AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियतीचा क्रूर खेळ, एकाला मदत करायला गेले अन् पाचही जण… कुटुंबावर शोककळा

या अपघातात ठार झालेल्या सर्व पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नियतीचा क्रूर खेळ, एकाला मदत करायला गेले अन् पाचही जण... कुटुंबावर शोककळा
jalna accident
| Updated on: Aug 29, 2025 | 3:26 PM
Share

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरु आहे. त्यातच आता मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जाफराबाद-राजूर रस्त्यावर असलेल्या गाडेगव्हाण फाट्याजवळ एक कार विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जालना जिल्ह्याला हादरा बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालनाच्या जाफराबाद-राजूर रस्त्यावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ एक कार विहिरीत कोसळली.  भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून हे सर्व जण छत्रपती संभाजीनगर येथील सुलतानपूरकडे निघाले होते. यावेळी एका रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना पहाटे ५ ते ६ च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यालगत मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर ती कार थेट विहिरीचा कठडा तोडून सुमारे 70 फूट खोल विहिरीत कोसळली.

या विहिरीमध्ये सुमारे 60 फूट पाणी होते. त्यामुळे कारमधील पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस, भोकरदन अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण एकमेकांचे नातेवाईक होते.

अपघातातील मृतांची नावे

  • ज्ञानेश्वर डकले
  • पद्माबाई भांबीरे
  • निर्मलाबाई डकले
  • आदिनाथ भांबीरे
  • ज्ञानेश्वर भांबीरे

परिसरात शोककळा

दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये दर्शनासाठी गेलेल्या महिलांचा अपघात

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. ऋषिपंचमीच्या निमित्ताने मालेगावमधून दर्शन आणि स्नानासाठी आलेल्या दहा ते बारा महिला या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्या महिला एका पिकअप वाहनातून प्रवास करत होत्या. मात्र, रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप गाडी रस्त्याच्या खाली घसरली आणि पलटी झाली, ज्यामुळे महिलांना दुखापत झाली.

हा अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि इतर भाविकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी महिलांना तातडीने सर्वतीर्थ टाकेद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.