संजय राठोडांचा मंगळवारी वाशिम दौरा, गर्दी वाढणार?; पोहरादेवी संस्थानला पोलिसांची नोटीस

संजय राठोडांचा मंगळवारी वाशिम दौरा, गर्दी वाढणार?; पोहरादेवी संस्थानला पोलिसांची नोटीस
संजय राठोड

वनमंत्री संजय राठोड उद्या मंगळवारी पोहरादेवी येथे येणार आहेत. (manora police issue notice to poharadevi temple samiti)

भीमराव गवळी

|

Feb 22, 2021 | 1:55 PM

वाशिम: वनमंत्री संजय राठोड उद्या मंगळवारी पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आधीच जिल्ह्याती कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने उद्या होणारी पोहरादेवी येथील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये 50 पेक्षा अधिक लोकं जमता कामा नये असे आदेशच पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या राठोड यांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (manora police issue notice to poharadevi temple samiti)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट आरोप केल्यानंतर पंधरा दिवसानंतर पहिल्यांदाच वनमंत्री संजय राठोड सार्वजनिक ठिकाणी येणार आहेत. उद्या ते पोहरादेवी येथे येऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर पोहरादेवीवर जमण्याची शक्यता आहे. या निमित्ताने राठोड यांच्याकडूनही पोहरादेवीवर शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस बजावली आहे.

महंत दुपारी संवाद साधणार

कोरोनाचा संसंर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर संजय राठोड समर्थक मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल करत आहेत. त्यामुळं पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बजावलेली नोटीस बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना मिळाली आहे. यासंदर्भात आम्ही आज 3 वाजता चर्चा करून बंजारा समाजाला आवाहन करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.

बाबूसिंग महाराज उपस्थित राहणार

बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र महाराज कर्नाटकमध्ये असून ते उद्या पोहरादेवी येथे हजर राहणार आहेत, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.

50 पेक्षा जास्त लोक नको

संजय राठोड यांच्या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांना जमा होऊ देऊ नये, असं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे, अशी माहिती वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेश यांनी दिली.

किती वाजता येणार?

राठोड हे उद्या 23 तारखेला 11.30 वाजता पोहरादेवी येथे येणार आहेत. राठोड हे सहकुटूंब पोहरादेवीत येऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. पोहरादेवी संस्थानचे महंत जितेंद्र महाराज आणि सुनील महाराज यांनी याबाबतची माहिती दिली. (manora police issue notice to poharadevi temple samiti)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले. (manora police issue notice to poharadevi temple samiti)

संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

पूजा चव्हाणला नेमकं काय झालं होतं? ती स्ट्रीप रेड का झाली?; कथित मंत्री का घाबरला?

(manora police issue notice to poharadevi temple samiti)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें