Maharashtra News LIVE : पुणे : आदिवासी भागातही बिबट्याचे वास्तव्य, नागरिकांमध्ये दहशत
Maharashtra News LIVE Updates : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभ दूत ॲपचे लॉन्चिंग करण्यात आलं. सिंहस्थात २० पेक्षा अधिक भाषांमध्ये 'कुंभदूत' ॲप काम करणार आहे. श-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 11.30 वाजत भिवंडी सत्र न्यायालयात ते हजर होणार आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हातच असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. या संदर्भात कोर्टात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे शहरातील क्रांती चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत चोरट्यांनी हात साफ केला. १२ महिलांची मंगळसूत्रे आणि तीन तरुणांच्या साखळ्या लंपास करण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा बदनामीकारक मजकूर सामनामध्ये प्रसिद्ध केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
डोंबिवलीत बेकायदा इमारतीवर होणार कारवाई, 60 कुटुंबांना बेघर होण्याची वेळ
डाेंबिवली : आयरे गावातील समर्थ का’म्प्लेक्स या बेकायदा इमारतीवर कारवाई होणार आहे. इमारतीमधील ६० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. ही कारवाई येत्या 6 मार्च रोजी होईल. केडीएमसी सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
-
साताऱ्यात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन
सातारा: तापोळा येथे शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ए आय समिटमध्ये केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते.
-
-
बीडमध्ये ट्रॅक्टरला अचानक आग, उस जळून मोठे नुकसान
बीडच्या माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव या गावातील अतुल काळे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. दुपारी ट्रॅक्टरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आणि त्याचा भडका उडाला. यामध्ये ट्रॅक्टरचे हेड दोन ट्रॉल्या आणि ऊस जळुन मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रॅक्टरमध्ये असलेला तरुण वेळीच बाहेर पडला यामुळे मोठी हानी टळली.
-
शक्तीपीठला जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल
परभणी- शक्तीपीठला जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, आदेशाला न जुमानने, आत्महत्येचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेतकरी नेत्यांनी सरकार, एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
-
श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजन
श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजन
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा केला जाणार विशेष सत्कार
कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे यांची देखील उपस्थिती
-
धांदरफळ खुर्द ग्रामसभेत बाजार समिती संचालकाकडून तरुणाला मारहाण
आमच्या घरी पाणी येत नाही हा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केल्याचा राग अनावर झाल्याने संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे प्रश्न का विचारतो? तुझ्याकडे पाहून घेईन अशी धमकी देत तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, याप्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
लाच प्रकरणात तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला न्यायालयीन कोठडी
तक्रारदाराकडून 23 हजार रुपये लाच मागितल्याचं प्रकरण
परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला न्यायालयीन कोठडी
अंबाजोगाई येथील न्यायालयात व्यंकटेश मुंडे याला आज करण्यात आलं होतं हजर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या झडतीमध्ये मुंडे याच्या घरात सापडलं 13 तोळे सोनं
व्यंकटेश मुंडे याची बीड येथील कारागृहात होणार रवानगी
-
माजलगावात लॉजमध्ये आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह
बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील तरुण कृष्णा डाके याने 15 फेब्रुवारी रोजी माजलगाव शहरातील व्यंकटेश लॉजमध्ये एक रूम बुक केली होती. यानंतर पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत रूमचा दरवाजा आतमधून लॉक होता. कालपासून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लॉज चालकाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली असता आज सकाळी रूमचा दरवाजा तोडला असता रूममध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा माजलगाव शहर पोलीस तपास करत आहेत.
-
परभणी- छत्रपती संभाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा बसविल्यामुळे 46 जणांवर गुन्हे दाखल
परभणीच्या बोरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारत असतांना पुतळा बसविण्यास विरोध करणाऱ्या पोलीसांना जमावाने मारहाण केल्याचे समोर आले आहे. यावेळी एका पोलीस जमदाराला जीवे ठार मारण्याचा उद्देशाने जखमी केल्याचा गुन्हा बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध 13 प्रकारचे गुन्हे बोरी पोलीसांनी 46 तरुणांवर दाखल केले आहेत.
-
वर्धा : ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी रक्ताने लिहिले पत्र
वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी एक हजारावर नागरिकांनी रक्ताने पत्र लिहिले आहे. खासदार अमर काळे यांनीही आंदोलन स्थळी येत रक्ताने पत्र लिहिले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी देखील करण्यात आली.
-
पुणे : आदिवासी भागातही बिबट्याचे वास्तव्य, नागरिकांमध्ये दहशत
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये ऊसतोड हंगाम सुरू असल्याने बिबट्यांचे हालचाली आता वाढल्या आहेत. जंगल परिसरात अन्नाची कमतरता भासू लागल्याने हे बिबट्या आता गावाच्या हद्दीत, शेतशिवारात आणि डोंगराळ भागात दिसू लागले आहेत. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
-
पुणे : रांजणगाव गणपती येथे दिवसाढवळ्या दागिने चोरण्याचा प्रयत्न
रांजणगाव येथील नरवडे हॉस्पिटल शेजारी असलेल्या पिसाळ सुपर मार्केटमध्ये दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोघांनी महिलेला लक्ष्य करत मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित महिलेने धाडसाने प्रतिकार करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला. या घटनेत मंगळसूत्र सुरक्षित राहिलं असून दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
-
चिखला काकड प्रकरणात मनोज जरांगेंची अटकेची मागणी
बुलडाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे तिथे काही मस्तवाल माजलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांचा उद्देश होता की महाराजांचा पुतळा फेकून द्यायचा असं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे आमच्या एका जिजाऊ च्या लेकीला कपडे फाटेपर्यंत मारलं. येथील काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली असे आम्हाला सांगण्यात आले. काही आरोपींना अटक केली मात्र त्यात गुन्हे कोणते लावले. एवढा माज कोणाला आहे छत्रपती शिवरायांशी एवढा कस काय आहे आम्ही तर त्यांच्या पुतळ्याबद्दल काही मनात ठेवत नाही. तिथे कोण कोण माजलेल आहे आम्हाला बघू द्या. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केला आहे. आरोपींना अटकेची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
-
भाजप युवा मोर्चाला यूथ काँग्रेस देणारं प्रत्युत्तर
मुंबई यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत साबरी म्हणाल्या की, आज भाजप युवा मोर्चाने राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले, त्यावेळी पोलिस कुठे होते, पोलिसांना हे माहित नव्हते का? असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या युवा मोर्चाला यूथ काँग्रेस उत्तर देणार आहे. आणि लवकरच भाजप युवा मोर्चाला यूथ काँग्रेसच्या माध्यमातून उत्तर मिळेल असे झीनत सबरीन म्हणाल्या. झीनत म्हणाल्या की, भाजप नेते अमित साटम आणि नगरसेविका प्रीती सातम हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत.
-
जिल्हा परिषद शाळेत डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग सुरु झाला आहे. मुलगा शाळेत पोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांनी स्कॅनिंग केल्यानंतर पालकांना जातो याचा संदेश येतो. मुले घरातून शाळेत पोचली आणि शाळेतून घरी निघाल्याचा पालकांना मेसेज मिळतो.
-
आता तर दुर्बिण घेऊन विरोधी पक्ष शोधावा लागतोय-चंद्रकांत पाटील
विरोधीपक्ष नेते पद रिक्त आहे. सरकारने सुचवायचं असत. टेक्निकल अडचणी आहे. बरेच दिवस निर्णय करत नाही. मात्र या अधिवेशनात मार्ग निघेल असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. नेता असावा की नाही माहीत नाही मात्र विरोधी पक्ष असावा. आता तर दूर्बिण घेऊन विरोधी पक्ष शोधावा लागतोय. दुपार होत होता सभागृह रोडवतो, मंत्र्याला विषय मांडायला उत्साह नसतो, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
-
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्व साक्षीदारांची यादी सादर करणार
मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप फॉरेन्सिक लॅब ला दिला होता. त्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे. पुढील सुनावणी त सर्व साक्षीदारांची लिस्ट देण्यात येणार आहे.आता जो डिले करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून त्यांनी केलेला होता एक तर त्यांना चार्ज प्रेम होऊ द्यायचं नव्हतं.आता या प्रकरणी चार्ज प्रेम झाला आहे लवकरच साक्षी पुराव्याची यादी दिली जाणार आहे. लवकरात लवकर ही केस मार्गी लागावी अशी मागणी असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सांगितले.
-
आंब्याच्या मोहोराने बहरल्या बागा
गोदिंया जिल्ह्यात आंब्याच्या मोहोराने बागा बहरल्या आहेत.ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यंदा भरघोस उत्पादनाची आशा आहे. पण बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची भीती वाटत आहे. किडी-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली आहे. हवामानावर शेतकर्यांची नजर आहे.
-
विधान परिषदेसाठी भाजपचे अनेक जण इच्छुक
सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी विविध नेत्यांकडून आमदारकीसाठी फिल्डिंग लावली आहे. जिल्ह्यातील भाजपचे 5 नेते विधान परिषदेच्या रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील आणि शहाजी पवार यांची नावे आघाडीवर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक 2022 पासून रिक्त आहे.
-
मुलीच्या लग्नाच्या बस्ता खरेदीची चिंता,आर्थिक विवंचनेतून शेतकरी पित्याने संपवलं जीवन
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजु कालापाड यांनी स्वतःच्या शेतात जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडलीये. राजू कालापाड यांच्या मुलीचं लग्न 14 मार्च होणार होतं. आज लग्न बस्त्याची खरेदी होणार होती. मात्र पैशांची जुळवा जुळव नं झाल्यानं आर्थिक विवंचनेतून राजू कालापाड यांनी आत्महत्या केल्याचं गावाकऱ्यांनी सांगितलंय.
-
महाराष्ट्रातील कोण VSR सोबत आहेत ते नंतर सांगेन – रोहित पवार
महाराष्ट्रातील कोण VSR सोबत आहेत ते नंतर सांगेन. दादांकडे बघून पारदर्शकपणे चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
-
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना घडली दुर्देवी घटना.लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना घडला प्रकार. सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे हा तरुण धावत असताना अचानक कोसळला.
-
आंब्याच्या मोहोराने बहरल्या बागा
गोंदियात आंब्याच्या मोहोराने बहरल्या बागा. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत. यंदा भरघोस उत्पानाची आशा. पण बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची भीती.गोंदियात आंब्याचा मुबलक मोहोर. किडी-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली. हवामानावर शेतकऱ्यांची नजर. आंबा हंगामावर ढगांचे सावट.
-
विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपच्या 5 नेत्यांकडून फिल्डिंग
सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी विविध नेत्यांकडून आमदारकीसाठी फिल्डिंग. जिल्ह्यातील भाजपचे 5 नेते विधान परिषदेच्या रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील आणि शहाजी पवार यांची नावे आघाडीवर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक 2022 पासून रिक्त आहे. मात्र ही निवडणूक एप्रिलच्या अखेरीस होऊ घातली आहे. त्यामुळे या पाचपैकी विधान परिषदेला कोणाची वर्णी लागतेय हे पाहणे महत्वाचे आहे.
-
भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज
ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरोधात काम केलं, त्यांनाच भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं. अमरावती महानगरपालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांची नाराजी.भाजपमधल्या लोकांनी काम न केल्याने माझा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचाही कलोती यांचा आरोप.
-
नाशिकच्या तपोवन मध्ये पुन्हा एकदा पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन सुरू
तपोवन मध्ये आज पर्यावरण प्रेमींचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलं आहे. पर्यावरण प्रेमींकडून उपोषणाला सुरुवात झाली आहे. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या तपोवनमध्ये मागच्या गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. पुन्हा एकदा तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात वृक्ष प्रेमींचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु आहे.
-
चिखला येथील घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहर बंद
लोणार तालुक्याच्या चिखला येथील छत्रपती पुतळा हटवण्याचा कारणावरून झालेल्या वादाचे पडसाद आता देऊळगाव राजा शहरात उमटले असून नागरिकांनी देऊळगाव राजा शहर बंद ठेवले आहे . तर शेकडो नागरिक निषेध म्हणून रस्त्यावर देखील उतरले असून घटनेतील आरोपी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केलीय ..
-
हिमाचलमध्ये दरड दुर्घटनेत गोंदियाचा जवान शहीद…
हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात कर्तव्य बजावत असताना दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील सुकाटोला पिपरिया येथील सुभेदार नेतराम हेमराज यांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे जिल्हाभर शोककळा पसरली आहे… शहीद जवानाचे पार्थिव आज दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्या गावी पोहोचणार असून शासकीय सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गावात हळहळ व्यक्त होत आहे….देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्याया वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली…
-
मोदी शहा यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा – रोहित पवार
या चौकशीला न्याय द्यायचा असेल तर देशातील सर्वात प्रमुख लोकांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात. या प्रकरणातील लोक पॉवरफुल आहेत. त्यामुळे मोदी शहा यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. मी मोदींना लेटर देणार आहे. इमेलद्वारे मी देणार आहे… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
-
VRC कंपनीच्या पाठीशी मोठी लोकं आहेत – रोहित पवार
दिल्लीत रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरु आहे… VRC कंपनीच्या पाठीशी मोठी लोकं आहेत… केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी देखील रोहित पवार यांनी केली. राहुल गांधी यांनी लक्ष घालून आमचा विषय मांडावा… असं वक्तव्य देखील रोहित पवार यांनी केलं आहे.
-
नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली
नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याने इग्नोर करतेय म्हणून प्रियकराने हत्या केली. मुलीचा मृतदेह गळ्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत आढळून आलेला. प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये घेत शिक्षण होता. याप्रकरणी दोन संशयित आरोपी ताब्यात, तर एकाचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे.
-
व्याजाने दिलेले पैसे परत कर म्हणत अपमानास्पद वागणूक दिल्याने तरुणाची आत्महत्या
बीडच्या धारूर तालुक्यातील गावंदरा गावच्या एका बावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धर्मराज बडे असे या तरुणाचे नाव आहे. बडे यांना बालासाहेब कांबळे याने पन्नास हजार रुपये व्याजाने दिले होते. ते परत मागण्यासाठी कांबळे हा बडे यांच्या घरी गेला होता आणि त्या ठिकाणी बडे याच्या कुटुंबीयांच्या विषयी अश्लील शब्द वापरत कांबळे याने त्रास दिला होता.
-
भूम तालुक्यातील शेतकऱ्याच्या कथित अपहरण प्रकरणाला नवे वळण
पाटसांगवी गावात 60 वर्षीय शेतकऱ्याचे सख्या पुतण्याने अपहरण करून जबरदस्तीने जमीन खरेदी करून घेतल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी समोर आला होता. संबंधित वृद्ध शेतकऱ्याला अनेक दिवस डांबून ठेवून मारहाण व दमदाटी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या दबावाखाली त्याच्या नावावर असलेली साडेसहा एकर जमीन जबरदस्तीने खरेदी करून घेतल्याचे आरोप होते.
-
पेपर सुरू झाला अन् अवघ्या 10 मिनिटांत 10 रुपयाला प्रश्नपत्रिका विकली गेली
दमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मातृभाषा असलेल्या मराठीच्या पेपरमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा पैठणमध्ये अक्षरशः फज्जा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांनी उपस्थित असतानाही उघडपणे कॉपीची देवाणघेवाण सुरू होती. हा सर्व प्रकार काल घडला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे
-
संजय राऊत मालेगाव कोर्टात हजर
संजय राऊत हे नुकताच मालेगाव कोर्टात हजर झाले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता, त्याच्या सुनावणीसाठी राऊत कोर्टात हजर झाले.
-
राहुल गांधी यांना मुलुंड चेक नाका इथे कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
राहूल गांधी यांना मुलुंड चेक नाका इथे कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. मोठा पोलीस बंदोबस्त असूनही राहूल गांधींनी दाखवण्यात आले काळे झेंडे. पोलिसांकडून अज्ञातांची धरपकड
-
गृह विभागाने काढली माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली.
-
संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
बीड – संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरोप निश्चिती झाल्यानंतर आज प्रथमच खून आणि खंडणी या प्रकरणांवर युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत आरोपी विष्णू चाटे याने बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर देखील सुनावणी होऊ शकते.
-
पोलिस असल्याचे सांगून भामट्यांचा वृद्धेला गंडा, दीड लाखांचे दागिने लंपास
जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात तीन भामट्यांनी महिलेची फसवणूक केली. आम्ही पोलिस आहोत, पुढे खून झालाय, पुढे जाऊ नका, असे सांगून तीन भामट्यांनी वृद्धेला फसवलं आणि तिचे 1 लाख 56 हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फसवणूक केली.
-
वाळूज येथे सावत्र बापाकडूनच मुलीवर अत्याचार, आरोपी फरार
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणू,सकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वाळीज परिसरात सावत्र बापानेच चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनमतर आरोपी पिता फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर – शिवजयंतीच्या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत चोरट्यांनी डल्ला मारला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या 12 महिलांची मंगळसूत्रे आणि 3 तरुणांच्या सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी लांबवल्या आहेत.
-
धाराशिव जिल्ह्यात भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार ?
भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता पक्षांतराची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पराभूत झालेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मंथन बैठकीत पक्षांतराचा सूर दिसत आहे.
-
राहुल गांधी आज मुंबईत
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राहुल गांधी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर भिवंडी सत्र न्यायालयामध्ये 11.30 वाजता हजर होणार आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत.