रिमोट मातोश्रीच्या हाती की देवाभाऊ मुंबईचा किंग?, महापालिका निकालाचा काऊंटडाऊन सुरू; थोड्याच वेळात…
Municipal Corporation 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला सुरूवात होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. प्रत्येक अपडेट tv9 मराठीवर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.

राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल लागणार आहे. 8 वाजल्यापासून निकालाचे अपडेट हाती येतील. काल ऐन मतदानाच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडूनही एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केले जात असल्याचे सांगितले. बोटावरील शाई लावल्यानंतर लगेचच पुसण्याचा प्रयत्न केला तरच निघू शकते, त्याशिवाय नाही, असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. काही व्हिडीओ सोशल मीडियावर बोटावरील शाई पुसण्याचे व्हायरल झाले, ते तपासून कारवाई करणार असल्याचे स्पष्ट निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
काल काही भागात EVM मशिन बंद पडल्याचा दावा करण्यात आला. काही मतदान केंद्रात गोंधळ झाला. राज्यातील जवळपास भागात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. आता अवघ्या काही वेळातच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येतील. राज्यातील प्रत्येक महापालिकेच्या निकालाचे अपडेट तुम्हाला tv9 मराठीवर बघायला मिळतील.
Municipal Election 2026
Maharashtra Election Results 2026: 29 महापालिकांचा आज महानिकाल...
Municipal Corporation PCMC Election Results 2026 : महेश लांडगे अजित पवारांसाठी ठरणार वरचढ?
Shivdi BMC Election Results Live 2026 : ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेल्या शिवडीचा इतिहास आज बदलणार का?
Malad BMC Election Results Live 2026 : मालाडमध्ये मतमोजणीच्या किती फेऱ्या होणार?
Pune Election Results 2026 : निकाला आधीच भाजपच्या गणेश बिडकर यांचे महापौर साहेब अशा आशयाचे बॅनर
Ichalkaranji Election Results 2026 : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात
तुम्हाला सर्व महापालिकांचे झटपट अपडेट पाहायचे असतील तर https://www.tv9marathi.com/ याला भेट द्या. यासोबतच https://www.youtube.com/@TV9MarathiLive येथेही आपल्याला महापालिकेच्या निकालासंदर्भात प्रत्येक अपडेट मिळेल. 29 महापालिकांपैकी कोणत्याही महापालिकांच्या थेट अपडेट हवे असेल तर आपण लाईव्ह टीव्हीला भेट देऊ शकता.
राज्यातील 29 महापालिकांमध्ये नक्की कोणता पक्ष वरचढ ठरतो याबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या महापालिकांसाठी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली. आरोप प्रत्यारोपाच सत्र रंगताना दिसले. शेवटी मतदार राजा कोणाच्या मागे उभा आहे, हे अगदी थोड्याचवेळा स्पष्ट होईल. राज्यातील सर्व महापालिकांचे निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होताना दिसतील.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट पाहा..
