सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा, धनंजय मुंडेंचीही मोठी घोषणा

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा, धनंजय मुंडेंचीही मोठी घोषणा
दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 03, 2022 | 6:44 PM

पुणे : खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पुढाकारातून पुणे येथे 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा (Marriage Ceremony) पार पडला. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सूचना केली होती. त्यानुसार या ऑनलाईन सोहळ्यातच धनंजय मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं

दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कोरोनाबाधित असतानाही सुप्रिया सुळेंकडून नियोजन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी धनंजय मुंडे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे व स्वतः सुप्रिया सुळे यांसह मान्यवर उपस्थित होते. स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो, असे म्हणत धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांनी सुप्रियाताई यांना कोविड मधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Marriage Ceremony 1

दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

धनु भाऊ आणि राजेश भैय्या यांच्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता – सुळे

सामाजिक न्याय मंत्री आमचे धनु भाऊ व आरोग्यमंत्री राजेश भैय्या या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्न सोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा हा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, यासाठी दोघा मंत्री महोदयांनी आपल्या विभागांमार्फत सहकार्य करावे अशी सूचना सुळे यांनी केली.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम

सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे, त्यामुळे नोंदणी नसलेल्या दिव्यांग बांधवांची या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी केली जावी यासाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबिविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती याप्रसंगी बोलताना राजेश टोपे यांनी दिली.

Marriage Ceremony 2

दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

असा रंगला विवाह सोहळा…

पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यलयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

त्यानंतर सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व विधिवत सनई चौघड्यांच्या स्वरात हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दिपिका शेरखाने तसेच सर्वच आयोजकांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांनीच कौतुक केले.

इतर बातम्या :

पुण्यात तूर्तास शाळा बंदचा निर्णय नाही, पालकमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर नवी नियमावली, महापौरांकडून स्पष्ट

Breaking : मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार, शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें