मनोज जरांगे अन् नारायण राणे यांच्यात वार-पलटवार, राणे म्हणाले, मराठवाड्यात येऊन समाचार घेणार…
मी बघायला लागलो तर तुमची कोकणात फजिती होणार आहे. मी राणे यांच्यावर बोलायला लागलो तर मागे त्यानंतर मागे सरकरणार नाही. नारायण राणे यांनी विनाकारण मला डिवचू नये. त्यांनी माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करु नये. मी जर धमकी दिली तर राज्यात त्यांना कुठेच फिरता येणार नाही.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यात वाक् युद्ध पेटले आहे. नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांना मराठवाड्यात येऊन समाचार घेणार असल्याचे म्हटले होते. त्याला मनोज जरांगे यांनीही जोरदार उत्तर दिले. माझ्या नादाला लागू नका. महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांना दिला. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणे संतापले होते. त्यांनी मराठवाड्यात जाऊन मनोज जरांगे यांचा समाचार घेणार असल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले होते नारायण राणे
नारायण राणे सावंतवाडीत बोलताना म्हणाले होते की, मी आता मराठवाड्यात जाणार आहे. मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात जे जे बोलतोय त्या सर्वांचा समाचार घेणार आहे. उद्धव ठाकरे व बुटका संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे बोलतायत त्यांचा ही समाचार घेणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आपण मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले.
भाजपचे जिल्हा अधिवेशन सावंतवाडीत झाले होते. त्यावेळी नारायण राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंसह उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार त्यांनी केला. त्याला जेलमध्ये टाकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. काय बिशाद आहे, त्याची असा सवाल करत नारायण राणे यांनी केला.
मनोज जरांगे यांच्याकडून पलटवार
मी बघायला लागलो तर तुमची कोकणात फजिती होणार आहे. मी राणे यांच्यावर बोलायला लागलो तर मागे त्यानंतर मागे सरकरणार नाही. नारायण राणे यांनी विनाकारण मला डिवचू नये. त्यांनी माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करु नये. मी जर धमकी दिली तर राज्यात त्यांना कुठेच फिरता येणार नाही.सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना सध्या काहीही सुचत नाही. ते सत्ताधाऱ्यांचे पाय चाटत आहे. परंतु मला मराठा समाजाला मोठे करायचे आहे.
