Maharashtra Live Updates : माजी खासदार दत्ता मेघे यांची तब्येत बिघडली

| Updated on: Feb 06, 2023 | 6:02 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : माजी खासदार दत्ता मेघे यांची तब्येत बिघडली
Maharashtra Latest BreakingImage Credit source: tv9 marathi

मुंबई: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं आहे. तर मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पाटणमधून लढण्याचं आव्हान दिलं आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Feb 2023 10:38 PM (IST)

    कसबा विधानसभा पोटनिवडणूक

    पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची डिनर डिप्लोमसी

    कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये होणार चर्चा

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, विश्वजीत कदम  हे अरविंद शिंदे यांच्या घरी दाखल

  • 05 Feb 2023 08:58 PM (IST)

    ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची राजकारणात युती

    कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात मोठी बातमी

    ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची राजकारणात युती

    मात्र संभाजी ब्रिगेड उद्या कसब्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

    मंगळवारी मुंबईत संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची मुंबईत बैठक

    कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा होणार

    ठाकरेंनी सांगितल्यास युतीचा धर्म पाळणार

  • 05 Feb 2023 07:18 PM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे नवी दिल्लीत दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर दिल्लीत

    भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यास लावणार उपस्थिती

  • 05 Feb 2023 07:08 PM (IST)

    माजी खासदार दत्ता मेघे यांची तब्येत बिघडली

    अशक्तपणाने मेघे यांची प्रकृती अचानक बिघडली

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात प्रकृती बिघडली

    थोड्या विश्रांतीनंतर दत्ता मेघे पुन्हा व्यासपीठावर उपस्थित परतले

    दत्ता मेघे हे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष

  • 05 Feb 2023 06:23 PM (IST)

    सर्वसामान्यांवर पडू शकतो महागाईचा बॉम्ब

    रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता

    सोमवारपासून दोन दिवसीय बैठक

    पतधोरण समिती घेणार रेपो दराबाबतचा निर्णय

    रेपो दरात वाढ झाल्यास ईएमआय वाढणार

    बँका व्याज दरात वाढ करण्याची शक्यता

  • 05 Feb 2023 05:22 PM (IST)

    अमरावतीच्या देवरनकरनगरमध्ये आजपासून महोत्सव

    श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवाला प्रारंभ

    महाराष्ट्रमधील 12 संतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आजपासून

    14 फेब्रुवारीपर्यंत प्रगटदिन महोत्सव चालणार

    गजानन महाराजांच्या पुरातन मंदिराचा साकारला भव्य देखावा

  • 05 Feb 2023 04:22 PM (IST)

    अब की बार किसान सरकार

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची घोषणा

    अन्नदात्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येते?

    शेतकरी-कामगार यांना एकजूट होण्याचे आवाहन

    के. चंद्रशेखर राव यांच्या सभेसाठी मोठी गर्दी

  • 05 Feb 2023 04:19 PM (IST)

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा

    मेक इन इंडिया हा जोक इन इंडिया बनला

    के. चंद्रशेखर राव यांची टीका

    के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये सभा

    देशात आज परिवर्तनाची गरज

    महाराष्ट्रात शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात

    ७५ वर्षांनंतरही देशात वीज आणि पाण्याचा प्रश्न

  • 05 Feb 2023 03:15 PM (IST)

    40 वर्षांपुर्वी अदानींप्रमाणे फसले होते धीरुभाई अंबानी?

    18 मार्चच्या संध्याकाळी दिवसअखेर हा शेअर 125 रुपयांवर बंद झाला. धीरूभाईंना असे इनपुट मिळाले होते की कोलकाता येथील ब्रोकर एका आठवड्यासाठी स्टॉक विकत आहे. सविस्तर वाचा

  • 05 Feb 2023 03:04 PM (IST)

    भारताच्या बाबतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे म्हणतय, ते करुन दाखवण्याची धमक त्यांच्यात खरंच आहे का?

    PCB मध्ये किती धमक आहे, ते लवकरच दिसेल. वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 03:03 PM (IST)

    IND vs AUS Test : 'तू अश्विनवर जळतोस', टीम इंडियाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला सुनावलं

    IND vs AUS Test : तुझ्या महानतेबद्दल आमच्या मनात प्रश्न नाही, पण.... वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 03:02 PM (IST)

    IND vs AUS : Rahul Dravid यांच्या मनातही तीच भिती, म्हणून रोहितसाठी बोलावलं खास 10 प्लेयर्सना

    IND vs AUS : कोण आहेत ते 10 प्लेयर्स? नागपूरमध्ये राहुल द्रविड यांनी त्यांना का बोलवलय? वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 02:11 PM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप सक्रिय

    अश्विनी जगताप यांच्याकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू

    दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात अश्विनी जगताप यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

    अश्विनी जगताप यांनी मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली

  • 05 Feb 2023 01:05 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख मातोश्रीवर

    अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल

    तुरुंगातून आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना भेटणार

    अनिल देशमुख-उद्धव ठाकरे भेटीकडे सर्वांचं लक्ष

  • 05 Feb 2023 12:25 PM (IST)

    पुण्यातील काँग्रेस भवनात आज दुपारी 3 वाजता काँग्रेसची बैठक

    कसब्यासंदर्भात होणार चर्चा

    नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

    बैठकीत ठरणार निवडणूकीची रणनिती

    नाना पटोले स्वतः कसब्यातील पोटनिवडणुकीत लक्ष घालणार

    कसबा पोटनिवडणुकीची काँग्रेसकडून तयारीला वेग

  • 05 Feb 2023 12:23 PM (IST)

    अमेरिकेने फायटर जेटमधून मिसाइल डागून चीनला दिला मोठा झटका

    राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशाने अमेरिकेची चीन विरोधात मोठी कारवाई. वाचा सविस्तर.....

  • 05 Feb 2023 12:22 PM (IST)

    IND vs AUS : नागपूरला रवाना होण्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर

    IND vs AUS : त्याच्याशिवाय पहिली कसोटी खेळणं ऑस्ट्रेलियन टीमसाठी सोपं नसेल. वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 12:21 PM (IST)

    IND vs AUS Test : आपल्याच माणसांना रोहित-विराटवर नाही राहिला विश्वास, त्यामागे कारणही तसंच

    IND vs AUS Test : असं झाल्यास उलट टीम इंडियाचाच होईल गेम. वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 11:39 AM (IST)

    पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

    पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

    दुबईतील रुग्णालयात घेतला अखेराचा श्वास

    महिन्याभरापासून होते रुग्णालयात

  • 05 Feb 2023 10:40 AM (IST)

    कसबा पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची उद्या सकाळी 10 वाजता बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

    आज संध्याकाळी कसब्या संदर्भात प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता

    चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंकडून आवाहन करण्यात आलंय

    कसब्या संदर्भात राज ठाकरे काय निर्णय घेणार ?

    उद्या सकाळी 10 वाजता मनसेची अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता

  • 05 Feb 2023 10:39 AM (IST)

    कसब्यात उद्या भाजपचं शक्तीप्रदर्शन

    कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने भरणार उमेदवारी अर्ज

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित

    पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती निघणार पायी पदयात्रा

    त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जाणार

    भाजपकडून कसब्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात

  • 05 Feb 2023 10:07 AM (IST)

    Vinod Kambli : विनोद कांबळी पुन्हा अडचणीत, पत्नीने केला गंभीर आरोप

    Vinod Kambli : विनोद कांबळी आता कुठल्या प्रकरणात अडकला? वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 10:06 AM (IST)

    लास्ट ओव्हरमध्ये फुल ड्रामा, 6 बॉलमध्ये 3 रन्सची गरज, समोर होता Mumbai indians चा बॉलर सॅम करन

    या रोमांचक सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत सगळ्याच्ंया ह्दयाची धडधड वाढलेली, अखेर निकाल काय लागला? वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 09:36 AM (IST)

    साडेसाती अदानी समूहाची पाठ सोडेना

    आठवड्यातच 9 लाख कोटींचा फटका

    अदानी पॉवर (22.5%), अदानी टोटल गॅस (51%) घसरण

    अदानी विल्मर(23%), अदानी ग्रीन(40%)मध्ये फटका

    अदानी ट्रांसमिशन (37%), अदानी पोर्ट्स(35%) शेअर उतरले

    अदानी इंटरप्राईजेस(38%), अंबुजा सिमेंट्स(33%) मध्ये घसरण

    एसीसी आणि (21%) एनडीटीव्ही (17%) शेअरमध्ये पडझड

  • 05 Feb 2023 08:43 AM (IST)

    पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव काय

    कच्चा तेलाच्या भावात घसरण कायम

    मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

    अहमदनगर पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर

    अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

    अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर

    औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.94 रुपये प्रति लिटर

    नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर

    नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर

    जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर

    नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

    लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर

    कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.55 आणि डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर

    पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर

    सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

  • 05 Feb 2023 08:19 AM (IST)

    Shaheen Afridi लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी खवळला, नाराजीच कारण काय?

    3 फेब्रुवारीला शाहीन आफ्रिदीचा शाहिद आफ्रिदीच्या मुलीबरोबर निकाह झाला होता. आता शाहीन शाह आफ्रिदी नाराज होण्यामागच कारण काय? वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 08:18 AM (IST)

    Jos buttler : 'हो, एका भारतीय स्टारसमोर माझी बोलती बंद होते', जोस बटलरची कबुली

    जगातल्या कुठल्याही बॉलरची मला इतकी भिती वाटत नाही, पण एका भारतीय गोलंदाजासमोर काही चालत नाही. वाचा सविस्तर....

  • 05 Feb 2023 08:03 AM (IST)

    पुणे जिल्ह्याीतल चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनरचा अपघात

    कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने चाकण-शिक्रापूर मार्गावर वाहनाच्या रांगा

    चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प

    बहुळ येथील उतारावर पहाटे कंटेनर आडवा झाल्याची घटना

    चाकण पोलीस घटनास्थळी दाखल

  • 05 Feb 2023 07:16 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त (9 फेब्रुवारी) ऑटो रिक्षा सजावट स्पर्धा

    नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर स्पर्धेचे आयोजन

    रिक्षाची आकर्षक सजावट, चालकाचा उत्तम पेहराव याची परीक्षकाकडून पाहणी करण्यात येणार

    स्पर्धेत विनामूल्य घेता येणार प्रवेश

    प्रथम क्रमांक विजेत्याला 21 हजार, द्वितीय क्रमांकाला 11 हजार, तृतीय क्रमांकाला 7 हजार रुपयांचे बक्षीस

    स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना मिळणार मोफत 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण

    जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी सहभागी होण्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आवाहन

  • 05 Feb 2023 07:12 AM (IST)

    मराठमोळी नऊवारी नेसून सीईओ आशिमा मित्तल यांचे नृत्य

    नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले नृत्य

    आशिमा मित्तल यांनी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर आकर्षक फेटा बांधून मराठी साज केला परिधान

    जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • 05 Feb 2023 06:42 AM (IST)

    कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आज मनसे निर्णय घेणार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जाहीर करणार भूमिका

    मनसे कसबा पोटनिवडणूक लढवणार की नाही? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

    कसब्यात मनसे उतरल्यास निवडणूक तिरंगी होणार

  • 05 Feb 2023 06:29 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध

    राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप हे पोटनिवडणूक लढवणाऱ्यावर ठाम

    जगताप हे दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या भावकितील आहेत, एके काळचे कट्टर समर्थक म्हणून त्याची ओळख

    चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादीची बैठका घेण्यास सुरुवात

    राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना विरोध आहे, त्यासाठीच आता सर्व कार्यकर्ते एकत्र आले

    राजेंद्र जगताप हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे जगताप विरुद्ध जगताप अशी लढत पाहण्यास मिळू शकते

  • 05 Feb 2023 06:24 AM (IST)

    हिंदू महासंघाचे आनंद दवे लढवणार कसबा विधानसभा पोटनिवडणूक

    सोमवारी आनंद दवे दाखल करणार उमेदवारी अर्ज

    कसबा विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार, आनंद दवे यांची माहिती

  • 05 Feb 2023 06:15 AM (IST)

    सोलापुरातील जिल्ह्यातील बार्शी शहरात ज्वेलर्स दुकानात घुसून मारहाण

    दुकान मालकाला मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    शिवाजी भोसले असे मारहाण झालेल्या पीडित ज्वेलर्स मालकाचे नाव

    उसने दिलेले पैसे परत न दिल्याने बळीराम बारंगुळे आणि रणजित बारंगुळे यांनी दुकानात घुसून मारहाण केल्याची तक्रार

    पीडित भोसले यांनी बार्शी शहर पोलिसात तक्रार नोंद केलीय

    दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित शिवाजी भोसले यांनी केलीय

Published On - Feb 05,2023 6:10 AM

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.