Maharashtra Breaking Marathi News Live | काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, नक्की प्रकरण काय?

| Updated on: Nov 04, 2023 | 7:07 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | काँग्रेसच्या 'या' आमदाराला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, नक्की प्रकरण काय?

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आता २ जानेवारीची मुदत दिली आहे. या दरम्यान मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती वेगाने काम करणार आहे. मराठा आरक्षणानंतर धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठीआक्रमक झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार आज संपणार आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने गुरुवारी आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी गर्दी एवढी नियंत्रणाबाहेर गेली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच मुंबईत पश्चिम रेल्वे वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा धावत आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Nov 2023 09:20 PM (IST)

    सोलापुरातील मोहोळ तालुक्यात सापडल्या कुणबी दाखल्याच्या 1934 सालच्या नोंदी

    सोलापूर | सोलापुरातील मोहोळ तालुक्यात सापडल्या कुणबी दाखल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1934 सालच्या नोंदी आढळल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत असलेले मराठा समाजाच्या कुटुंबियांचे कुणबी दाखले आढळून आले आहेत. जिल्हा परिषद शाळेतील एकाच रजिस्टरमध्ये पाच कुणबी दाखले आढळून आले आहेत.  1911 ते 1934 सालापर्यतचे एक रजिस्टर तपासण्यात आले. त्यात मराठा समाजातील व्यक्तीची “कुणबी”‌नोंद असल्याचे पाच दाखले आढळून आले आहेत. मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे गावोगावी जाऊन दाखले तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या दाखल्याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलीय.

  • 03 Nov 2023 09:07 PM (IST)

    कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, सकल मराठा समाज संघटनेची मागणी

    पंढरपूर | कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, अशी मागणी पंढरपूर सकल मराठा समाज संघटनेने केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा न करण्यावर संघटना ठाम आहे. 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची महापूजा आहे. कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू नका, असं संघटनेचं म्हणणं आहे. अन्यथा दोन महिने साखळी उपोषणाला बसू, असा इशारा संघटनेने दिलाय.

  • 03 Nov 2023 07:53 PM (IST)

    Suresh Warpudlar | काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

    नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकरांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णयास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती दिली आहे. विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेची थकबाकीदार असल्याच्या कारणाने बँकेचे संचालकत्व अपात्र केलं होतं. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशास स्थगिती दिल्याने वरपुडकर गटास मोठा दिलासा मिळालाय. सुरेश वरपुडकर हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष आहेत.

  • 03 Nov 2023 07:27 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे पाटील यांच्या तब्येतची चौकशी

    मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या तब्येतीची संदर्भात चौकशी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईतील हॅास्पिटलमध्ये उपचार घेण्याची विनंतीही केली आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

  • 03 Nov 2023 07:22 PM (IST)

    Central Railway | मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी पॉवर ब्लॉक

    मुंबई | मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार स्टेशनवर पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही वेळ अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

  • 03 Nov 2023 06:55 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे यांना फोन

    मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्यानंतर मुख्यमंत्र्यानी तातडीने मनोज जरांगे यांना फोन केला आहे. तब्बल 4 मिनिटे मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांची चर्चा झालीये. तब्येतीची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना विनंती केल्याची माहिती मिळत आहे.

  • 03 Nov 2023 06:33 PM (IST)

    प्रकाश सोळंके यांच्या पुतण्याचा मोठा खुलासा

    घडलेली घटना भयावह होती. घराला आग लागली तेंव्हा मी माझ्या कुटुंबासह बीडच्या घरी होतो. आधी दगडफेक झाली, त्यानंतर घराला आग लावण्यात आली. अंगणातल्या गाड्या जाळल्या. शेकडो तरुण पोरं जमावात होती. अचानक हल्ला झाल्याने आम्ही गोंधळून गेलो होतो. या घटनेत माझं कुटुंब सावरलं नाही. माझी मुलगी दहशतीत आहे, असे जयसिंह सोळंके यांनी सांगितले आहे, जयसिंह सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत.

  • 03 Nov 2023 06:22 PM (IST)

    खासदार अमोल कोल्हे यांचे मोठे विधान

    जर माझा त्यांना पाठिंबा असता तर निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकच खासदाराच समर्थन आहे असं का सांगितले? संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, उगाच त्यांना महत्व देऊ नका.  मी शरद पवारासोबत आहे आणि ठामपणे पवार साहेबां सोबतच असणार, असे डॉ अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

  • 03 Nov 2023 06:12 PM (IST)

    ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही- प्रकाश शेंडगे

    ओबीसीतून जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर आमचा त्यासाठी कायम विरोध असेल मागासवर्गीय आयोगाने जर तसा निर्णय दिला तरी देखील ओबीसी समाजा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीये, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

  • 03 Nov 2023 06:06 PM (IST)

    केंद्र सरकारकडून कोल्हापूर शहराला दिवाळीच्या तोंडावर मोठं गिफ्ट

    केंद्र सरकारकडून कोल्हापूर शहराला दिवाळीच्या तोंडावर मोठे गिफ्ट मिळाले आहे. केंद्र सरकारकडून शहरासाठी वातानुकुलित ई बसेसला मंजूरी मिळालीये. लवकरच कोल्हापूर शहरासाठी 100 ई बसेस मिळतील.

  • 03 Nov 2023 05:50 PM (IST)

    जरांगेंचं आंदोलन संपताना उद्धव ठाकरे मुंबईतचं होते- अनिल परब

    जरांगे पाटलांचं आंदोलन संपताना उद्धव ठाकरे मुंबईतच होते, असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं आहे. शिष्टमंडळ जालन्याला जाताना विमानतळावर ठाकरेंना पाहिलं असा आरोप नितेश राणे यांनी केला होता. एका मंत्र्याने विमानतळावर ठाकरेंशी संवाद साधल्याचंही नितेश राणे म्हणाले होते.

  • 03 Nov 2023 05:40 PM (IST)

    एल्विशवर ड्रग्ज विक्री केल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आरोप

    नशेसाठी सापाचे विष पार्टीत पुरवत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एल्विश काही दिवसांआधी शिंदेंच्या आरतीसाठी आला होता असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ड्रग्स रॅकेटमध्ये एल्विशचा हात आहे का याचा तपास करण्याची मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

  • 03 Nov 2023 05:25 PM (IST)

    माझा घरावर हल्ला करणारे मराठा समाजातील नव्हते- प्रकाश सोळंके

    माझ्या घरावर हल्ला करणारे मराठा समाजाचे नव्हते. तर विरोधकांनी माझ्या घरावर हल्ला केला, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. जरांगेंची भेट घेऊन झालेले गैरसमज दूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 03 Nov 2023 05:15 PM (IST)

    …तर मी कर्नाटकचा मुख्यमंत्री व्हायला तयार आहे – प्रियांक खरगे

    कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील बैठकीत चार नेत्यांशिवाय इतर कोणाच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. हायकमांडने बोलणं गरजेचं आहे. हायकमांडने मला मुख्यमंत्री होण्यास सांगितले तर मी हो म्हणेन.

  • 03 Nov 2023 05:10 PM (IST)

    घरावरचा हल्ला पूर्वनियोजित कट, जयदत्त क्षीरसागर यांचा आरोप

    घरावरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे. कुटुंबाला कोंडून मारण्याचा प्रयत्न होता. काम फत्ते झालं असं हल्लेखोरांचा एकमेकांशी फोनवरून संवाद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. हल्ल्यामागचा मास्टरमाइंड शोधून काढा, अशी मागणि जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.

  • 03 Nov 2023 04:59 PM (IST)

    तर सरकार जबाबदार

    माझ्या वडिलांना काही झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हिनं म्हटलं आहे. वडील जिद्दी आहेत, त्यामुळे राज्य सरकारने दगाफटका केल्यास मुंबईचं नाक बंद करु, असा इशारा पण पल्लवीने दिला. मराठा आरक्षणासाठीच्या लढाईत पल्लवी जरांगे हिने पण हिरारीने सहभाग घेतला आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे जी सभा घेतली, त्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.

  • 03 Nov 2023 04:44 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी सरकार ॲक्शन मोडवर

    मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहे. अंतिम मुदतीचा वाद उफळला असताना आता राज्य सरकार थेट काम करत आहेत. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरु आहे. शिंदे समितीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

  • 03 Nov 2023 04:30 PM (IST)

    अजित पवार यांच्या नेतृत्वात नवीन पर्व

    अजित पवार यांच्या नेतृत्वात नवीन पर्व सुरु करण्यात येत आहे. येत्या 5 तारखेपासून घड्याळ चिन्ह घेऊन पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. लवकरच संघटनेचा राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याच्या चौकटीत आम्ही काम केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी कोणाची हे समोर येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

  • 03 Nov 2023 04:09 PM (IST)

    मनोज जरांगे यांना अशक्तपणा

    मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. त्यांना उलट्या झाल्या. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या यकृतावर सूज आल्याचे समोर येत आहे. गेल्या 9 दिवसांपासून ते आमरण उपोषण करत होते. काल यशस्वी मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.

  • 03 Nov 2023 04:01 PM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली

    मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. आरक्षणासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

  • 03 Nov 2023 03:58 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी मनसेकडून जलाभिषेक

    मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मध्ये उपचार सुरू आहेत मनोज जरांगे पाटलांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बीडच्या कंकालेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. शहराध्यक्ष करण लोंढे आणि पदाधिकाऱ्यांनी बीडच्या कंकालेश्वर मंदिरात जल अभिषेक केला.

  • 03 Nov 2023 03:45 PM (IST)

    माझ्या भावाने सरकारला झुकवलं, तो करतोय त्याचा अभिमान- जरांगेंच्या बहिणीची प्रतिक्रिया

    माझ्या भावाने सरकारला झुकवलं, तो करतोय त्यांचा अभिमान. जे उपोषण केले त्यात यश येऊ दे आणि महाराजांना जशी तलवार दिली तसंच देवीने पाठबळ द्यावं, जरांगेंच्या बहिणीची प्रतिक्रिया तुळजापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये दिली.

  • 03 Nov 2023 03:27 PM (IST)

    आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही त्यांनी बोलावलं की आपण जाणार- मनोज जरांगेंच्या मुलीची प्रतिक्रिया

    ते आंदोलनात असले तर आम्ही जात नाही आणि बोलतही नाही, आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही त्यांनी बोलावलं की आपण जाणार- मनोज जरांगेंच्या मुलीची प्रतिक्रिया

  • 03 Nov 2023 03:15 PM (IST)

    ‘माझ्या कपाळावरच कुंकू कायम ठेव आणि आरक्षण मिळू दे’; मनोज जरांगेंच्या पत्नीचं वक्तव्य

    माझ्या कपाळावरच कुंकू कायम ठेव आणि आरक्षण मिळू दे, मनोज जरांगे यांच्या पत्नीची तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्तव्य केलं आहे.

  • 03 Nov 2023 02:31 PM (IST)

    मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण, पुणे विद्यापीठात दोन संघटना आमनेसामने

    पुणे विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याने भाजप युवा मोर्चा आणि एसएफआय या दोन संघटना एकमेकांच्या विरोधात भिडल्या आहेत.

  • 03 Nov 2023 02:22 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या – धुळ्यात आंदोलकांची मागणी

    मराठा नेत्यांचे यापूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी धुळे येथे मराठ कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.

  • 03 Nov 2023 02:06 PM (IST)

    बीडच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना – जयदत्त क्षीरसागर

    आंदोलकांनी घराला आग लावली त्यावेळी मी घरात नव्हतो. मात्र घरात एवढे अन्य सदस्य असताना पेट्रोल बॉम्ब टाकणे, त्यांना कोंडणे अशी दुर्दैवी घटना कधी घडली नाही. या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधून काढणे त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा देण्याची गरज आहे असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

  • 03 Nov 2023 01:59 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

    ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 बोनस देण्यात आला होता तर यावर्षी  तो बोनस 18 हजार बोनस देण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्रानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.
  • 03 Nov 2023 01:55 PM (IST)

    धाराशिवमध्ये विनायक पाटील यांनी जिवंत समाधीचा निर्णय घेतला मागे

    धाराशिव : मराठा आरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटील यांनी जिवंत समाधीचा निर्णय मागे घेतला. मनोज जरांगे यांनी फोन केल्यानंतर अन्नत्याग आमरण उपोषण व समाधीचा निर्णय मागे घेतला आहे.  आज गावाकऱ्याच्या उपस्थितीत विनायक पाटील हे खड्ड्यात जाऊन बसले होते. टाळ वाजवत सुरु असलेला समाधी कार्यक्रम मागे घेतला आहे.  धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे ते जिवंत समाधी घेणार होते. सरकार मराठा आरक्षण देत नसल्याने जिवंत समाधीचा त्यांनी इशारा दिला होता.

  • 03 Nov 2023 01:45 PM (IST)

    बीड जिल्हात बाजारपेठा खुल्या, पण इंटरनेट सेवा मात्र कोलमडली 

    बीड :  बीडमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली होती. कुठलाही चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये आणि अफवा पसरू नये यासाठी बीडमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.  पाच दिवसानंतर बीड शहर आणि परिसरातील बाजारपेठा खुल्या झाल्यात. मात्र इंटरनेट नसल्याने व्यवहार मात्र ठप्प झाले आहेत. इंटरनेट सुविधा सुरळीत कराव्यात, अशी मागणी बीडकरांनी केली आहे.

  • 03 Nov 2023 01:40 PM (IST)

    पाच दिवसांनंतर बीड जिल्ह्यात लालपरीची बससेवा सुरू

    बीड : बीड जिल्ह्यात पाच दिवसानंतर बससेवा सुरू झाली आहे. आंदोलकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस टार्गेट केल्या होत्या. बीड जिल्ह्यातील शंभरहून अधिक बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बस सेवा पूर्णतः बंद करण्यात आले होती. आज पाचव्या दिवशी बीडची परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या बस सेवा सुरू करण्यात आली आहे. अनेक बसेसचं नुकसान झाल्याने बीड जिल्हांतर्गत बस सेवा सध्या बंदच आहे.

  • 03 Nov 2023 01:33 PM (IST)

    बीड जिल्ह्यातील गाव बंदी हटविली 

    बीड :  जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सर्व पक्षी नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी काल त्यांचे उपोषण स्थगित केलं आणि गाव बंदी हटवा असं सांगितल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाने गावबंदी हटवली आहे बीडच्या पेंडगावात सर्वात आधी गाव बंदी करण्यात आली होती आणि याच गावापासून गाव बंदीचे जे बॅनर आहेत ते काढण्यात आले आहेत.

  • 03 Nov 2023 01:27 PM (IST)

    ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरुप सुटका

    पुणे : ससून रुग्णालयात चौथ्या आणि पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकल्याची घटना घडली. या लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची माहिती मिळत असून अग्निशमन दलाकडून अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दलाकडून लिफ्टमध्ये अडकलेल्या ५ पुरुष आणि१ महिला अशा एकूण सहा जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

  • 03 Nov 2023 01:20 PM (IST)

    पुणे विद्यापीठाच्या भिंतीवर मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजप आक्रमक

    पुणे : नरेंद्र मोदींबद्दल पुणे विद्यापीठाच्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे.  पुणे शहर भाजप आज पुणे विद्यापीठ प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन करणार आहे.  मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाईची भाजपची मागणी आहे.

  • 03 Nov 2023 01:12 PM (IST)

    ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या फटाक्यांवर बंदी

    चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाने फटाक्यांच्या ध्वनी पातळीची चाचणी घेतली. चंद्रपूर शहराजवळच्या MEL मैदानावर ही चाचणी घेण्यात आली.  ध्वनी प्रदूषणाच्या सीमेचं उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या फटाक्यांवर बंदी लावण्याची मागणी करण्यात येणार आहे.

  • 03 Nov 2023 12:52 PM (IST)

    सरकार टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध! – उदय सामंत

    जरांगेनी सांगितल्याप्रमाणेच शिंदे समिती काम करेल. टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी काम सुरु. सरकार टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध! जरांगेंकडून सरकारला 2 महिन्याचा कालावधी. – उदय सामंत

  • 03 Nov 2023 12:35 PM (IST)

    Supriya Sule | 4 महिने झाले तरी तटकरेंवर कोणतीही कारवाई नाही

    खासदार तटकरेंना अपात्र करा यासाठी याचिका केली होती. 4 महिने झाले तरी कोणतीही कारवाई नाही. तटकरेंवर कोणतीही कारवाई नाही. दिल्लीत अदृश्य शक्ती आहे, शिंदेंकडून अदृश्य शक्तीचा उल्लेख. दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्रविरोधात काम करते. या शक्तीमुळेच सगळे खेळ सुरु. सरकार महाराष्ट्रात एक बोलतं, दिल्लीत एक बोलतं! – सुप्रिया सुळे

  • 03 Nov 2023 12:23 PM (IST)

    Kolhapur | ऐन सनासुदीच्या काळात कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणात

    ऐन सनासुदीच्या काळात कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणात. शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ. टँकरचे पाणी भरण्यासाठी महिलांची चढाओढ. बालिंगा पंप हाऊस मधील मोटार ना दुरुस्ती झाल्याने शहरातील पाणीपुरवठा चार दिवसापासून आहे बंद. शाहूपुरी सह परिसरात आठ दिवसापासून नळाला पाणी नाही. सणासुदीच्या काळात महिलांना मनस्ताप

  • 03 Nov 2023 12:10 PM (IST)

    मीरा भाईंदर महानगरपालिका समोर भाजपाच्या अनोखं आंदोलन

    मीरा भाईंदर महानगरपालिका समोर भाजपाच्या अनोखं आंदोलन. शहरात खेळाचा मैदानाची मागणी घेऊन भाजपचा अनोखं आंदोलन. पालिकेसमोर रस्त्यावर क्रिकेट सहित अन्य खेळ खेळत असताना खेळाच्या मैदानाची मागणी. भाजपाच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.

  • 03 Nov 2023 11:59 AM (IST)

    Live Update : 441 शेतकऱ्यांना मिळाली 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतरवली सराटीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. 441 शेतकऱ्यांना 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. मनोज जरंगे यांच्या सभेमुळे 441 शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. सभेसाठी आलेल्या लाखो लोकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला आहे.

  • 03 Nov 2023 11:49 AM (IST)

    Live Update : नितिन गडकरी यांना विरारमध्ये दाखवले काळे झेंडे

    नितिन गडकरी यांना विरारमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. एका कार्यक्रमासाठी विरारमध्ये गेलेल्या नितिन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.

  • 03 Nov 2023 11:38 AM (IST)

    Live Update : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

    ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 03 Nov 2023 11:30 AM (IST)

    Live Update : सरकरचं शिष्टमंडळ आज पुन्हा घेणार मनोज जरांगे यांची भेट

    सरकरचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारपर्यंत शिष्टमंडळ रुग्णालयात येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

  • 03 Nov 2023 11:20 AM (IST)

    Live Update : बेळगाव काळा दिन रॅली प्रकरणी दीड हजार जणांवर गुन्हे

    बेळगाव काळा दिन रॅली प्रकरणी दीड हजार जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा जमाव जमवणे, भाषिक तेढ निर्माण करणे… कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीमावासीयांवर पुन्हा एकदा कर्नाटक सरकारची दडपशाही सुरु झालेली पाहायला मिळत आहे.

  • 03 Nov 2023 11:09 AM (IST)

    Live Update : तुळजापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी महिलांची पदयात्रा

    तुळजापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी महिलांची पदयात्रा निघाली आहे. मनोज जरांगे यांच्या पत्नी पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पदयात्रेतून तुळजाभवानी देवीकडे मराठा आरक्षणासाठी साकडं घातलं जाणार आहे…

  • 03 Nov 2023 11:06 AM (IST)

    Live Update : कंगना करणार राजकारणात प्रवेश… लढणार लोकसभा, राजकारणातील एन्ट्रीचे दिले संकेत

    कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री लढणार निवडणूक? अभिनेत्रीने एक मोठं वक्तव्य केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत आणि तिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा… वाचा सविस्तर

  • 03 Nov 2023 10:59 AM (IST)

    Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागण्यासाठी जरांगेंनी चांगला लढा दिला- तायवाडे

    मराठा समाजाच्या मागण्यासाठी मनोज जरांगेंनी चांगला लढा दिला असं ओबीसी नेते बबन तायवाडे म्हणाले. मागासवर्ग आयोगाने मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करावे असे बबनराव तायवाडे म्हणाले.

  • 03 Nov 2023 10:53 AM (IST)

    Maratha Reservation : 24 डिसेंबर की 2 जानेवारी या नव्या डेडलाईलवरून घोळ

    मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. मात्र मनोज जरांगे यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला असल्याचं ते म्हणाले. या दोन महिन्यांच्या कालावधीत सरकार नियोजीत काम पुर्ण करेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

  • 03 Nov 2023 10:32 AM (IST)

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर ही तारीख लिखीत मिळाली- जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी लिखीत आश्वासनानंतर काल आमरण उपोषन मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर ही तारिख लिखीत मिळाली असं जरांगे पाटील म्हणाले.संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देणं त्यांनी टाळलं.

  • 03 Nov 2023 10:21 AM (IST)

    Maratha Reservation : संजय राऊत यांचं वक्तव्य राजकिय- जरांगे पाटील

    तीस नोव्हेंबरला सरकार कोसळणार असल्यानं जरांगे पाटील यांना 24 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य हे राजकीय आहे त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रीया देणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 03 Nov 2023 10:09 AM (IST)

    Maharashtra News : भाजपकडून ईडीचा राजकीय हत्त्यार म्हणून वापर- संजय राऊत

    संजय राऊत यांनी विरोधकांवर होत असलेल्या ईडी कारवाईवरून सरकारला धारेवर धरले आहे. भाजपकडून ईडीचा राजकीय हत्त्यार म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

  • 03 Nov 2023 10:00 AM (IST)

    संपूर्ण मराठा समाज जरांगेमागे उभा – संजय राऊत

    संपूर्ण मराठा समाज जरांगेमागे उभा आहे. जीवावर बेतत असल्याने जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती झाली, असे संजय राऊत म्हणाले.

    पण उपोषण मागे घेतलं असलं तरी पेच अद्यापही कायम आहे. असेही राऊत यांनी सांगितले.

  • 03 Nov 2023 09:51 AM (IST)

    उपोषणामुळे जरांगेंच्या किडनी आणि लिव्हरला सूज

    उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली.

    त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला आणखी ५ ते ६ दिवस लागतील. ते उपचारांना हळूहळू प्रतिसाद देत आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

  • 03 Nov 2023 09:40 AM (IST)

    महायुतीच्या आमदारांची आज संध्याकाळी ‘वर्षा’ वर महत्वाची बैठक

    महायुतीच्या आमदारांची आज संध्याकाळी सहा वाजता ‘वर्षा’वर महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील. तब्येत ठीक असल्यास अजित पवारही बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 03 Nov 2023 09:34 AM (IST)

    ललित पाटीलचे भाजपच्या मंत्र्यासोबत संबंध – रविंद्र धंगेकर

    ललित पाटीलचे भाजपच्या मंत्र्यासोबत संबंध आहेत, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला. ललित पाटील प्रकरणात भाजपच्या एका मंत्र्याकडुन पुणे ससुन रूग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांना मदत करण्यात आली असेही ते म्हणाले.

    तसेच ललित पाटीलला मोक्का लावला असेल तर संजीव ठाकूरवर पण मोक्का लावण्यात यावा. ललित पाटील आणि संजीव ठाकूर यांना सहआरोपी करा. त्या दोघांचीही नार्को टेस्ट करावी अशी मागणी धंगेकर यांनी केली.

  • 03 Nov 2023 09:23 AM (IST)

    मराठवाड्यात इंटरनेट सेवा पुन्हा सुरू

    मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

    जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि बीडमधील जाळपोळीमुळे काही दिवसांपासून इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता.

  • 03 Nov 2023 09:11 AM (IST)

    मुंब्रा – ठाकरे गटाची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्याने वाद

    मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. शाखेवर बुलडोझर फिरवल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू झाला. अनेक दिवसांपासून शाखा बंद असल्याने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

  • 03 Nov 2023 09:02 AM (IST)

    Raju Shetti | राजू शेट्टी यांची पदयात्रा आजपासून

    मराठा आंदोलनामुळे स्थगित झालेली राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा आजपासून सुरू होणार. साखराळे येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यापासून सुरू होणार पदयात्रा. मागील हंगामातील ऊसाला चारशे रुपयांचा हप्ता मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. 22 दिवसांची 522 किलोमीटरची पद यात्रा.

  • 03 Nov 2023 09:00 AM (IST)

    Kolhapur News | लग्न होऊ नये यासाठी जादूटोण्याचा प्रकार

    मुलीचं तिच्या प्रियकराशी लग्न होऊ नये यासाठी जादूटोण्याचा प्रकार. आजरा तालुक्यातील मालिग्रे गावातील घटना. मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित मुलाचा फोटो, काळी बाहुली आणि अन्य साहित्य स्मशानभूमीत पुरले. तर गावातील एका मंदिरा शेजारी अघोरीं साहित्य ठेवण्याचा प्रयत्न. याप्रकरणी चौघां विरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • 03 Nov 2023 08:23 AM (IST)

    Maratha Reservation | 3500 कुणबी नोंदी सापडल्या

    शिंदे समितीच्या शोध मोहिमेत आणखी 3500 नोंदी सापडल्या. मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी पोचल्या 15 हजारावर. 25 हजारापर्यंत नोंदी सापडण्याचा समितीला अंदाज. 25 हजार नोंदीतून 25 लाख मराठा समाजाला प्रमाणपत्र देणे शक्य. शिंदे समितीतील विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिंदे समितीची कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरूच

  • 03 Nov 2023 08:07 AM (IST)

    Uddhav Thackeray : कोकण पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित

    कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला. उद्धव ठाकरे गटाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन मैदानात उतरणार. कोकण पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला. किशोर जैन यांना महाविकास आघाडीकडून हिरवा कंदिल. कोकण पदवीधर मतदार संघासाठी जून 2024 मध्ये निवडणूक. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत पहायला मिळणार

  • 03 Nov 2023 07:59 AM (IST)

    Maharashtra News | राज्यातील कृषी केंद्र चालकांचा बंद

    राज्यातील कृषी केंद्र चालकांनी तीन दिवसीय राज्यस्तरीय बंद पुकारला आहे. शासनाने आणलेल्या प्रस्तावित विधेयकातील जाचक अटी आणि नियम कृषी केंद्र संचालकांना घातक आहे. त्याच्याविरोधात कृषी केंद्र संचालकांची बंद पुकारला आहे.

  • 03 Nov 2023 07:45 AM (IST)

    Maharashtra News | मराठा आरक्षण घालवण्यात उद्धव ठाकरे जबाबदार

    मराठा आरक्षण घालवण्यात उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मराठा आरक्षण देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरलेत. त्यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने मराठा आरक्षण घालावले, अशी टीका भाजप नेते जगदीश मुळीक यांची केली.

  • 03 Nov 2023 07:31 AM (IST)

    Maharashtra News | पश्चिम रेल्वे वेळेपेक्षा उशिराने

    पश्चिम रेल्वे वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा धावत आहे. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.रेल्वे उशिराने धावत असल्याने रेल्वे फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

  • 03 Nov 2023 07:20 AM (IST)

    Maharashtra News | शाहरुखच्या चाहत्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज

    बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने गुरुवारी आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासूनच चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी उसळली. गर्दी एवढी नियंत्रणाबाहेर गेली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

  • 03 Nov 2023 07:17 AM (IST)

    Maharashtra News | कैद्यांना मिळणार स्मार्ट फोन सुविधा

    राज्यातील सर्व कारागृहातील कैद्यांना स्मार्ट फोन सुविधा मिळणार आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर कैद्यांसाठी सुरू केलेली स्मार्ट फोन सुविधा आता राज्यातील अन्य काराग्रहातील कैद्यांसाठीदेखील सुरू करण्यात येणार आहे.

Published On - Nov 03,2023 7:15 AM

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.