AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange | खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे…मनोज जरांगे यांचे आव्हान

Manoj Jarange Patil | देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणे बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange | खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे...मनोज जरांगे यांचे आव्हान
मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Feb 26, 2024 | 7:15 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि. 25 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मराठा आंदोलना दरम्यान प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाही. पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. कोणाच्या आडून हल्ले करु नये, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. मी सागर बंगल्यावर येण्यास तयार आहे. यावेळी लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना शांत होण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही मनोज जरांगे आक्रमक होते. त्यामुळे व्यासपीठावर काही जण आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर मनोज जरांगे ऐकवण्यास तयार नव्हते.

मराठ्यांना संपवण्याचा फडणवीस यांचा डाव

देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल.

आपण कोणत्याही पक्षाचे नाहीत

छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी केवळ समाजाचा आहे. समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.