AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update: शेतकऱ्यांसमेर नवं संकट, हवामान खात्याचा इशारा, बंगालच्या वादळाने महाराष्ट्रात…

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा आहे, पण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज आहे. राज्यातील तापमान येणाऱ्या तीन दिवसांत वाढेल अशी शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील अनेक भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD Weather Update:  शेतकऱ्यांसमेर नवं संकट, हवामान खात्याचा इशारा, बंगालच्या वादळाने महाराष्ट्रात…
weather updatesImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 20, 2025 | 9:22 AM
Share

देशातील हवामान सतत बदलत आहे. राज्यातील अनेक भागांतही सध्या वातावरण बदल दिसत असून बहुतांशी ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढलेला दिसतोय. मात्र याच वातावरणात आता बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रत्‍यवर्ती चक्रीवादळामुळे राज्यात काही भागांत 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यात येत्या तीन दिवसांत तापमान वाढणार असून उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अमरावती, यवतमाळसह काही जिल्ह्यांत तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू न शकल्याने रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील उच्चतम तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा, तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीपूर्वीच दिल्लीतील वातावरण प्रसन्न झाले आहे. काल रात्री उशिरापासून दिल्ली, नोएडा आणि एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान, तामिळनाडूच्या काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात १-३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्याच वेळी, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये अनेक ठिकाणी 1-3 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. पावसासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने 23 फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्‍यवर्ती चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशामध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....