AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरणाचा उल्लेख… आणि मनसेची राष्ट्रवादीच्या नेत्यावर खरमरीत टीका

आजपासून हा निर्णय लागू झाला असेल तर त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही विषय लोकांसमोर घेऊन जात असतो आणि लोकांना पटवून देत असतो. जनजागृती व्हायला सुरू झाली आहे. येत्या काळात लोकच टोल बंद करायला रस्त्यावर येतील यात तीळमात्र शंका नाही.

धरणाचा उल्लेख... आणि मनसेची राष्ट्रवादीच्या नेत्यावर खरमरीत टीका
MNS RAJ THACKERAY, AVINASH JADHAV, CM EKNATH SHINDE Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Oct 08, 2023 | 11:14 PM
Share

ठाणे : 8 ऑक्टोबर 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे येथे टोल दरवाढी विरोधात उपोषण सुरु केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे जाऊन आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले. त्यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीमध्ये ‘जेवढ्या छोट्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी करण्यात आली आहे. त्यांचे पैसे महाराष्ट्र शासन भरेल असे म्हटले आहे. यावरून अविनाश जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

देवेंद्रजी यांची प्रतिक्रिया ऐकली ते असं बोलले आहेत. जेवढ्या छोट्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी करण्यात आली. त्यांचे पैसे महाराष्ट्र शासन भरेल. मला त्यांना विचारायचं आहे की ही बातमी खरी आहे का? हे जर खरं असेल तर टोल नाकावाले सरकारचे ऐकत नाही का? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.

ठाणेकरांच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती याचिका मागे का घेतली ते कळत नाही. कोर्टाने सांगितले याचिकाकर्तेच आता मंत्री आहेत. त्यांनी निर्णय घ्यावा. ती याचिका रद्द केली की झाली. कशामुळे झाली ते माहित नाही. या गोष्टीला पाच वर्ष झाली. आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात हा निर्णय असेल तर त्यांनी ठाणेकरांच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.

अजित दादा जर धरणात

अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी अविनाश जाधव हे राजकीय नौटंकी करत आहेत असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘आनंद परांजपे यांना आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ. अजित दादा जर धरणात xxxx असतील तर ती नौटंकी नसेल तर काय म्हणायचं?’, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

प्रियांका चतुर्वेदी आणि सुषमा अंधारे दोघी मिळून

ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘मनसेचं भविष्य झिरो आहे. त्यामुळे ते महायुतीत आले तरी झिरो इज़ इक्वल झीरो’ अशी टीका केली होती. त्यावर पलटवार करताना ‘आदित्य ठाकरे वर्ष दीड वर्ष पूर्वी म्हणाले होते मनसे संपलेला पक्ष आहे. पण, नियतीचा खेळ बघा दोन महिन्यात मुख्यमंत्री पद गेलं. आदित्य ठाकरे यांचं मंत्री पद गेलं. आमदार गेले. खासदार गेले. काहीही राहील नाही. प्रियांका चतुर्वेदी आणि सुषमा अंधारे दोघी मिळून पक्ष संपवतील. मायनस शून्य मायनस शून्य करतील असा टोला त्यांनी लगावला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.