पोलिसांची तरुणांना मारहाण, आमदार महोदयांचं रस्त्यात ठिय्या आंदोलन!

पोलिसांनी तरुणांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत आमदार अभिमन्यू पवार यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं.

पोलिसांची तरुणांना मारहाण, आमदार महोदयांचं रस्त्यात ठिय्या आंदोलन!


लातूर : राज्यभरात आज शिवजयंती साजरी करण्यात आली. अशावेळी लातूरमध्ये काही तरुण मोटारसायकलवर कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवत फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी काही युवकांना मारहाण केली आणि त्यांच्या बाईकचं सायलेन्सर काढून टाकण्याची कारवाई केली. मात्र पोलिसांनी तरुणांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत आमदार अभिमन्यू पवार यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं.(MLA Abhimanyu Pawar’s agitation against police in Latur)

काही तरुण लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरुन जोरजोरात हॉर्न वाजवत आणि गाडीचा आवाज करत फिरत होते. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. पोलिसांनी या तरुणांना धडा शिकवण्यासाठी पोलिसी खाक्या वापरला. तसंच त्यांच्या गाड्यांचे सायलेन्सर काढून टाकण्याची कारवाई केली. या कारवाईनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांवर आरोप करत ठिय्या आंदोलन केलंय. अभिमन्यू पवार हे पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात शिवाजी चौकात रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी युवकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत ठिय्या दिला. हा प्रकार बराच वेळ चालला.

आमदार अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल

कोरोना प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं शिवजयंतीसाठी काही नियमावली लागू केली होती. पण काही ठिकाणी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं. अकोल्यातील अकोट तालुक्यातील कुसाटा गावात विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी

आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय.

संबंधित बातम्या :

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

MLA Abhimanyu Pawar’s agitation against police in Latur

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI