AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam: नाच्या… रामदास कदमांची जहरी टीका, भास्कर जाधवांसह सुनील तटकरेंवर मोठा आरोप काय?

Ramdas Kadam on Sunil Tatkare and Bhaskar Jadhav: कोकणातील तीन बड्या नेत्यांमधील राजकीय शिमगा पुन्हा एकदा दिसला. रामदास कदम यांनी काल सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर भास्कर जाधवांनी भाईंवर मोठे आरोप केले. आता कदमांनी तटकरेंसह भास्कर पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

Ramdas Kadam: नाच्या... रामदास कदमांची जहरी टीका, भास्कर जाधवांसह सुनील तटकरेंवर मोठा आरोप काय?
रामदास कदमImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 1:58 PM
Share

Ramdas Kadam on Sunil Tatkare and Bhaskar Jadhav: कोकणातील तीन बड्या नेत्यांमध्ये राजकीय शिमगा रंगला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर काल रामदास कदम यांनी तोंडसूख घेतले. उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांनी रामदास भाईंवर टीका केली. आज रामदास कदम यांनी तटकरे यांच्यासह भास्कर पाटलांवर तुफान हल्लाबोल केला. त्यांनी दोघांवर घणाघाती आरोप केला. त्यामुळे कोकणात पुन्हा राजकीय वादंग पेटले आहे.

तटकरे यांना निवडून आणले

यावेळी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. तर तटकरे यांना आपण निवडून आणल्याचा दावा केला. तटकरे यांना आपल्यामुळे निवडणुकीचे तिकीट मिळाले. निवडून आल्यावर ते बेईमान झाल्याचा आरोप त्यांनी केला. भास्कर जाधव आणि तटकरे यांच्यामध्ये काही फरक नाही असा आरोपही रामदास कदम यांनी केला. दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

भास्कर जाधवांवर जहरी टीका

भास्कर जाधव ज्या ताटात खातात, तिथंच छेद करतात. ते नाच्या आहेत. ते शिमग्यात गोमू सारखे नाचतात. भास्कर जाधव यांचा मुलगा लोटे एमआयडीसीत दमदाटी करतो. तरुणांच्या जीवावर ते निवडून आले आणि ठेके मुलाला आणि जावायला देतात. भास्कर जाधव कसले निष्ठावंत, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवार यांच्याकडे गेले. बाळासाहेब म्हणायचे बाडगा अधिक कडवा असतो हे बाडगा आहे. हे स्वतः भगताकडे जातात आणि आम्हाला बदनाम करतात. जिल्हा परिषद निकाल लागेल त्यावेळी जाधवांचाही निकाल लागलेला असेल अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली.

सुनील तटकरे हे विश्वासघातक

सुनिल तटकरे विश्वासघातकी आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठे केलं त्यांना संपवण्याचे यांनी काम केले आहे. ज्या अंतुले यांनी त्यांना मोठं केलं, त्यांना संपवण्याचे काम तटकरेंनी केले. दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी लाजीरवाणे काम सुरू केले. दादांची राख सुद्दा विजली नाही, शांत होऊ दिली नाही, यांनी सुनेत्रा वहिणींनी शपथ घ्यायला लावली आहे. 10 दिवस गेले आसते तर काय झाले आसते. तटकरे किती चाणाक्ष आणि चालु आहे पाहा. शरद पवार हे पक्षाचा ताबा घेतील म्हणून ज्या वहिणीचे कुंकू पुसले, मंगळसुत्र तोडले गेले त्यांना मुंबईत आणले. आपण हिंदु लोक सुतक पाळतो पण इथं काही नाही हे निंदाजनक आहे, क्लेषदायक आहे. ही आपली संस्कृती नाही, सुनील तटकरेंना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही, अशी घाणाघाती टीका त्यांनी केली.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन