AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन महिला नेत्यांसह एक माजी खासदार आणि धर्मगुरूही घेणार शपथ, ७ चेहऱ्यातील ४ चेहरे महत्त्वाचे

आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. सोमवारी रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे. आज या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.

दोन महिला नेत्यांसह एक माजी खासदार आणि धर्मगुरूही घेणार शपथ, ७ चेहऱ्यातील ४ चेहरे महत्त्वाचे
| Updated on: Oct 15, 2024 | 11:37 AM
Share

Maharashtra Vidhan Parishad Governor : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. सोमवारी रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे. आज या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. यानुसार भाजप ३, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी २-२ जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

राज्यपाल नियुक्त होणाऱ्या आमदारांची नावे

  • चित्रा वाघ (भाजप)
  • विक्रांत पाटील (भाजप)
  • बाबूसिंग महाराज राठोड (भाजप)
  • मनीषा कायंदे (शिंदे गट)
  • हेमंत पाटील (शिंदे गट)
  • पंकज भुजबळ (अजित पवार गट)
  • इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)

‘या’ नेत्यांचे पुनवर्सन

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पुनवर्सन करण्यात येणार आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी निवड करण्यात आली. त्यांच्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांचेही पुनवर्सन केले जाणार आहे. हे दोघेही राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ घेणार आहेत.

तसेच वाशिममधील पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनाही राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली जाणार आहे. त्यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

विधीमंडळात होणार शपथविधी

राज्यपाल नियुक्ती आमदारांचा शपथविधी आज दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. सध्या विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ देतील.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.