Maharashtra News LIVE : गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ..

Maharashtra News LIVE : नाशिक मध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. गोदा घाट परिसरात पाणी ओसरलं आहे. मात्र रामकुंडा गोदा घाट परिसरात पानवेली आणि कचरा वाहून आला आहे. पालिका प्रशासनाकडून पानवेली काढण्याचे काम सुरू आहे.

Maharashtra News LIVE : गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ..
Breaking
| Edited By: | Updated on: Jul 09, 2026 | 9:12 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Jul 2026 09:50 AM (IST)

    अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग..

    नांदूर मधमेश्वर धरणातून काल दुपारी अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग… गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ…नदीकाठावर चरणाऱ्या पाच ते सहा गाई पुराच्या पाण्यात वाहून गेल्या… खानगाव थडी पुलाजवळ एक गाय नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढली… उर्वरित गाई काही अंतरावर नदीकाठी स्वतःहून बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती…

  • 09 Jul 2026 09:40 AM (IST)

    पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली

    अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली. नांदगाव नदीत पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. पुन्हा एकदा अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता


  • 09 Jul 2026 09:30 AM (IST)

    नांदूर मधमेश्वर धरणातून सलग चौथ्या दिवशीही विसर्ग सुरू

    13,407 क्यूसेकने गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या च्या दिशेने पाण्याचा विसर्ग.  गेल्या तीन दिवसांत 3.94 टीएमसी पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास होणार मदत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा…

  • 09 Jul 2026 09:20 AM (IST)

    हतनूर – रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका, वयोवृद्ध रुग्णाला बैलगाडीतून नेण्याची वेळ

    छत्रपती संभाजीनगरच्या हतनूर – रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका, वयोवृद्ध रुग्णाला बैलगाडीतून नेण्याची वेळ.  छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रकार. चिखलमय रस्त्यामुळे डॉक्टर अर्ध्या वाटेतच थांबले; 3 किमी बैलगाडीतून रुग्ण डॉक्टरांपर्यंत रस्ता मंजूर तरी काम रखडले, ग्रामीण भागातील रस्त्याचे विदारक वास्तव पुन्हा समोर

  • 09 Jul 2026 09:05 AM (IST)

    आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

    आळंदीच्या पवित्र नगरीतून आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे.  “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात अवघी आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.


  • 09 Jul 2026 08:58 AM (IST)

    मधमेश्वर धरणातून सलग चौथ्या दिवशीही पाण्याचा विसर्ग

    नांदूर, मधमेश्वर धरणातून सलग चौथ्या दिवशीही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 13,407 क्यूसेकने गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत 3.94 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास होणार मदत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा.

  • 09 Jul 2026 08:48 AM (IST)

    अवैध मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची छापेमारी,1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

    भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ दाभाडी येथे एका हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अचानक छापेमारी केली.यावेळी या पथकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी मध्याचा अवैध साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी दोन जणांवर राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 लाख 23 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला.

  • 09 Jul 2026 08:42 AM (IST)

    अमरावतीत सोयाबीनचे बियाणे पेरणी करूनही उगवले नाही

    अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे पेरणी करूनही दहा दिवसापासून उगवलेच नाही. अमरावती, तिवसा,नांदगाव खंडेश्वर, मोर्शी , चांदुर रेल्वे तालुक्यात बियाणे उगवल्या नसल्याच्या तक्रारी. आतापर्यंत कृषी विभागाकडे 200 च्यावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना निस्ताने यांची माहिती. एसडीओ यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून पंचनामे सुरू केले आहेत आणि बियाणांचे नमुने तपासणी करिता पाठवले आहेत, कृषी विभागाची माहिती. तपासणी अहवाल आल्यावर पुढील कारवाई दिशा ठरवली जाईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करणार.

  • 09 Jul 2026 08:34 AM (IST)

    परळी प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची NSG कडून रेखी

    परळी प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची NSG नॅशनल सिक्युरिटी गार्डकडून सुरक्षे संदर्भात रेखी. नॅशनल गार्डचे पथक येथे आले होते, त्या पथकाने मंदिराची संपूर्ण पाहणी केली. हे वैद्यनाथ मंदिर स्थळ अतिरिकेच्या लिस्टवर आहे. त्या दृष्टीने भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने त्यांना येथे पाहणी करण्यासाठी पाठवले होते.

  • 09 Jul 2026 08:32 AM (IST)

    चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस

    सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस सुरूच आहे.सलग सहाव्या दिवशी चांदोली धरण पाणलोट अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 81 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ झाली आहे. 34 .40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात आता 19.52 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.यामुळे धरण जवळपास 57 टक्के इतके भरले असून धरणामध्ये 18 हजार 900 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे.

  • 09 Jul 2026 08:20 AM (IST)

    कोयना धरणात पाणीसाठा वाढला

    कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 59.75 टीएमसी. कोयना धरणात 89510 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात, कोयनानगर 151 मिलिमीटर, नवजा 192 मिलिमीटर आणि महाबळेश्वर मध्ये 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  • 09 Jul 2026 08:18 AM (IST)

    हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा धक्का

    हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांना भूकंपाचा धक्का जाणवलाय. यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. या भूकंपाची 4.2 रिक्टरस्केल एवढी भूमापक केंद्रात नोंद झालीये. नांदेड मध्ये जमीन कंप पावल्याचे दृश्य सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मागच्या काही वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने नागरिक भयभीत आहेत.

मागच्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. आज कुठेही पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्ग आणि एक्स्प्रेस वे बाधित झाला होता. पावसामुळे राज्यातील विविध धरणांमध्येही पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. बळीराजा सुद्धा सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळेही पावसाकडे लागले होते. आठ दिवस पडलेल्या पावसामुळे पुण्यात एक जुलै ते आठ जुलै दरम्यान 270 झाड पडण्याच्या घटना घडल्या. 20 ठिकाण पाणी शिरले आणि साचल्यांच्या घटना, तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत पडल्याची घटना घडल्या. धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने घट होत असल्याने काल रात्री खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 6296 क्युसेक विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

Follow Us