‘उदयनराजे फिरतायत, त्यांचं अभिनंदन, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट’, विजय वडेट्टीवार म्हणाले…

गरीब आणि वंचित समाजाचा वाटा मोठ्या समाजाने उचलाणे योग्य नाही, असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. (Maratha reservation SEBC Vijay Wadettiwar)

  • सुनिल काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 22:03 PM, 18 Feb 2021
'उदयनराजे फिरतायत, त्यांचं अभिनंदन, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट', विजय वडेट्टीवार म्हणाले...
विजय वडेट्टीवार आणि उदयनराजे भोसले

मुंबई : “मराठा आरक्षणासंदर्भात भाजप खासदार उदयनराजे भोसले फिरत आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. माराठा आरक्षणासंदर्भात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र,  मराठा समाजाला एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे,” असे  मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) म्हणाले. मागील काही दिवसांपासून भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. या पर्श्वभूमीवर त्यांनी वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. (Maratha community should have given reservation in SEBC category said Vijay Wadettiwar)

“मराठा आरक्षणासंदर्भात भाजप खासदार उदयनराजे फिरत आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र, मराठा समाजाला एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. गरिब आणि वंचित समाजाला समोर ठेवून आम्ही ही मागणी करतोय,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट

मागील काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी राज्यातील मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजे यांनी दोन्ही नेत्यांशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.

नाना पटोले काय चुकीचं बोलले ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिलाय. त्यांच्या या वक्तव्याचे विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केले आहे. याविषयी बोलताना नाना पटोले हे काय चुकीचं बोलले?, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. “केंद्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाकाळात हेच अभिनेते आवाज उठवत होते. मात्र, आता हे सेलिब्रिटी का बोलत नाहीत? त्यांना कोणी देशद्रोही म्हणू नये यासाठी जर हे सेलिब्रेटी बोलत नसतील तर चुकीचं आहे.” असे वडेट्टीवार म्हणाले.

इतर बातम्या :

शिवजयंतीच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजेंची रोखठोक भूमिका, म्हणाले….