AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का?, मिलिंद नार्वेकर यांना महायुतीची मोठी ऑफर; झटका देणार?

देशात लोकसभेचं रण चांगलंच तापलं आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे. दुसरा टप्पा जवळ आला आहे, त्यामुळे सर्वच उमेदवार कामाला लागले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होणार आहे. त्यापूर्वीच एक मोठी बातमी येत आहे. उद्धव ठाकरे यांना लवकरच मोठा झटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का?, मिलिंद नार्वेकर यांना महायुतीची मोठी ऑफर; झटका देणार?
| Edited By: | Updated on: Apr 21, 2024 | 11:47 AM
Share

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणारी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांना महायुतीने मोठी ऑफर दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर ही ऑफर घेऊन ठाकरे गटाला धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसं झाल्यास मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाकडे असल्याने मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लढू शकतात, असंही सांगितलं जात आहे.

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. अरविंद सावंत यांनी मुंबईत सर्वात आधी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांची प्रचाराता आघाडी दिसत असतानाच दक्षिण मुंबईत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आणि अत्यंत जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांनाच उमेदवारी देण्याचा घाट महायुतीत घातला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यासाठी उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. मात्र, नार्वेकर यांच्याकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तीन नेते इच्छुक

दरम्यान, दक्षिण मुंबईतील जागेसाठी महायुतीतील तीन नेते इच्छुक आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे दोन नेते भाजपमधून इच्छुक आहेत. तर शिंदे गटातून यशवंत जाधव हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या मतदारसंघात यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. तर यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यामुळे या तीन नेत्यांपैकी एकाला उमेदवारी मिळते की मिलिंद नार्वेकर शिंदे गटात आल्यास त्यांना उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिलिंद नार्वेकर कोण?

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहे. उद्धव ठाकरे यांची सावली म्हणूनही नार्वेकर यांची ओळख आहे. ते उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आहेत. जेव्हा जेव्हा शिवसेना संकटात आली तेव्हा तेव्हा नार्वेकर यांनी संकटमोचकाची भूमिका निभावली होती. असं असलं तरी त्यांना वैतागून अनेकांनी पक्षही सोडलेला आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना मिलिंद नार्वेकर यांच्यावरच आरोप केला होता. मिलिंद नार्वेकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आमच्यात बेबनाव आणला. आमचे फोनही घेतले नाही, असं सांगत राणे यांनी पक्ष सोडला होता. अनेक आमदारांचंही तेच म्हणणं होतं. मात्र, आता तेच नार्वेकर शिंदे गटात आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.