AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashomati Thakur : 70 वर्षात जे उभा केलं ते 7 वर्षात विकलं, कोल्हापूरच्या प्रचारात यशोमती ठाकूर कडाडल्या

मागच्या 70 वर्षात जे जे उभारलं, घडवलं, ते ते विकायचं काम मागच्या 7 वर्षात केलं गेलं, त्यामुळे हे कुणी केलं हे आपण विसरता कामा नये. असा गंभीर आरोप करीत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाव न घेता थेट मोदींवर प्रहार केला आहे.

Yashomati Thakur : 70 वर्षात जे उभा केलं ते 7 वर्षात विकलं, कोल्हापूरच्या प्रचारात यशोमती ठाकूर कडाडल्या
कोल्हापुरात यशोमती ठाकूर यांची भाजपवर सडकून टीकाImage Credit source: twitter
| Updated on: Apr 07, 2022 | 8:48 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly by Election) सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. मागच्या 70 वर्षात जे जे उभारलं, घडवलं, ते ते विकायचं काम मागच्या 7 वर्षात केलं गेलं, त्यामुळे हे कुणी केलं हे आपण विसरता कामा नये. असा गंभीर आरोप करीत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाव न घेता थेट मोदींवर प्रहार केला आहे. महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या कोल्हापूरातील महिला मेळावा आज पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, अनेक कंपन्या विकूनही वर तोंड करून हे लोक विचारतात की गेल्या 70 काँग्रेसने वर्षात काय केले? मग एवढं खोटं नाटं पसरवलं जात असेल तर माझ्या आई बहिणींनीसह प्रत्येक महिलेने आई भवानीचं रूप धारण करून याविरोधात लढलं पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी कोल्हापूरकरांना केले.

विचित्र ताई आरडाओरडा करायला कुठेही पोहचतात

चित्रा नाही तर यांना विचित्रा ताई म्हंटल पाहिजे. स्वत:च दिवे बंद करायचे, स्वत:च दगड फेकायचे, अशा या विचित्रा वाघ आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात. ज्यांनी आरडाओरडा करावा त्यांनी आधी स्वतःच्या घरात बघावं असा आरोपही मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला. स्वत: अग्निदिव्याचा सामना करणाऱ्या चित्रांची ताईंच्या तोंडी आग टाकून जीभ जाळण्याचे काम भाजप करते आहे. चित्राताई भाजपात का गेल्यात हे आपल्याला कितीही माहिती असले तरीही आपल्यापेक्षा हे चित्रा ताईंनाच जास्त माहिती आहे. भाजपाकडून वापर चित्रा वाघ यांचा पद्धतशीरपणे वापर सुरू आहे. पुढच्या काळात त्यांना त्यांची अनुभूती येईल. ज्या संस्कृतीमध्ये महिलांचा मान सन्मान होत नाही, तर त्या संस्कृतीमध्ये मूळ भाजपाच्या महिलाना बाजूला सारून चित्रा ताईंमाध्यमातून आगी लावण्याचा कुटिल डाव भाजप करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिला कुठे दिसतात का? असा प्रश्नही मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.

भाजपने 25 हजार तिकीट वाटली – यशोमती ठाकूर

25 हजार तिकीटं भाजपने वाटून काश्मीर फाईल्स चित्रपट पाहायला लोकांना भाग पाडले. मात्र काश्मीर फाइल्सबद्दलचं सत्य आपण तपासून घ्यायला हवं. त्यावेळी कुणाचं राज्य होतं, कोण पंतप्रधान होते, कुणी संसदेला घेराव घातला होता आणि कुणाच्या सांगण्यावरून दहशतवादी संसदेत घुसले होते हे आपण जाणून घेतलं पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

स्त्रीचा अपमान कधी सहन करणार नाही

स्त्री आणि स्त्रीत्वाचा अपमान कधीही सहन करणार नाही आणि ते कुणी करीत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे मंत्री यशोमती ठाकूर स्पष्ट केले. आपल्या सांस्कृतिक राजधानीला डाग लावण्याच काम विरोधक करत आहेत. इथले खासदार आमच्या महिला उमेदवार यांना बिचारी म्हणतात, अशांना माहिती नाही की आपल्या देशाच्या पंतप्रधान पदी, राष्ट्रपती पदी महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. असे सांगत खासदार धनंजय महाडीक यांना टोला लगावला आहे.

Sanjay Raut : राजभवनात दही खिचडी खाणाऱ्यांनी आणि पत्ते खेळणाऱ्यांनीच पुरावे दिले, राऊतांचे टीकेचे बाण सुरूच

St Worker Strike : गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून फडणवीस, चंद्रकांत पाटलांचं कौतुक, म्हणाले नवनीत राणा, अनुराधा पौडवाल यांच्यासह…

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’, सुजात आंबेडकरांच्या राज ठाकरेंवरील टीकेला शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.