Municipal Election Results 2026 : घड्याळाचे काटे उलटे फिरले, तुतारीचा आवाज बंद, राज्यात राष्ट्रवादीला मोठा दणका
महापालिका निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे, तर शिवसेना शिंदे गटाला देखील मोठं यश मिळालं आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्राच्या महापलिका निवडणुकींमध्ये भाजपनं पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्यावेळीपेक्षा जास्त यश यावेळी भाजपला मिळालं आहे, 29 महापालिकांपैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता यावेळी येण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर शिवसेना शिंदे गट आहे. काँग्रेसलाही बऱ्यापैकी यश मिळताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात भाजपचे उमेदवार तब्बल 1280 जागांवर आघाडीवर आहेत, यातील काही ठिकाणी उमेदवारांचा विजय देखील झाला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट 365 जागांवर आघाडीव आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला या महापालिका निवडणुकीमध्ये म्हणावं तेवढं यश मिळालेलं नाहीये. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार 122 जागांवर आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था याहून वाईट आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार केवळ 29 ठिकाणी आघाडीवर आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने आघाडीने केली होती. राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध भाजप असा सामना पुण्यात होता, मात्र पुण्यात राष्ट्रवादीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अवघ्या 12 जागांवर आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हे दोन जागांवर आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे मात्र भाजपाला आता पुणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह आहेत. भाजपचे उमेदवार तब्बल 110 जागांवर आघाडीवर आहेत.
Municipal Election 2026
Maharashtra Election Results 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया..
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : रवींद्र चव्हाण यांनी विजयाचे श्रेय थेट दिले...
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सांगली महापालिकेतील फायन आकडा घ्या जाणून
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच अवस्था पहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपनं दोन्ही राष्ट्रवादीला धोपीपछाड दिला आहे. भाजपचे उमेदवार तब्बल 83 जागांवर आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार 37 जागांवर आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर पिंपरी चिंचवडमध्ये भोपळा देखील फोडला आलेला नाहीये. तर नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अवघ्या तीन जागांवर आघाडीवर असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला अजूनही खांत उघडता आलेलं नाहीये.
