AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : कुठे उत्साह तर कुठे कार्यकर्ते भिडले, अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Gram Panchayat Elections 2021: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे.

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : कुठे उत्साह तर कुठे कार्यकर्ते भिडले, अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:19 PM
Share

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. तर, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज काही ठिकाणी मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे मतदानाची पक्रिया खोळंबली होती. एका ठिकाणी मतदानादरम्यान दोन गटांमधील कार्यकर्ते भिडले तर डोंबिवलीत उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले, या घटनांनी ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलं आहे. (Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : excitement for Voting, EVM machines shut down)

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं आधीच जाहीर केलं आहे. कोरोना साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020 मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020 ला स्थगित करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे.

डोंबिवलीत उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले

एका उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे, डोंबिवलीतील खोणी ग्रामपंचायतमध्ये ही घटना घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे वाटणाऱ्या व्यक्तीचे नाव आकाश ठोंबरे असे असून त्याची काकी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.

कुसेगावात मतदान प्रकियेला गालबोट, दोन गटातील कार्यकर्ते भिडले

दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट लागलं आहे. कुसेगावमधील दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले आहेत. आधी या दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यातून दोन्हीकडचे कार्यकर्ते भिडले. दरम्यान जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

लेंगरेवाडी गावात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद, गावात तणाव

सांगलीमधील लेंगरेवाडी गावात निवडणूक सुरु असताना भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला आहे. भाजप कार्यकर्ते संतोष लेगनरे या तरुणाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे लेंगरेवाडी या गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे मतदानाला उशिरा सुरुवात

हिंगोलीमधील वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती. ईव्हीएम मशीनवर चिन्ह बदलून आल्याचा आरोप ग्रामविकास पॅनल प्रमुख बबन होळपादे यांनी केला होता. त्यामुळे येथील मतदानाच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. दरम्यान, येथे ग्रामपंचायतीच्या एकूण 9 जागा होत्या, त्यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या, तर 4 जागांसाठी मतदान सुरु आहे. वार्ड क्रमांक 01 मध्ये 10 वाजेपर्यंत मतदान सुरु झाले नव्हते.

हिंगोलीतील ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप, मतदान प्रक्रिया उशिराने

ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप घेतल्यामुळे हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील बनबरडा येथील वार्ड क्रमांक 01 मधील मतदान प्रक्रिया दोन तास ठप्प होती.

नांदगावात ईव्हीएम मशीन बंद

नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील प्रभाग क्र. 3 चे ईव्हीएम मशीन बंद पड्यामुळे सकाळी दोन तास मतदानाची प्रक्रिया ठप्प होती. तसेच याच तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीतदेखील असाच प्रकार घडला, येथेही ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते.

मनमाडमध्ये ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब

मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब असल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरु केले.

कोल्हापुरात सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद पडल्याने मतदानाची प्रक्रिया बराच वेळ थांबली होती. प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात आला होता.

धुळ्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर सकाळी एक तासापासून मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. वोटिंग मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

प्रभाग – 46,923

जागा – 1,24,819

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन अण्णांनी केले आहे. “सुदृढ आणि निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी मतदान करणे गरजेचे आहे, म्हणून मी आज माझा मतदानाचा हक्क बजावला आहे”, असे उद्गार अण्णांनी काढले. यादवबाबांचे दर्शन घेऊन अण्णांनी राळेगणसिद्धी जिल्हा परिषदेच्या प्रधामिक शाळेतील केंद्रावर जाऊन मतदान केले.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाकरिता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 12 वाजता त्यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्या स्वतः रांगेत उभ्या राहिल्या होत्या. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी मतदारांना केले. यशोमती ठाकूर यांच्या गावात त्यांच्या काँग्रेस पक्षाची गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे.

रक्षा खडसें यांनी प्रथमच एकनाथ खडसेंविना मतदानाचा हक्क बजावला

खासदार रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच सासरे एकनाथ खडसेंविना मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्या म्हणाल्या की, परिवार म्हणून आम्ही सोबतच आहोत. नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते. पक्षांबाबत आमचे विचार थोडे वेगळे असू शकतात, तरी आम्ही एकाच घरात राहतो. एकनाथ खडसे आज मुंबईमध्ये असल्यामुळे आज मी गावकऱ्यांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

उस्मानाबाद जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सपत्नीक मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. “लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी गाव पातळीवर निवडणूक महत्त्वाची असते, त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे”, असेआवाहन खासदार ओमराजे यांनी नागरिकांना केलं आहे.

आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला

आमदार रोहित पवार यांचं पिंपळी लिमटेक येथे मतदान आहे. त्यामुळे त्यांनी पिंपळी ग्रामपंचायतीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती पवार यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला

वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातील काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला, मूळगावी मागूळ झनक इथे ग्रामपंचायत निवडणुकीत रांगेत उभे राहून त्यांनी मतदान केले.

हेही वाचा

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: स्वातंत्र्यापासून एकही मतदान चुकवलं नाही, 115 वर्षीय देवईबाई मुंढेंच्या बोटावर अभिमानाची शाई

(Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : excitement for Voting, EVM machines shut down)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.