‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’, सुजात आंबेडकरांच्या राज ठाकरेंवरील टीकेला शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर

सुजात आंबेडकर यांच्या या इशाऱ्याला आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुजात आंबेडकर यांना खोचक सवाल केलाय.

'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है', सुजात आंबेडकरांच्या राज ठाकरेंवरील टीकेला शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर
सुजात आंबेडकर, शालिनी ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 7:52 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. तसंच मशिदींवरील भोंग्यांबाबतही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत, मशिदींवरील भोग्यांसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिलेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी (Sujat Ambedkar) जोरदार टीका केलीय. इतकंच नाही तर मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची असल्याचं सांगत राज यांना थेट आव्हान दिलं आहे. सुजात आंबेडकर यांच्या या इशाऱ्याला आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुजात आंबेडकर यांना खोचक सवाल केलाय.

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…..!!! सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?’ असा खोचक प्रश्न शालिनी ठाकरे यांनी सुजात आंबेडकर यांना विचारलाय.

शालिनी ठाकरेंचा खोचक सवाल

सुजात आंबेडकरांची टीका काय?

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशावेळी सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा. मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असं वक्तव्यही सुजात आंबेडकर यांनी केलंय. इतकंच नाही तर अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणून दाखवण्याचं आव्हानही सुजात यांनी दिलं आहे.

इतर बातम्या : 

‘राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ राऊतांच्या स्वागतावरुन राणेंचा खोचक सवाल

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, ‘गजा मारणेचंही स्वागत झालं होतं’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.