AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: तर मग संध्याकाळपर्यंत… जरांगेंशी चर्चा केल्यानंतर विखे पाटील यांची प्रतिक्रिया

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर विखे पाटील यांनी नेमकं कशावर चर्चा झाली हे सांगितले आहे.

Manoj Jarange: तर मग संध्याकाळपर्यंत... जरांगेंशी चर्चा केल्यानंतर विखे पाटील यांची प्रतिक्रिया
Vikhe PatilImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 30, 2026 | 11:56 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. रखरखत्या उन्हात शेतात बाज टाकून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी नेमकी कशाबाबत चर्चा झाली हे सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले?

भेटीनंतर विखे पाटील यांनी नेमकं कशावर चर्चा झाली हे सांगताने ते म्हणाले, “जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काल माझी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यावर आधारीत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दांबद्दल शासन स्थरावर आम्ही काय चर्चा करतोय त्याची कल्पना त्यांना दिली आहे. आणि शासनाची भूमिका स्पष्ट आहे. केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखीत स्वरुपाच्या मसूद्यामध्ये कारवाई 100 टक्के होईल याबद्दल साशंक असल्याचे काही कारण नाही. कारवाई बऱ्यापैकी पुढे चालली आहे. काही तृटी होत्या मी काही नाकारत नाही.”

पुढे ते म्हणाले, “काल त्यांच्यासमोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलतानाच स्पष्ट झाले की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणे थांबली. त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. आशाही काही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये कारवाईबद्दल सुचना दिलेल्या आहेत. मी, जरांगे पाटील यांना आपल्या सर्वांच्या वतीने, शासनाच्या वतीने विनंती करतो जी पण तुमच्या अभ्यासकांशी तुम्हाला चर्चा करायची याच्यावर अंतिम मान्यता घ्यायची आहे तर मग संध्याकाळपर्यंत कळवतील. सुधारणा असेल तर ती करता येईल. पण शासनाला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाहीये किंवा केलेले नाहीये. समाजबंधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायेत त्याबद्दल निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे.”

विनंती करत म्हणाले…

“माझी विनंती ही आहे की आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटलांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकांशी सकाळी चर्चा होईल तोपर्यंत तरी उपोषण स्थगित करावे. की नाही करावे. परंतु आता उन्हा बसण्यापेक्षा सावलीत बसले आणि तिथेच जर आपण सगळ्या चर्चा केल्या, त्यात त्यांचे समाधान झाले. त्यांच्या सुचनांवर आम्ही कारवाई केली किंवा करु शकलो नाही तर मग आंदोलनाचा मार्ग तर मोकळा आहेच. तोपर्यंत तरी त्यांनी आमची विनंती मान्य करावी. तब्बेतही चांगली नाहीये. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आता याबाबतीमध्ये सहानभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा विचार करावा” असे ते म्हणाले.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा