अर्ज किया है : उमेदवारी अर्ज भरताना दिग्गजांचं शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारांची अर्ज (Maharashtra election nomination form) भरण्यासाठी रेलचेल सुरु आहे.

maharashtra election nomination form, अर्ज किया है : उमेदवारी अर्ज भरताना दिग्गजांचं शक्तिप्रदर्शन

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारांची अर्ज (Maharashtra election nomination form) भरण्यासाठी रेलचेल सुरु आहे. काल राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे (Maharashtra election nomination form) दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. आजही अनेक जण अर्ज भरणार आहेत.

आज कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार/भरले –

अर्ज किया है –

  • शिवेंद्रराजे भोसले (भाजप) – जावळी, सातारा
  • गीता गवळी (अखिल भारतीय सेना) – भायखळा, मुंबई
  • हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी) – वसई
  • अबू आझमी (समाजवादी पार्टी) – मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई
  • अमल महाडिक (भाजप) – कोल्हापूर दक्षिण विधानसभा

काल दिवसभरात 63 अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- 2 मतदारसंघात 3 उमेदवार, नांदेड- 5 मतदारसंघात 15 उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी- 2 मतदारसंघात 6 उमेदवार, जालना- एका मतदारसंघात 2 उमेदवार, औरंगाबाद- 4 मतदारसंघात 8 उमेदवार, नाशिक- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात 5 उमेदवार, पुणे- 7 मतदारसंघात 8 उमेदवार, अहमदनगर- 5 मतदारसंघात 9 उमेदवार, बीड- 4 मतदारसंघात 9 उमेदवार, लातूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार, सोलापूर- 2 मतदारसंघात 2 उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *