AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mns Viabhav Khedekar : मनसेला दुसरा झटका कोकणातून, नगराध्यक्ष वैभव खेडेकर अपात्र, कदमांचे आरोप नडले

महाराष्ट्र राज्यातील मनसेचे पहिले नगराध्यक्ष कोकणातील मनसेचे प्रमुख नेते खेडचे वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला गेला आहे. त्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला.

Mns Viabhav Khedekar : मनसेला दुसरा झटका कोकणातून, नगराध्यक्ष वैभव खेडेकर अपात्र, कदमांचे आरोप नडले
वैभव खेडेकरांना अपात्र ठरवलंImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 11:05 PM
Share

रत्नागिरी : राज्यात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)  शिवतीर्थावरील भाषणानंतर आणि वसंत मोरेंच्या नाराजीनंतर मनसेत मोठे बदल होत आहेत. अशातच मनसेला कोकणात दुसरा झटका बसलाय. कारण महाराष्ट्र राज्यातील मनसेचे पहिले नगराध्यक्ष कोकणातील मनसेचे प्रमुख नेते खेडचे वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला गेला आहे. त्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे कोकणात एकच खळबळ माजली असून खेडमध्ये पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना यांच्या राजकीय युद्ध रंगणार आहे. वैभव खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्यावर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. आणि आता त्यावर एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याने पुन्हा कोकणातलं राजकारण ढवळून निघतंय.

खेडेकरांवर कोणते आरोप?

शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी वैभव खेडेकर नगराध्यक्ष पदावर मनमानी कारभार करतात असा आरोप करत त्यांच्या विरोधात विकास खात्याकडे तक्रार केली होती याच तक्रारीचे आज आदेश प्राप्त झाले असून वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. तसा आदेश एकनाथ शिंदे यांनी काढला आहे. वैभव खेडेकर हे कोणताही निर्णय घेताना कुणालाही विश्वात घेत नव्हते, कुणालाही विचारत नव्हते, असा आरोप अनेक जणांकडून करण्यात आला होता. त्यांनी एकत्रित अदेशाच्या शिस्तीचा भंग केला असल्याचा ठपका त्यांचयावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही करावई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

वैभव खेडेकरांची शिवसेनेवर टीका

या आदेशावरून वैभव खेडेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. मला मोबाईलवर ही माहिती माहिती मिळाली. मी नगरविकास खात्याची ऑर्डर पाहिली. महाराष्ट्रच्या राजकारणातला स्तर जसा खाली गेला आहे, तशीच ही बातमी आहे. मला ही गोष्ट अपेक्षित होती. कारण मी शिवसेनेत यावं यासाठी हा प्रयत्न होता. मी शिवसेनेत येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी हा आदेश काढला आहे. मात्र मला एक समाधान आहे की मी माझी नगराध्यक्षपादाची कारकिर्द पूर्ण केली आहे. मी या ऑर्डविरोधात हायकोर्टात धाव घेणार आहे. कोर्टाने आधीच या ऑर्डवर स्टे दिला आहे. त्यामुळे याविरोधात मी लढणार आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीतही मी जोमाने लढणार आहे. मी पुन्हा नगराध्यक्ष होईन हाही विश्वास मला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी वैभव खेडेकर यांनी दिली आहे.

ठाण्यात 12 एप्रिलला ‘राज’गर्जना ! पोलिसांचं एक पाऊल मागे, डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी

Vasant More Mns : ‘वसंत भाऊ, ही राजकीय हत्या की आत्महत्या?’ भावाच्या वक्तव्याला बहिणीचं ‘मनसे’ प्रत्युत्तर! पाहा कुणीकुणी सोडली मनसे?

Yashomati Thakur : 70 वर्षात जे उभा केलं ते 7 वर्षात विकलं, कोल्हापूरच्या प्रचारात यशोमती ठाकूर कडाडल्या

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.