AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Shinde : सचिन अहिर फुटताच वरळीचा खरा किंग मेकर सुनील शिंदेंनी इतक्या दिवसांपासून जे मनात साचलेलं ते बोलून टाकलं

Sunil Shinde : "वरळी शिवसेनेची आहे. ती व्यक्तीची होऊ शकत नाही. शिवसेनेची सामुदायिक ताकद आहे. अनेक शिवसैनिकांमध्ये धमक आहे. असे कोण आले, गेले मला काही विशेष वाटत नाही" अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिली.

Sunil Shinde : सचिन अहिर फुटताच वरळीचा खरा किंग मेकर सुनील शिंदेंनी इतक्या दिवसांपासून जे मनात साचलेलं ते बोलून टाकलं
Sachin Ahir-Uddhav Thackeray
| Updated on: Jun 30, 2026 | 3:40 PM
Share

आज वरळीच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. वरळीतून येणारे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तोंडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर हे ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय बनले होते. आदित्य ठाकरेंसोबत सतत त्यांचा वावर असायचा. 2019 मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला. वरळीत खरी ताकद सुनील शिंदे यांची आहे. पण सचिन अहिर यांना मातोश्रीने जास्त जवळ केलं होतं. आज त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाला घरचा आहेर दिला.

“आमच्या पण वरिष्ठांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. त्यांचं ज्या पद्धतीने चाललं होतं, ते माझ्या लक्षात येत होतं. पण मी छोटा कार्यकर्ता असल्याने भाष्य केलं नाही” असं आमदार सुनील शिंदे म्हणाले. “सचिन अहिर यांच्या जाण्याने पक्ष म्हणून नुकसान झालय असं वाटत नाही. मी 18 वर्ष वरळीत शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो. पाच वर्ष नगरसेवक होतो. त्यानंतर सचिन अहिर यांचा पराभव करुन आमदार म्हणून निवडून आलो. आदित्य ठाकरे यांचा सहकारी म्हणून दोन निवडणुकीत त्यांच्यासोबत होतो” असं सुनील शिंदे यांनी सांगितलं. “वरळी शिवसेनेची आहे. ती व्यक्तीची होऊ शकत नाही. शिवसेनेची सामुदायिक ताकद आहे. अनेक शिवसैनिकांमध्ये धमक आहे. असे कोण आले, गेले मला काही विशेष वाटत नाही” अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिली.

त्यांच्याबद्दल वेडवाकडं बोलणार नाही

“शिवसैनिक म्हणून आम्ही वरळीत आमचं काम करत राहू. वरळीतील शिवसेनेचं काम करत राहू” असं सुनील शिंदे म्हणाले. ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे का? यावर ते म्हणाले की, “मी काय म्हटलं आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. मला पक्ष प्रमुखांबद्दल आदर आहे त्याच्याबद्दल मी असं बोलणार नाही. मी आमच्या काही लोकांबद्दल म्हटलं, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे कोणाला किती महत्व द्यायचं” “ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर आहे, श्रद्धा आहे, त्यांच्याबद्दल वेडवाकडं बोलणार नाही. हे मीडियाच्या माध्यमातून मोठे झालेले लोक आहेत. तिथला शिवसैनिक स्थिर आहे. येणारी कुठलीही निवडणूक असो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यशस्वी होईल” असा विश्वास सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी