिबट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एक वाघ व 2 बिबटे झाले आहेत जेरबंद

  • 13 May 2022 07:32 AM (IST)

    महागाई विरोधात शिवसेनेचे शहरभर 58 ठिकाणी आज आंदोलन

    - महागाई विरोधात शिवसेनेचे शहरभर 58 ठिकाणी आज आंदोलन,

    - प्रभागातील वाडी वस्तीच्या 58 ठिकाणी हि आंदोलन घेण्यात येणार,

    - आंदोलनाद्वारे जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याचा सेनेचा प्रयन्त,

    - शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांची माहिती

  • 13 May 2022 07:23 AM (IST)

    अमरावती जिल्हा परिषद मध्ये तीन दिवसात १७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या...

    अमरावती जिल्हा परिषद मध्ये तीन दिवसात १७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या...

    गुरुवारी ३४ ग्रामसेकांचे खांदेपालट;८ कर्मचाऱ्यांनी केली मेळघाटात जाण्याची विनंती.....

    अमरावती जिल्ह्यापरिषद मध्ये तीन दिवस राबविली जात आहे.कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया..

  • 13 May 2022 07:23 AM (IST)

    रत्नागिरी- कोकण कृषी विद्यापीठात आज पालवी महोत्सवाचे उदघाटन

    रत्नागिरी- कोकण कृषी विद्यापीठात आज पालवी महोत्सवाचे उदघाटन

    राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

    राज्यपालांसोबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कृषी मंत्री दादा भुसे राहणार उपस्थित

    १३ ते १७ मे असा पाच दिवस रंगणार महोत्सव

  • 13 May 2022 07:19 AM (IST)

    नागपुरातील खेळ प्रेमींसाठी खुशखबर

    नागपुरातील खेळ प्रेमींसाठी खुशखबर

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतुन खासदार क्रीडा महोत्सव च करण्यात आलं आयोजन

    13 मे ते 28 मे दरम्यान नागपुरात वेगवेगळ्या खेळांचं भरणार महाकुंभ

    35 प्रकारच्या खेळांचं आयोजन , तर देशाच्या वेगवेगळ्या भागातील 40 हजार पेक्षा जास्त खेळाळू होणार सहभागी

    आज सायंकाळी या महोत्सवाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रसिद्ध हॉकी पट्टू धनराज पिल्ले यांच्या हस्ते होणार उदघाटन

  • 13 May 2022 06:50 AM (IST)

    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे प्रक्षेपण ठाण्यातील विवियांना मॉल या ठिकाणी होणार आहे

    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे प्रक्षेपण ठाण्यातील विवियांना मॉल या ठिकाणी होणार आहे

    निर्माते मंगेश देसई,खासदार श्रीकांत शिंदे ,आमदार रवींद्र फाटक व इतर कार्यकर्ते सध्या उपस्थित

    आज महाराष्ट्र भर हा चित्र पट प्रदर्शित होणार

    मॉल बाहेर आनंद दिघे यांची प्रतिकृती उभारली असून अभिषेक आणि पूजा अर्चा करून पाहिला शो शुभारंभ करणार आहे

    लेझीम पथक देखील आहे

  • 13 May 2022 06:48 AM (IST)

    महिना भरात केवळ 34 टक्के नद्यांची झाली स्वच्छता

    महिना भरात केवळ 34 टक्के नद्यांची झाली स्वच्छता

    46 पैकी 13 किमी पात्रातील गाळ काढण्यात आला ..बाकी काम संथ गतीने सुरू आहे

    पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये या साठी महापालिकेने हाती घेतली मोहीम

    मात्र मोहीम संथ गतीने सुरू असल्याने नागपूरकरांचं संकट वाढणार का?.

  • 13 May 2022 06:41 AM (IST)

    मिरा रोडच्या रामदेव पार्क मध्ये असलेल्या वासुदेव स्काई हाईट्स इमारतीत आग

    मिरा रोडच्या रामदेव पार्क मध्ये असलेल्या वासुदेव स्काई हाईट्स इमारतीत आग लागली होती..

    घटनास्थळी मिरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाचे पाच गाड्या पोहचल्या असून एका तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं..

    या घटनेत कुठल्याही प्रकारच्या जीवितहानी व इजा झाल्यानसून मात्र घरात असलेल्या सर्व साहित्य जळून खाक झाले..

    आगी शॉट सर्किट मुळे लागली होती अशी प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे..

Published On - May 13,2022 6:27 AM

Follow us
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.