AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आजच्या उपराष्ट्रपतीच्या शपथविधीला अजित पवार का आले नाहीत? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की…

"महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, जे जे केलं नियमानुसार, कायद्याच्या चौकटीत बसवून केलं. ओबीसी किंवा अन्य कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये ही भावना कालही होती, आजही आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे, तो कायद्याच्या चौकटीत बसवून काढला आहे.ओबीसी समाजाच कुठेही नुकसान होणार नाही" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : आजच्या उपराष्ट्रपतीच्या शपथविधीला अजित पवार का आले नाहीत? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की...
Eknath Shinde
| Updated on: Sep 12, 2025 | 11:39 AM
Share

“आजचा दिवस एनडीएच्या दृष्टीने महत्वाचा, आनंदाचा दिवस आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय झालाय. दिमाखदार सोहळा पार पडला.शपथविधीला आम्हाला उपस्थित राहता आलं. मी उपराष्ट्रपती सीपी राधकृष्ण यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या पदावरुन जाऊनही साधी राहणी, मनमिळावू स्वभाव, उच्च विचासरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून सीपी राधाकृष्णन विराजमान झाले आहेत. राज्यपाल, संसदीय कार्याच त्यांना अनुभव आहे. खऱ्या अर्थाने या पदाची शान, मान ते वाढवतील याचा अभिमान आहे. देशाच्या विकासात, प्रगतीत त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, म्हणून मनपासून शुभेच्छा देतो” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवार आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, त्यावर सुद्धा एकनाथ शिंदे बोलले. “अजितदादांच्यावतीने प्रफुल पटेल उपस्थित होते. ते मला भेटले एनडीएच सगळे लोक होते. त्यांचा रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम होता, म्हणून अजितदादा आले नाहीत” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

‘अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे’

महाराष्ट्रात हिंसाचार होईल, नेपाळ सारखी स्थिती होईल असं संजय राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “खरं म्हणजे अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण शेवटी प्रत्येकाला देशाचा स्वाभिमान, अभिान असला पाहिजे. देशावर प्रेम करणारे लोक अशी वक्तव्य करु शकत नाहीत. काही लोकांच्या मनात आहे की, जशी परिस्थिती नेपाळची झाली, तसं अराजक निर्माण करण्यासाठी डाव, कारस्थान कोणी रचत नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो?” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आपली लोकशाही प्रगल्भ आहे, मजबूत आहे. आपल्या मनातले भाव बोलून दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.

‘अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील’

कर्नाटकात काँग्रेस सरकारकडे मेट्रो स्टेशनच छत्रपती शिवाजी महाराजांच नाव बदलून सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे दुर्देवी आहे. इंग्रज निघून गेलेत, त्याला 75 वर्ष झाली आहेत. इंग्रजांची आठवण ठेवण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रच नाही, तर सगळ्या देशाचे आराध्य दैवत आहेत. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे. अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील”

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....