AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण, माझ्या नादी… मनोज जरांगेचा भाजपच्या महिला नेत्याला इशारा

भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी जरांगे पाटलांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. यावर आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण, माझ्या नादी... मनोज जरांगेचा भाजपच्या महिला नेत्याला इशारा
Jarange Patil
| Updated on: Aug 25, 2025 | 5:05 PM
Share

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार आहेत. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ते मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहेत. अशातच भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी जरांगे पाटलांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. यावर आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मनोज जरांगे म्हणाले की, ;वाघ आणि शेळी मला काही माहीत नाही, आमच्या आई बहिणीवर दगडफेक केली तेव्हा ही कुठे गेली होती, आणि ही कोण आहे? तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण माझ्या नादी लागू नको मी सगळं बिऱ्हाड उठविल; असा इशारा जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बाया पुढे घालायचं ठरविल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी बाईच्या पदराआड लपू नये. तुझ्या आईवर बोललो इतकं लागलं, परंतु आमच्या आईचे डोके फोडले तेव्हा कुठे गेलता तू? राजकीय स्वार्थासाठी आईला पुढे घालायला लागला’ असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

मुंबईला जाण्याबाबत बोलतान जरांगे पाटील म्हणाले की, ‘आम्ही 27 तारखेला आंतरवाली सराटी मधून बाहेर पडणार असून पैठण-शेवगाव-पांढरीपूल-अहिल्यानगर-आळेफाटा आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर असणार आहे. 26 तारखेच्या आत अंमलबजावणी केली तर ठीक आहे अन्यथा एकदा अंतरवाली सराटी सोडली तर नंतर चर्चा करणार नाही. थेट मुंबईमध्ये गेल्यावर चर्चा करू’ अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. जशी आज फडणवीस यांनी काहीतरी उकरून काढली. आरक्षण द्यायची वेळ आली तर आता आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मुंबईत येऊ द्यायचं नाही.’

‘खोटं बोलून मतदान घ्यायचं पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेवटी अंगावर आलं तर रळीचा डाव खेळायचा, की माझ्या आईला बोलले. आरक्षण द्यायचं जीवावर आलं आहे तर आईकडे आणि बापाकडे घेऊन जात आहे. तुम्ही आरक्षण कसं देत नाही पाहतो मी. मी घेणारच आहे आरक्षण’ असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.