AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेच्या शेतात असं काय पिकतं, ज्यामुळे ते टवटवीत होतात, सामनातून खोचक टीका

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या विध्वंसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत आहे

शिंदेच्या शेतात असं काय पिकतं, ज्यामुळे ते टवटवीत होतात, सामनातून खोचक टीका
| Updated on: Sep 19, 2025 | 9:19 AM
Share

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती बरी नाही. पूर-पावसामुळे शेती वाहून गेली. पंचनाम्यास आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. या आठ दिवसांत 17 शेतकऱ्यांनी व वर्षभरात दोन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लाखो शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत व त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले आहे. त्यामुळे मिंधे यांचे असे कोणते शेत आहे व त्या शेतात असे काय पिकते की, ज्यामुळे शेतीत काम करून त्यांचा चेहरा टवटवीत होतो? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

नेते मात्र थापा मारण्यात मग्न

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. गेल्या आठ दिवसांत १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, वर्षभरात ही संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. या गंभीर परिस्थितीतही सरकारमधील नेते मात्र थापा मारण्यात आणि जनतेला खोटी आश्वासने देण्यात मग्न आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली.

शेतात काय पिकते ते लोकांना कळू द्या

यावेळी सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मिंधे आणि अजित पवार यांच्यासारखे नेते ठेकेदारीच्या दलालीतून कोट्यधीश आणि अब्जोपती झाले आहेत. त्यामुळे राज्याला कितीही कर्ज झाले किंवा शेतकरी आत्महत्या करत असले, तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. कंटाळा आला की ते हेलिकॉप्टरने शेतावर जातात. थापांचे पीक काढतात आणि इतके टवटवीत होतात की गुलाब पाकळ्यांनाही त्यांच्या टवटवीतपणाचा हेवा वाटावा. मिंधे यांचे शेत पर्यटनासाठी खुले करावे. त्यांच्या शेतात काय पिकते ते लोकांना कळू द्या. त्यांच्या टवटवीत शेतीचे बियाणे लाखो शेतकऱ्यांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे सरकार हे थापेबाजांचे सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांत थापा मारण्याची जी स्पर्धा सुरू आहे, ती थक्क करणारी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तर या तिघांच्या थापेबाजीला ऊत आला. मिंधे पालकमंत्री असलेल्या ठाण्यातील अनेक आदिवासी पाडे आजही विकास किरणांच्या प्रतीक्षेत आहेत. मिंधे, अजितदादा, फडणवीस हे याबाबतीत एक से बढकर एक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकांचे जीवन बदलले असा साक्षात्कार या तिघांना काल झाला. मोदी यांनी त्यांच्या काळात असे काय केले की, त्यामुळे लोकांचे जीवन बदलले? महाराष्ट्रासारख्या एकेकाळच्या प्रगत, श्रीमंत राज्यावर आज साडेनऊ लाख कोटींचे कर्ज चढले आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.