Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
– रयतक्रांती संघटनेच्या जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा या यात्रेची सांगता सभा
– विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होतेय जागर यात्रेचा समारोप
– सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे होतेय जाहीर सभा
– सभेला मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती
– थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल होतील
औरंगाबादेतील भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला पोलिसांची आद्यप परवानगी नाही
23 तारखेला भारतीय जनता पार्टीकडून काढला जातोय जल आक्रोश मोर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढला जाणार आहे मोर्चा
मोर्चाला औरंगाबाद पोलिसांची अद्याप परवानगी नाही
मोर्चा 2 दिवसांवर आला असूनही परवानगीच्या हालचाली नाहीत
- सराफी व्यावसायिकावर चाकुने हल्ला करून भरदिवसा दरोडा टाकण्याच्या प्रयन्त,
- दत्तनगर जांभुळवाडी मार्गावरील दुकानातील घटना,
- या हल्ल्यात सराफ जखमी झाला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून पथके तयार,
- हल्ल्यात सराफ विनोदकुमार भागचंद साेनी जखमी
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
हलक्या स्वरूपाच्या गाराचा मारा
- रविवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पंजाबी पुन्हा मनसेत प्रवेश करणार,
- १५ दिवसांपूर्वी पंजाबी यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता,
- शहाबाज पंजाबी हे मनसेचे शहर उपाध्यक्ष होते,
- शिवाय वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत
कोणी हनुमान चालीसा म्हणायची तर कुणी राम रक्षा म्हणायची..
काही गोंधळ घालायचा आणि काही करून मीडियामध्ये यायचं ही आपली संस्कृती नाही.
माझा तिरंगा हाच माझा धर्म आहे.त्याच पालन मी करू शकली तर मी धर्म पाळते...
पूजा कोणाच्याही नावाने केली तर पूजा पुजाच असते देव देवच असते..
भिंतीलाही कान असतात म्हणून चांगलं बोलत राहायचं
अमरावतीच्या धारणी शहरातील डाबर परिसरात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने 4 घरे जाळून खाक,.
1 सिलेंडरचा आगीत स्फोट
3 शेळ्यांचाही मृत्यू
आगीत 10 लाखा पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती
- हिंदूजननायक म्हणून राज ठाकरे यांचा पोस्टरवर उल्लेख
- रविवारी राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा
- राज ठाकरेंच्या सभेसाठी शहर मनसेची जोरदार तयारी
सकाळपासून होते ढगाळ वातावरण
पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून
उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा
मानवी साखळी तयार करीत काँग्रेस पक्षाने अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आंदोलन केले
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पात एकूण आठ हत्तींच्या समावेश
यातून आठ पैकी चार हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे स्थलांतर करण्यात येणार आहे
यांच्या विरोधात अनेक स्थानिक व राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात विरोध करीत आहेत
आज काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक मिळून साखळी आंदोलन केले
नवी मुंबईतील एपीएममसी मार्केट मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून कांद्याचे भाव उतरले आहेत. यावेळी व्यापारी आणि शेतकरी दोन्ही नाराज असल्याचे चित्र आहे. दोन महिन्यापूर्वी रोज कांद्याच्या 70 ते 80 गाड्यांची आवक होती,मात्र आज गाड्यांची आवक ही 150 च्या वर गेल्याने आणि कांद्याला मागणी ही कमी असल्याने 20 ते 25 रुपयांचा कांदा आज 15 ते 20 रुपयांवर आला आहे.
काल रात्रीपासून या परिसरामध्ये दिसताहेत धुराचे प्रचंड लोट,
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच शेकडो हेक्टरवर वनसंपदा आगीच्या विळख्यात,
प्राणी वन्यजीव व पशुपक्षी वणव्याच्या विळख्यात,
गेल्या दोन महिन्यातला हा सर्वात मोठा वणवा असल्याची ग्रामस्थांची माहिती,
वनवणवा नियंत्रणात आणण्यासाठी गेले काही वर्ष वनविभागाचे सातत्याने सुरू आहेत प्रयत्न,
मात्र मामला येथील वणव्याने हा दावा ठरलाय सपशेल फोल,
तातडीने अधिक कुमक लावून वणवा नियंत्रणात आणण्याची व्यक्त होत आहे गरज
सांगली जिल्ह्यात काल सायंकाळ पासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर रात्री पासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. तर जत या दुष्काळी भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. बिरूळ ते खोजनवाडी रस्ता पाण्याने कातरून गेला आहे. अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे संपर्क तुटला आहे.
- पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहचणार,
- राज ठाकरे रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेसाठी आजपासून पुणे दौऱ्यावर,
- राज ठाकरे पुणे दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत सभेचा आढावा घेणार
-गोंदियात धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काढला हजारो शेतकऱ्यांसह तहसीलवर मोर्चा....
-केंद्र सरकारच्या धोरणाचा केला निषेध...
-मोदी सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी...
ज्ञानव्यापी मशीद प्रकरणी अलहाबाद हायकोर्टाची सुनावणी पुढे
6 जुलै ला होणार पुढील सुनावणी
सहा याचिकांवर आहे सुनावणी
दोन्ही समुदायातील पक्षाच्या दाव्यांवर होणार सुनावणी
केतकी चितळे हिला ठाणे 24 मे पर्यंत पोलिस कोठडी ठाणे न्यायालयाने सुनावली
रबाळे पोलिस घेऊन जाणार
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
24 तारखेपर्यंत केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
2020 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकीवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता
- सकाळी नाशिक रोड परिसरतील हत्याची घटना ताजी असताना गंगापूर रोड येथील आंदावल्ली भागात युवकाची हत्या
- गेल्या 24 तासात हतेच्या 4 घटना घडल्याने नाशिक हादरलं
- आनंदवली भागात विपुल खैरे या युवकाची हत्या कारण मात्र अद्याप अस्पष्ट
- पोलीस घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू
बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंमध्ये बैठक
बैठकीत पुणे दौऱ्याबाबत चर्चा
राज ठाकरें पुण्यातील सभेत सविस्तर भूमिका मांडणार
अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण पुणे सभेत स्पष्ट होणार
बाळा नांदगावकर यांची माहिती
मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद
आमचा पोलिसांना कोणताही धक्का लागला नव्हता
संदीप देशपांडे यांनी आरोप फेटाळले
आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं गुन्हे दाखल केले
आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार
संदीप देशपांडे यांचा संजय राऊत यांना टोला
आमच्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा होता
आमचा महिला पोलिसाला धक्का लागलाच नव्हता
संदीप देशपांडे याचा पत्रकार परिषदेतून दावा
महाविकास आघाडी सूडाचं राजकारण करतंय
संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारवर आरोप
महिला पोलिसाला धक्का लागला असेल, तर राजकारण सोडायला तयार
संदीप देशपांडे यांचा खुलं आव्हान
आतापर्यंत भावना गवळी काय नाही समोर आल्या चौकशीला? अनिल देशमुख किती दिवस लपून होते? आम्हाला सल्ले देताना तुम्हाला लाज नाही वाटत? संदीप देशपांडे यांचा सवाल
वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचे अमरावतीत 'बोंबाबोंब' आंदोलन..
गर्ल्स हायस्कूल चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार मोर्चा.
जिल्ह्याधिकारी कार्यालयावर जाणार शिवसेनेचा मोर्चा....
शिवसेना करनार वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध..
बृषभूषण सिंहांची राज ठाकरेंवर टीका
माफी मागावीच लागेल, बृजभूषण सिंहांचा राज ठाकरेंना इशारा
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची निश्चिती,
अजयपूर गावाजवळ काल रात्री झाला होता पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात,
पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक मध्ये झाली समोरासमोर धडक,
अपघातानंतर लागली भीषण आग, आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने भडकली आग,
मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत विझवली आग,
आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये, यातील टँकर मधील चालक-वाचकांचा मृतात समावेश,
तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा झाला कोळसा,
ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती,
अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू
पुण्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी, तर आज बृजभूषण यांची सभा
'अशी ही बनवाबनवी...' नितेश राणेंचा खोचक टोला
खोटारटेपणाचा कळस असलेल्या जिल्हा नियोजन बैठकीवर भाजपच्या वतीनं आम्ही बहिष्कार घालतोय
सिंधुदुर्ग- जिल्हा नियोजन मंडळाची आज बैठक
बैठकीवर भाजपचा बहिष्कार
सांगली जिल्ह्यात काल पासून पावसाची जोरदार बॅटिंग,,, तर जत दुष्काळी भागात पूल गेला पाण्याखाली. आज सकाळ पासून पुन्हा संततधार सुरू च,,, जिल्ह्यात सांगलीकराचे जनजीवन झाले विस्कळीत
सांगलीत मुसळधार पाऊस
- राज ठाकरेंचा दौरा रद्द… आता काँग्रेस नेते जाणार अयोध्येला
- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इतर पदाधीकारी श्रीराम दर्शनासाठी जाणार
- जून महिन्यात सुरुवातीला काँग्रेस नेते अयोध्येला जाणार
- ‘श्रीरामाच्या दर्शनासाठी निमंत्रण आल्याने आम्ही जाणार’
- काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची माहिती
- काँग्रेसच्या अयोध्या दर्शनाला राजकीय झालर?
लेबर कॉलनीतील 338 घर पडल्यानंतर आता 128 झाडांची होणार कत्तल
लेबर कॉलनीतील 128 झाडे तोडण्याची प्रशासनाने केली तयारी
128 झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे प्रशासनाने मागितली परवानगी..
लेबर कॉलनीतील तब्बल 128 हिरवीगार झाडांवर कोसळणार कुर्हाड
232 पैकी 128 झाडे कापण्याची परवानगी मागितली वनविभागाकडे..
टोलेजंग शासकीय इमारत बांधण्यासाठी 128 झाडांची होणार कत्तल..
राज ठाकरे यांना आम्ही सहकार्य केलं असतं
संजय राऊत यांचं मोठं विधान
15 जूनला आदित्य आयोध्येला जाणार- राऊत
भाजप राज्यातील नेत्यांना वापरुन घेतय- राऊत
शिवसेनेचा आयोध्या दर्शनाचा दौरा आहे राजकीय दौरा नाही- राऊत
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना दर्शनाला यायचंय, त्यांनी यावं- राऊत
जळगाव जिल्हा कारागृहात नेत असतांना पोलिसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी फरार कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ - केतकी चितळे विरोधात यवतमाळ मध्ये गुन्हा दाखल
राष्ट्रवादी च्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली फिर्याद
केतकी चितळे व लेखक नितीन भावे विरोधात अवधुतवाडी पोलिसात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल
'संदीप देशपांडे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट
अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर देशपांडे शिवतीर्थ वर
सकाळीच शिवतीर्थ परिसरात दिसून आले होते संदीप देशपांडे
हिंगोली/ सेनगाव मार्गावर भीषण अपघात
कार व टेम्पोची समोरासमोर धडक
कारमधील तिघे जण गंभीर असल्याची प्राथमिक महिती
केसापूर शिवारात घडली घटना
अपघात होताच घटनास्थळावरून टेम्पो चालकाचे पलायन.
नाशिक - नाशिक शहर पुन्हा एकदा हत्त्येच्या घटनेने हादरला - नाशिकच्या पूर्णिमा बस स्टॉप परिसरात युवकाची निर्घुण हत्या - सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात हत्याकांड - लुटमारीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय - हरीश पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव - लुटमारीचा उद्देशाने पाच जणांच्या टोळक्याने हत्या केल्याचा पोलिसांना संशय - हत्या झालेला हरीश पटेल हा युवक पुणे येथील राहणार असल्याची माहिती - अवघ्या 24 तासांत नाशिक शहरात दुसरी हत्या घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
- सोलापूर शहरात घरावर कोसळली वीज
- सोलापूर शहरातील शिवगंगानगरातील घरावर असलेल्या टॉवर रुमवर कोसळली वीज
- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली
- सोलापूर जिल्ह्यात काल रात्री उशीरापर्यंत 18 मिली मीटर पावसाची नोंद झालीय
- या पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्याला चांगलेच झोडपले
- दुपारपासून सुरु असलेला पाऊस रात्रभर कोसळत होता
- सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात 4 जणांचा मृत्यू...
अजयपूर गावाजवळ काल रात्री 2 ट्रकमध्ये भीषण अपघात,
पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक मध्ये झाली समोरासमोर धडक,
अपघातानंतर लागली भीषण आग, आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने भडकली आग,
मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी विझवली आग, आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती,
मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, पोलीस तपास सुरू
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता
आज दौऱ्यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार
विश्वसनीय सूत्रांची tv9मराठीला माहिती
पालघर शहरातील एका हॉटेलला लागली भीषण आग
पुनीत नगर परिसरात असलेल्या बिंगो बर्गर या हॉटेलला लागली भीषण आग
आगीमध्ये हॉटेल जळून खाक
पालघर नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
अग्निशमन जवानाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू
शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
अमरावतीत 15 वर्षीय बालकाचे अपहरण...
चार पैकी एका अपहरण कर्त्याच्या हाताला चावा घेऊन बालक निसटला..
15 वर्षीय बालकाचे अमरावतीतून अपहरण कुऱ्हा येथे सोडले..
चार अज्ञात अपहरणकर्त्यांनी विरोधात नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसाच्या सरी
हवामान विभागाचा पावसाचा अंदाज ठरला खरा
जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु
अखेरच्या टप्प्यातील आंब्याचा मोठे नुकसान
पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा इशारा
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा फटका
पैठण सिल्लोड फुलंब्री कन्नड या तालुक्यात अवकाळी पाऊस
सुमारे दोन तास औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाने झोडपले
अवकाळी पावसामुळे औरंगाबादकरांना उष्णतेपासून मिळाला दिलासा
दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी
काल दिवसभर ढगाळ वातावरणानंतर आज पहाटे बरसला पाऊस
पोलादपूर, महाड आणि माणगाव परिसरात हलका पाऊस
-भोरमधील भाटघर धरणात बुडून पाच तरूणींचा मृत्यू
-पाचही तरूणींचे मृतदेह सापडले
-रात्री उशिरा पर्यंत सुरू होतं शोधकार्य
खासदार बृजभूषन हे घेत आसलेल्या सभास्थळी उत्तर भारतीयांना अपराधी कहने वाले, राज ठाकरे माफी मागों या फिर वापस जाओ, अशा आशयाचे पोस्टर उत्तर प्रदेशमध्ये लावण्यात आले आहेत. तसेच अखिल भारतीय क्षत्रिय महासंघांने पत्र काढून, राज ठाकरेंनी माफी मागावी नतंर अयोध्येला यावे, अन्यथा अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ राज ठाकेरंचा, विरोध करेल आसे पत्रक त्यांनी काढले आहे
2024 चे उत्खनन सुरू? म्हणत शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
मंदिर मस्जीद व औरंगजेबच्या थडग्याचे वाद आपल्याकडे कधीच संपनारे नाहीत. कारण राजकीय भाकऱ्या त्याच आगीवर पेटवल्या जात आहेत, पण या आगीपेक्षाही पोटाची आग महत्वाची आहे त्या आगीचा वणवा पेटल्यावर काय होते, त्याचे पेटते उदाहरण बाजूच्या श्रीलंकेत दिसत आहे महागाई, भूक, आर्थिक आराजकतेतुन निर्माण झालेल्या प्रश्नावरधार्मिक मुद्दे विजय मिळवू शकले नाहीत म्हणून मंदिर मस्जीदीचा वणवा पेटवताना सगळ्यांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ऐशी तैशी सुरू आहे. देशभरात धर्माच्या नावानर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्ड्यांत देशाचे पाय डकू नये एवढीचं आपेक्षा .!!!
Published On - May 20,2022 6:14 AM