मोठी बातमी! महाविकास आघाडी आणि मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिल्ह्यात लढाणार एकत्र, घोषणा करत..
Maharashtra Election 2025 : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांबद्दल अत्यंत मोठी घोषणा केली आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असून निवडणूक आयोगाने 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकींचे कार्यक्रम जाहीर केली. 10 नोव्हेंबर 2025 पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामध्येच आता नाशिक जिल्ह्यांमध्ये सर्व समीकरणे बदलताना दिसत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आगामी निवडणुका लढणार असल्याचे संकेत असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर आगामी निवडणुका महाविकास आघाडी मनसेला घेऊन लढणार असल्याचे महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केले. राज्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, नाशिकमध्ये आम्ही मनसेसोबत निवडणुका लढणार असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली.
माकपचे डॉ डी. एल. कराड म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सर्वांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जाती जातीत भांडण लावण हेच काम सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सगळी सत्ता आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हजारो घरांना बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करणार. मतदार यांद्यांमध्ये प्रचंड दोष आहेत. याद्या दुरुस्त झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मतदान पत्रिकेवर मतदान झालं पाहिजेल अशी आमची मागणी.
या पत्रकार परिषदेमध्ये मनसे नेते दिनकर पाटील बोलताना म्हणाले की, आज संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. देशात राहुल गांधी यांनी मत चोरीवर सरकार आल्याचं निदर्शनास आणून दिले. मुंबईत एकत्रित मोर्चा झाला. 96 लाख दुबार मतदार आहेत. शिंदेंच्या सेनेने देखील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं सांगितलं आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे. ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी नाशिकमध्ये मोर्चा काढला होता. गुन्हेगारी विरोधात आम्ही मोर्चा काढला. नाशिक गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आम्ही मोर्चा काढला. आधी दादा भुसे पोलिस आयुक्तांना भेटले, नंतर सगळे आमदार भेटले. आमच्या मोर्चाचा धसका घेतल्याने नाशिक गुन्हेगारी मुक्त झाले आहे.
