Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

भीमराव गवळी, Tv9 मराठी

भीमराव गवळी, Tv9 मराठी | Edited By: महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 11:16 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News LIVE Update
Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आज दिनांक 4 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसची राज्यात जोरदार तयारी. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाईक रॅली आणि जनजागृती मोहिमेवर भर. आजपासून राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीत दोन दिवसीय शिबीर सुरू होणार. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून अजूनही डिस्चार्ज नाही. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सपत्नीक विठ्ठलाची पूजा. कार्तिक एकादशीनिमित्त चंद्रभागा तीर भक्तिमय. हजारो भाविक पंढरपुरात दाखल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 04 Nov 2022 07:49 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या भेटीला

  Marathi News LIVE Update

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या भेटीला

  मुख्यमंत्री शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

  पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु

  शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहचले

 • 04 Nov 2022 07:00 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांनी बेईमानी केली

  Marathi News LIVE Update

  एकनाथ शिंदे यांनी बेईमानी केली

  अजित पवार यांचा शिंदेंवर हल्लाबोल

  घर उद्धवस्त करणे म्हणजे बेईमानी

  महाराष्ट्र ही बेईमानी कधीही विसरणार नाही

  पवारांची शिंदे यांच्यावर घणाघाती टीका

 • 04 Nov 2022 06:08 PM (IST)

  आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी सुरु

  Marathi News LIVE Update

  चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात बैठक सुरु

  औरंगाबादमधील सिल्व्हर इन हॉटेलमध्ये बैठक

  आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड सभेसंदर्भात चर्चा

  आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी सुरु

 • 04 Nov 2022 05:05 PM (IST)

  डोंबिवलीत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत 40 लाखाचे दागिने उकळले

  मित्रांनी आधी दिले गुंगीचे औषध नंतर त्याचा तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ बनवला

  व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावाखाली दोन वर्ष करत होते ब्लॅकमेल

  डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी कोल्हापूरहून एका आरोपीला केली अटक

  संजय राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे

 • 04 Nov 2022 05:03 PM (IST)

  निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करा

  Marathi News LIVE Update

  निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करा

  अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना आदेश

  कुठल्याही आमिषाला बळी पडू नका

  पवारांचा नेत्यांना सावधगिरीचा इशारा

 • 04 Nov 2022 04:21 PM (IST)

  दिल्ली महापालिका निवडणूक जाहीर

  Marathi News LIVE Update

  दिल्ली महापालिका निवडणूक जाहीर

  दिल्लीत 250 जागांसाठी होणार मतदान

  4 डिसेंबरला मतदान, 7 डिसेंबरला निकाल

  राजधानातील महापालिका कोणाच्या ताब्यात ?

 • 04 Nov 2022 03:16 PM (IST)

  आजपासून ट्विटर कर्मचाऱ्यांची कपात करणार

  Marathi News LIVE Update

  आजपासून ट्विटर कर्मचाऱ्यांची कपात करणार

  ट्विटरमधील जवळपास 7500 कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात येणार

  ऑफिसला न येण्यासंदर्भात कंपनीचा कर्मचाऱ्यांना मेल

  एलॉन मस्क आल्यापासून कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

 • 04 Nov 2022 03:15 PM (IST)

  आपकडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित

  गुजरात विधानसभा निवडणूक

  आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर

  इसुदान गढवी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

  फोन आणि मेलद्वारे नागरिकांची मतं मागवली होती

  गुजरातमध्ये आपचे सरकार येणार, गढवी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतील - केजरीवाल

  16 लाख नागरिकांनी रिस्पॉन्स दिला - केजरीवाल

 • 04 Nov 2022 02:38 PM (IST)

  आपकडून गुजरात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर

  Marathi News LIVE Update

  आपकडून गुजरात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर

  ईसुदान गढवी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

  अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

  निवडणूक कार्यक्रम घोषीत झाल्यानंतर आपकडून उमेदवार

 • 04 Nov 2022 01:14 PM (IST)

  आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला परवानगी नाही

  आदित्य ठाकरे यांच्या सभेत सिल्लोड नगरपरिषदेची आडकाठी

  सिल्लोड शहरातील महावीर चौकातील सभेला नगरपरिषदेने परवानगी नाकारल्याची माहिती

  दोन्ही सभा आमनेसामने होणार असल्यामुळे सिल्लोड नगर परिषदेची नकारघंटा

  श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राउंडवर तर आदित्य ठाकरे यांची सभा महावीर चौकात

  सिल्लोड नगर परिषद ही अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात

  आदित्य ठाकरे यांच्या सभेचे ठिकाण बदलण्याची सिल्लोड नगर परिषदची सूचना

 • 04 Nov 2022 12:20 PM (IST)

  अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात - खैरे

  अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात - खैरे

  फडणवीस अशा आमदारांना कसं सहन करणार?- खैरे

  संतोष बांगरांचे अवैध धंदे उघड करणार - खैरे

  राणा आणि बच्चू कडू वाद नाटकी - खैरे

  शिंदे गटातील आमदार अस्वस्थ - खैरे

  आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही - खैरे

  40 गद्दार पुन्हा निवडून येणार नाही - खैरे

 • 04 Nov 2022 12:16 PM (IST)

  पुण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात महिला काँग्रेसचं आंदोलन

  संभाजी भिडेंच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक

  संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसचं आंदोलन

  संभाजी भिडे यांनी महीला पत्रकाराला टिकली लावण्यावरून केलं होत वादग्रस्त विधान

  भिडे यांच्या त्याच विधानावरून पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे

 • 04 Nov 2022 11:11 AM (IST)

  नाशिक - भाजप नेत्याच्या घरावर कुख्यात गुन्हेगारांनी केला हल्ला ..

  भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर केला हल्ला

  हातात चाकु, सुरे आणि पिस्तूल घेऊन घरावर हल्ला

  7-8 जणांच्या टोळक्याने सातपूर परिसरातील नागरे यांच्या घरावर दगडफेक करत केला घुसण्याचा प्रयत्न

 • 04 Nov 2022 11:08 AM (IST)

  शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत पुणे महापालिका आता सतर्क

  जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे रस्त्यात खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्या

  महापालिका आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आदेश

  नवीन जलवाहिन्या रस्त्यावरून टाकण्यासाठी पादचारी मार्ग किंवा इतर पर्यायी रस्ता शोधण्याचे कर्मचाऱ्यांना आयुक्तांचे आदेश

  नव्याने सुमारे 500 कोटी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्त केले जाणार

  रस्ते दुरुस्त झाल्यास पुन्हा न खोदण्याचे आयुक्तांचे आदेश

  त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी खड्डे न करण्याचे आदेश

 • 04 Nov 2022 10:26 AM (IST)

  महाराष्ट्र कर्नाटक राज्यांची आज कोल्हापुरात समन्वय बैठक

  दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत होतेय

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार दोन राज्यांमध्ये पहिल्यांदाच होते अशी बैठक

  बैठकीत सीमा प्रश्नसह अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या मुद्द्यावर होणार चर्चा

  बैठकीसाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत कोल्हापुरात दाखल

  बैठकी आधी घेणार सपत्नीक करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

  राज्यपाल भगतसिंह कोशारी देखील अंबाबाई दर्शनाला येण्याची शक्यता

 • 04 Nov 2022 10:25 AM (IST)

  आळशी माणूस मातोश्रीत, नवनीत राणांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

  खासदार नवनीत राणा म्हणाल्या, सुषमा अंधारे यांना आलसी माणूस पाहायचा असेल तर मातोश्रीवर जाऊन बघा

  सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती

  नवनीत राणा यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलंय

  बच्चू कडू आणि रवी राणा वादावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

  आम्ही कालच म्हणालो होतो की, दोघांचा वाद संपला असून आता दोघांनी अमरावतीच्या विकास कामावर लक्ष केंद्रित करावं,

  महाराष्ट्राच्या विकासासाठी, अमरावतीच्या विकासासाठी मी दिल्ली दौऱ्यावर जात आहे.

 • 04 Nov 2022 10:22 AM (IST)

  दिल्ली महापालिका निवडणुकीची आज घोषणार होणार

  संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

  नवी दिल्ली महापालिका निवडणूकीची आयोग घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती

  गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर दिल्ली महापालिका निवडणुकीची आजच घोषणा होण्याची शक्यता

 • 04 Nov 2022 10:20 AM (IST)

  राष्ट्रवादी फुटणार नाही; राजेश टोपे यांनी दावे फेटाळले

  जयंत पाटील जे बोलतात ते तर्क शुद्ध बोलतात

  अभ्यास करून बोलतात, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते

  राष्ट्रवादीबाबत फक्त अफवा पसरवली जाते आहे

  राष्ट्रवादीत कोणीही फुटणार नाही राष्ट्रवादी एकदम घट्ट आहे

  राजेश टोपे यांचं मंत्री उदय सामंत यांना प्रत्युत्तर

 • 04 Nov 2022 10:18 AM (IST)

  पश्चिम रेल्वेवर लोकलचा खोळंबा, 15 ते 20 मिनिटे लोकल उशिराने

  मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या आज 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत.

  गोरेगाव येथे अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 6.20 वाजता पॉइंट बिघाड झाला होता,

  जो सकाळी 7.23 वाजता दुरुस्त करण्यात आला आहे.

  सध्या उपनगरीय गाड्यांवर त्याचा परिणाम दिसून येत असून त्या सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Published On - Nov 04,2022 10:15 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI