AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahapalika Election Results 2026 : मनसेपेक्षा एमआयएम भारी, महाराष्ट्रात भाजपची डबल सेंच्युरी, ठाकरे गटाला किती ?

महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये भाजपने डबल सेंच्युरी मारत मोठी आघाडी घेतली आहे. मनसेपेक्षा एमआयएमला अधिक जागा मिळाल्या, तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला (अजितदादा गट) अपेक्षित यश मिळाले नाही. एकनाथ शिंदे गटही लक्षणीय जागांवर आघाडीवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा करिष्मा भाजपच्या यशाचे प्रमुख कारण ठरला, ज्यामुळे राज्यात भाजपचा प्रभाव पुन्हा सिद्ध झाला.

Mahapalika Election Results 2026 : मनसेपेक्षा एमआयएम भारी, महाराष्ट्रात भाजपची डबल सेंच्युरी, ठाकरे गटाला किती ?
महापालिक निवडणुकांची मतमोजणी सुरू
| Updated on: Jan 16, 2026 | 10:46 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांची मतमोजणी सुरू झाली आहे. या महापालिकांचे कल हाती आली आहेत. या पहिल्या कलांमध्ये भाजपने डबल सेंच्युरी केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपच किंग असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे मनसेला मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही. मनसेपेक्षा एमएमआयला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर ठाकरे गटालाही फारसं यश येताना दिसत नाहीये. तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत.

पहिल्या कलानुसार राज्यातील 380 प्रभागातील 2869 जागांपैकी 224 जागा घेऊन भाजप आघाडीवर आहे. तर शिंदेंची शिवसेना 56 जागा घेऊन तर काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गटाला 29 आणि अजितदादा गटाला 26 जागांची आघाडी मिळाली आहे. मनसेला चार तर एमआयएमला 5 जागांची आघाडी दिसत आहे. शरद पवार गटाला दोन आणि इतरांना पाच जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. या निवडणूक कलांवरून मतदारांचा आजही भाजपवरच विश्वास असल्याचं दिसत आहे.

युती, आघाडी नसतानाही…

विशेष म्हणजे राज्यात चित्रविचित्र समीकरणे झाली होती. भाजपची शिंदे गटासोबत काही ठिकाणी युती झाली होती. बऱ्याच ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर लढत होते. अजितदादांची राष्ट्रवादीही स्वबळावर लढत होती. तर काही ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे एकत्र आले होते. युती असली नसली तरी भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारून निर्णयाक आघाडी घेण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

फडणवीस यांचा करिश्मा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक प्रचार केला होता. फडणवीस यांनी सर्वच महापालिकांमध्ये सभा, रॅली केली होती. तसेच असंख्य मुलाखती घेतल्या होत्या. मेळाव्यांना संबोधित केले होते. तसेच पक्षातील नेत्यांना आपआपल्या भागात कामाला लावले होते. त्याचाच फायदा भाजपला झाला आहे. फडणवीस यांची चाणक्य निती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत याच्या बळावर भाजपला यश मिळताना दिसत आहे. तर विरोधकांना मात्र यश मिळताना दिसत नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...