288 मतदारसंघांसह उदयनराजेंचंही भवितव्य ठरणार, महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

मतमोजणी (Vidhansabha result Live updates) सकाळी 8 वाजता सुरु होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

Vidhansabha result Live updates, 288 मतदारसंघांसह उदयनराजेंचंही भवितव्य ठरणार, महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

मुंबई : प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण (Vidhansabha result Live updates) करण्यात आली आहे. विधानसभेचे 288 मतदारसंघ आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी राज्यात एकूण 25 हजारपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर असेल. मतमोजणी (Vidhansabha result Live updates) सकाळी 8 वाजता सुरु होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

मतमोजणी कशी होईल?

सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचं प्रशिक्षण दोन वेळा देण्यात आलंय. 269 ठिकाणी 288 केंद्रावर मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो.

मतदारसंघातील पाच बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. सुरुवातीला टपाली मते आणि बारकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

स्ट्राँग रुमसाठी विशेष सुरक्षा

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्राँग रूमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्राँगरूममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

निकाल कसा पाहाल?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘Voter Helpline’ या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड अॅपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

याशिवाय टीव्ही 9 मराठीवरही सकाळी 6 वाजल्यापासून महाकव्हरेज पाहता येईल. निकालाची प्रत्येक बातमी www.tv9marathi.com वर वाचता येईल, तर फेसबुक आणि ट्विटरवर क्षणाक्षणाची अपडेट पाहता येईल.

VIDEO : टीव्ही 9 मराठी लाईव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *