Bhagat Singh Koshyari | स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा आणि आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न : राज्यपाल

महात्मा गांधी यांच्या बापू कुटीला भेट देऊन त्यांनी आश्रमाचे दर्शन घेतले. तसेच, सामूहिक प्रार्थना देखील केली.

Bhagat Singh Koshyari | स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा आणि आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न : राज्यपाल

वर्धा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली (Governor Bhagat Singh Koshyari Visit Sevagram Ashram). महात्मा गांधी यांच्या बापू कुटीला भेट देऊन त्यांनी आश्रमाचे दर्शन घेतले. तसेच, सामूहिक प्रार्थना देखील केली. त्यांची ही भेट खासगी असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी आश्रमाच्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा अभिप्राय लिहिला. “येथे आल्यावर सादगी, शांती आणि स्वात्मनिर्भरतेचा आभास होतो. येथे अधिकाधिक युवाशक्ती पोहोचली तर स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा तथा आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न साकार होईल”, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केली (Governor Bhagat Singh Koshyari Visit Sevagram Ashram).

बापू नेहमीच स्वावलंबी गाव तसेच स्वावलंबी भारताचे स्वप्न बोलून दाखवायचे. पण महात्मा गांधी यांच्या स्वावलंबी या शब्दाला आता नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर या शब्दाची झालर दिसू लागली आहे आणि मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत या शब्दाचा उल्लेख आज नकळत राज्यपालांच्या अभिप्रायातून प्रगट झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सेवाग्राम आश्रमात आल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील बा कुटी, बापू कुटी आणि येथील विविध उपक्रमांना भेट दिली. बापू कुटीमध्ये प्रार्थना केली, तसेच आश्रमातील खादी युनिटमधून 9 मीटर खादी खरेदी करत 1620 रुपये सुद्धा दिले. आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांच्याशी चर्चा केली (Governor Bhagat Singh Koshyari Visit Sevagram Ashram).

आश्रमातील अभिप्राय पुस्तिकेमध्ये लिहिलेल्या अभिप्रायात महात्मा गांधी यांच्या स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा या शब्दांना आत्मनिर्भर भारत या शब्दाची देखील जोड दिली आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात नेहमीच स्वावलंबनाचे धडे दिले आहेत. अलीकडच्या काळात गांधीवाद्यांनी देखील स्वावलंबन या गांधी विचाराला कृतीची जोड दिली आहे. पण नेमकी कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या योजनेची घोषणा केली. त्याला प्रतिसादही मिळाला, तर कुठे टीकाही झाली. पण राज्यपालांनी सेवाग्राम आश्रमात अभिप्रायातून आत्मनिर्भर भारत या शब्दाचा केलेला उल्लेख सध्या गांधीवाद्यांसाठी औत्सुक्याचा विषय ठरतो आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार आजही प्रेरणादायक आहे. मात्र, त्यांचे विचार जपणारे कमी आहेत, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रम प्रतिष्ठानकडे व्यक्त केली असल्याची माहिती आश्रमाचे अध्यक्ष प्रभू यांनी दिली. कोश्यारी यांच्या सेवाग्राम येथील यांच्या खाजगी दौऱ्यामुळे जनतेसाठी बंद असलेले सेवाग्राम आश्रमाचे दार उघडल्या गेले. आश्रमात राज्यपालांसोबत पालकमंत्री, खासदार,आमदार यांचीही उपस्थिती होती. यावर आश्रमाचे अध्यक्ष प्रभू यांनी लोकप्रतिनिधी आजही स्वागत आहे आणि उद्या ही असेल, असे सांगितले.

आश्रमात भेटीदरम्यान कोश्यारी यांनी आश्रमातील जेवणाला पसंदी दिली. गांधीवाद्यांसाठी बनणाऱ्या सात्विक भोजनाचा यावेळी राज्यपालांनी आस्वाद घेतला. राज्यपालांच्या वर्धा दौऱ्यात त्यांनी गीताई मंदिर, मगन संग्रहालय अशा ऐतिहासिक वस्तूंना भेट दिली.

Governor Bhagat Singh Koshyari Visit Sevagram Ashram

संबंधित बातम्या :

‘ये दिल मांगे मोर’, कारगिल विजय दिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

Uddhav Thackeray : मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *