दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी

eknath khadse dawood ibrahim: छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही.

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी
eknath khadse dawood ibrahim
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 9:26 AM

सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते.

काय दिली धमकी

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्या प्रकरणाशी संबंध…

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, मला चार ते पाच फोन आले आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु हे प्रकरण मला गंभीर वाटत नाही. मला त्यात तथ्य वाटत नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करतील. त्यात काय येणार? ते पाहू या. एकनाथ खडसे यांना काही वर्षांपूर्वी दाऊदकडून धमक्या आल्या होत्या किंवा दाऊदच्या पत्नीशी त्यांचे संभाषण झाले होते? असे आरोप झाले होते. त्या प्रकरणाचा आता आलेल्या धमक्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? यावर खडसे म्हणाले, दाऊदच्या पत्नीशी संभाषण प्रकरणात एक व्यक्ती सापडला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती.

हे सुद्धा वाचा

स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली आहे. त्यात काही गंभीर प्रकरण आढळल्यास गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.