AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरज जंक्‍शनमध्ये रेल्वेचे उत्पन्न एक कोटीने घटले, फुकट्यांना 22 लाखांचा दंड

मात्र या काळात फुकट्या प्रवाशांची संख्या मात्र कमी झालेली नाही. (Miraj Railway revenue Decrease)

मिरज जंक्‍शनमध्ये रेल्वेचे उत्पन्न एक कोटीने घटले, फुकट्यांना 22 लाखांचा दंड
भारतीय रेल्वे
| Updated on: Mar 22, 2021 | 1:36 PM
Share

सांगली : कोरोना संकटानंतर आता बहुतांश व्यवहार पूर्वपदावर आले होते. मात्र रेल्वे अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सांगलीच्या मिरज जंक्शनमध्ये रेल्वेचे उत्पन्नात एक कोटींची घट झाली आहे. मिरजमध्ये सद्यस्थितीत 35 रेल्वे गाड्या बंद आहेत. मात्र या काळात फुकट्या प्रवाशांची संख्या मात्र कमी झालेली नाही. त्यांना तब्बल 22 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. (Miraj Railway revenue Decrease by 1 crore)

मिरजेतील रेल्वेचे उत्पन्न घटले

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनचा अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. या काळात अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे अनेक व्यवहार पूर्वपदावर आले असले तरी रेल्वे अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सांगली रेल्वेच्या मिरज जंक्‍शनमधून जाणाऱ्या एकूण 65 पैकी केवळ 37 गाड्या सुरु आहेत. त्यामुळे मिरजेतील काऊंटरचे दर महिन्याचे उत्पन्न सुमारे एक कोटी रुपयांनी घटले आहे. मात्र या काळात फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नसून त्यांच्याकडून तब्बल 22 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे पुन्हा रुळावर येण्याबाबत अनिश्‍चितता

कोरोना संकटाला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्यावर्षी 22 मार्चला सांगली जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. याच दिवशी देशात लॉकडाऊन झाले आणि सर्व ठप्प झाले. याचा मोठा फटका रेल्वेला बसला होता.आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली. लोक जागेवर थांबले. बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील औद्योगिक कामगार आणि बांधकाम मजुरांसह हंगामापुरते येणारे बेदाणा निर्मिती कामगार अडकून पडले होते.

मे महिन्यात काही कामगारांसाठी गाड्या सोडण्यात आल्या. मात्र रेल्वे पूर्ण सुरू व्हायला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यानंतरही ती अद्याप पूर्ण रुळावर आलेली नाही. मुंबईत लोकल सुरु झाल्या. कर्नाटकात स्थानिक पॅसेंजर सुरू झाल्या. मात्र महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्या सुरू होतील की नाही, याबाबत अनिश्‍चितता आहे.

फुकट्या प्रवाशांकडून 22 लाखांची वसूली 

मिरज जंक्‍शनमध्ये दर महिन्याला तीन कोटी रुपयांचे उत्पन्न व्हायचे. ते आता दोन कोटींवर आले आहे. दरम्यान, फुकट्या प्रवाशांकडून 22 लाख इतकी मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तिकीट तपासणीसांकडून करण्यात आली. यामध्ये नावात फेरफार करून प्रवास करणे, विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफार्म तिकीट इत्यादींचा समावेश होता.

सध्या बंद असलेल्या रेल्वे पॅसेंजर

  • मिरज-बेळगाव
  • मिरज-लोंढा
  • मिरज-हुबळी
  • मिरज-कॅसरलॉक
  • मिरज-पंढरपूर
  • मिरज-परळी
  • मिरज-कुर्डूवाडी
  • मिरज-सातरा
  • मिरज-कोल्हापूर
  • एक्‍स्प्रेस गाड्या
  • लिंक एक्‍सप्रेस
  • सह्याद्री एक्‍सप्रेस
  • कोल्हापूर- सोलापूर
  • कोल्हापूर- मनडुगनूर
  • मिरज-fc पंढरपूर
  • मिरज- सोलापूर
  • मिरज हुबळी लिंक

(Miraj Railway revenue Decrease by 1 crore)

संबंधित बातम्या : 

Holashtak 2021 : होलाष्टकमध्ये शुभ कार्य का केलं जात नाही? जाणून घ्या यामागील कारण…

World Water Day 2021 : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या…

VIDEO | जाळीत अडकल्याने पिल्लाची माकडीणीशी ताटातूट, प्राणीमित्राकडून सुटका

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.