AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी स्पष्ट सांगतो, भीती वाटतेय…उद्धव ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सोडले मौन, कुणावर साधला निशाणा

Uddhav Thackeray Shivsena : राज्यातील सत्ता समीकरणं बदलली आहेत. पक्ष फोडा फोडीनंतर राजकीय गणित बदललीच नाही तर बिघडली सुद्धा आहे. अनेक नेत्यांच्या मनात अस्वस्थता आहे. काहींना 20 वर्षांचे राजकीय करीयर झटक्यात संपण्याची भीती तर कुणाला कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती आहे.

मी स्पष्ट सांगतो, भीती वाटतेय...उद्धव ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सोडले मौन, कुणावर साधला निशाणा
या नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 9:57 AM

राज्याच्या राजकारणाने 2019 नंतर मोठी कूस बदलली. राजकारणातील परंपरागत शत्रू आणि मित्रांची सरळमिसळ झाली. या खिचडीत अनेकांना लॉटरी लागली तर अनेकांना राजकारणातून उठण्याची भीती वाटू लागली. लोकसभेतील बाका प्रसंग अनेकांनी अनुभवला. स्वतःच्या परंपरागत मतदारसंघातील बदलल्या समीकरणांनी राजकारणी अस्वस्थ झाले. आता मित्र कोण आणि शत्रू कोण यांचं गणित मांडण्यात त्यांची शक्ती खर्ची पडायला लागली आहे. पक्ष फोडा-फोडीनंतर राजकीय गणित बदलले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याने या सर्व बदलल्या परिस्थितीवर मनातील खदखद यापूर्वी पण बोलून दाखवली आहे. संवदेनशील मनाच्या भावना त्यांनी यापूर्वी पण जाहीर केल्या. पण आता त्यांना ही भीती सतावत आहे. कोकणातील या नेत्याने म्हटलंय तरी काय?

भीती वाढली आहे

उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांना भीती वाटत आहे. राजकीय हल्ले वाढल्याचे त्यांचे मत आहे. आपल्या वाट्याला अनेक अडचणी येत आहेत. विरोधकांकडून हल्ले होत आहे. मी पण माझं तत्व सोडलं नाही. अशा परिस्थितीत माझं कुटुंब आजपर्यंत एकत्र ठेवण्यात यशस्वी झालो. लोकांचे विचार बदलत चालले आहेत लोक विचाराचा सामना विचाराने करायला तयार नाहीत. वैयक्तिक हल्ले राजकारण्यांवर वाढलेले आहेत. टीकेचा सामना विचाराने करावा हे लोप पावले आहे. मी स्पष्ट बोलतो सिक्युरिटी नाही, अशी भीती भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

विरोधकांना संपवण्याची नीती

पण 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे राजकारण आले. त्यांचा स्तर आणि कार्य पद्धत बघता विरोधकांना संपवण्याची नीती महाराष्ट्रात खेळली जाते आहे. हे सर्व बघता भीती वाटते. वाढत वय वाढत कुटुंब वाढती नातवंडे जबाबदार्‍या यामुळे भीती यायला लागली ही गोष्ट खरी आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

गणरायाच्या आगमनाला भजनात दंग

आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं. पारंपारिक पद्धतीने बाप्पांचं आगमन झाले. त्यानंतर ते गणरायांसमोर भजनात तल्लीन झालेले दिसले. त्यांनी अभंग म्हणत मृदंगावर थाप दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. चिपळून तालुक्यातील तुरुंबव गावातील घरी गणपती उत्सवाचा आनंद आहे. त्यांनी आरतीनंतर भजन म्हटले. यापूर्वी त्यांचे भात लावणी करताना पारंपारिक गीत म्हणतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.