तर EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान? मराठा आंदोलकांच्या खेळीने प्रशासनासमोर ‘पेच’

Maratha Candidate EVM | मराठ आंदोलकांच्या एका खेळीने जिल्हा प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान, ईव्हीएम मशीनवर करावं की मतपत्रिकेवर असा प्रश्न जिल्हा प्रशासनसमोर उभा ठाकला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

तर EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान? मराठा आंदोलकांच्या खेळीने प्रशासनासमोर 'पेच'
EVM आणि VVPAT च्या पावत्यांबद्दल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स यांनी व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्यांची पडताळणी व्हावी, यासाठी याचिका केली आहे. Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 10:18 AM

संतोष जाधव, प्रतिनिधी, धाराशिव | 7 March 2024 : मराठा आंदोलकांच्या एका खेळीने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज जर जास्त आले तर EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे. मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करणे पण जिकरीचे काम असणार आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा

मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा सुरु आहे. या लढ्याला यश येत असतानाच सगेसोयरेवरुन सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. दहा टक्के मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मराठा आंदोलक आता निवडणुकीतून त्यांचा रोष व्यक्त करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार उभे करण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

तर निवडणूक बॅलेट पेपरवर

धाराशिव जिल्ह्यात 736 गावे आहेत. बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर, मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

या अचडणींचा करावा लागेल सामना

  • जर जास्त उमेदवारी अर्ज आल्यास जिल्हा प्रशासनला मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल, अधिकारी, वाहन, अपुरे मनुष्यबळ आदी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
  • उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार, घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे. ही पण एक मोठी अडचण प्रशासनासमोर आहे.
  • जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला याविषयीचे पत्र लिहिले आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे.
Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.