AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Meeting Decisions : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती, मंत्रिमंडळ बैठकीत 6 सर्वात मोठे निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण सहा मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे सामान्य जनतेला तसेच शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही निर्णय या बैठकीत झाला.

Cabinet Meeting Decisions : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती, मंत्रिमंडळ बैठकीत 6 सर्वात मोठे निर्णय!
cabinet meeting decision todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 01, 2026 | 4:00 PM
Share

Cabinet Meeting Decisions Today : राज्य मंत्रिमंडळाची आज (1 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली तसेच जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, महसूल विभागाशी निगडीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एकूण सहा निर्णय घेण्यात आले असून या निर्णयांचा शेतकरी, खेळाडू, दिव्यांग विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग

महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविला जाणार आहे.

महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभाग

•अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उपवर्गिकरणाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

महसूल विभाग

भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद असणार आहे. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार आहे. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

दिव्यांग कल्याण विभाग

•राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिव्यांग विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत